Sections

काळापुढं गोठलं अधिकारी बनण्याचं स्वप्न! 

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 8 मे 2018
aher

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची तयारी करण्यासाठी संगमनेर तालुक्‍यातील (जि. नगर) घारगावच्या शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश आहेर वर्षभरापूर्वी पुण्यात आला. एमपीएससीची तयारी करत असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.कॉमला प्रवेश घेऊन तो वसतिगृहात राहू लागला. सोमवारपासून सुरू होत असलेल्या एम.कॉमच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी ऋषिकेश सकाळी उठला खरा; पण अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बेशुद्ध पडलेल्या ऋषिकेशने पुन्हा डोळे उघडलेच नाही. 

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची तयारी करण्यासाठी संगमनेर तालुक्‍यातील (जि. नगर) घारगावच्या शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश आहेर वर्षभरापूर्वी पुण्यात आला. एमपीएससीची तयारी करत असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.कॉमला प्रवेश घेऊन तो वसतिगृहात राहू लागला. सोमवारपासून सुरू होत असलेल्या एम.कॉमच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी ऋषिकेश सकाळी उठला खरा; पण अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बेशुद्ध पडलेल्या ऋषिकेशने पुन्हा डोळे उघडलेच नाही. 

विद्यापीठातील चार क्रमांकाच्या वसतिगृहातील ऋषिकेशला सकाळी दहाच्या सुमारास अचानक त्रास होऊ लागला. वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सुरक्षारक्षकांना बोलावून घेतले. त्यानंतर त्याला विद्यापीठातील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने त्याला ससून रुग्णालयात हलविण्यात आले. तपासणीदरम्यान हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले अन्‌ त्याचा जीव वाचविण्यासाठी धडपडणारे मित्र अक्षरश: खचून गेले. मात्र तरीही स्वत:ला सावरत त्यांनी पुढील जबाबदारी सांभाळली. 

गेल्या शनिवारी चक्कर आल्याने ऋषिकेश बेशुद्ध पडला होता. त्या वेळी खासगी रुग्णालयात त्याची तपासणी करण्यात आली; परंतु वैद्यकीय अहवाल सामान्य (नॉर्मल) होता. सोमवारी सकाळीही ऋषिकेशला पुन्हा त्रास होऊ लागल्याचे त्याचा मित्र निखिल यादव याने सांगितले. संगमनेरला पदवी शिक्षण घेतल्यापासून निखिल ऋषीकेशसोबत आहे. दोघेही पदव्युत्तर शिक्षणासाठी पुण्यात आले आणि विद्यापीठातील वसतिगृहात राहू लागले. 

एमपीएसएसची पूर्वपरीक्षा ऋषिकेशने यापूर्वी दिली आहे; परंतु त्यात यश आले नाही. मात्र, तरीही तो खचला नाही, त्याने नव्याने एमपीएससीची तयारी सुरू केली होती. -निखिल यादव, विद्यार्थी 

एम.कॉमचा पहिला पेपर पुढे ढकलला  ऋषिकेशच्या अचानक जाण्याने दुःखाच्या छायेत असलेल्या विद्यापीठातील त्याच्या मित्रांनी वाणिज्य शाखेच्या परीक्षेचा पहिला पेपर पुढे ढकलण्याची मागणी विद्यापीठाकडे केली. कुलगुरूंच्या परवानगीने सोमवारी होणारे एम. कॉमचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. हे पेपर परीक्षेच्या शेवटी घेतले जातील. परीक्षेतील हा बदल केवळ विद्यापीठाच्या आवारातील पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना लागू असणार आहे. इतर संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा नियोजित वेळेत होणार आहेत. परीक्षेच्या पहिल्या दिवशी होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.

Web Title: youth dead of heart attack in Savitribai Phule Pune University

टॅग्स

संबंधित बातम्या

577525-mukta-tilak.jpg
सिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब

पुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...

फलोदे (ता. आंबेगाव) येथील शहीद राजगुरू ग्रंथालय यांना रूग्णवाहिका येथील जनतेच्या सुविधांसाठी उपलब्ध करून देण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ.
फलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध

घोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...

PDCC-Bank
पुणे जिल्हा बॅंक अजूनही देशात पहिल्या क्रमांकावर

पुणे - केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरी बॅंक अजूनही...

फलोदे (ता. आंबेगाव) - रुग्णवाहिका लोकार्पणप्रसंगी मान्यवर व ग्रामस्थ.
आदिवासींसाठी रुग्णवाहिका

मंचर - आंबेगाव तालुक्‍यातील आदिवासी भागातील रुग्णांना वेळेत दवाखान्यात नेण्यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कॉम्प्टीटर फाउंडेशन पुणे व आदिम...

Municipal-Revenue
पिंपरी-चिंचवड पालिकेचा महसूल घटला

पिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी...

Wi-Fi
‘वाय-फाय’युक्त योजनेस हरताळ

पुणे - पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटीचे प्रशासन यांच्यात विसंवाद असल्यामुळे शहरातील ११५ ठिकाणे वाय-फाययुक्त करण्याच्या प्रयत्नांना हरताळ फासला गेला...