Sections

यिन - यूथ इन्स्पिरेटर्स ॲवॉर्ड- 2018

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 7 मे 2018
youth-inspirator-award

पुणे - डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) युवा व्यासपीठाच्या वतीने सात विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणाऱ्या युवकांना देण्यात येणाऱ्या ‘यूथ इन्स्पिरेटर्स अवॉर्ड- २०१८’साठी नामांकन पाठवण्याची अंतिम मुदत येत्या गुरुवारी (ता. १०) संपते आहे. 

अडथळ्यांवर मात करून समाज व देशासाठी रचनात्मक काम करणाऱ्या तरुणांचे कौतुक व्हावे आणि अन्य युवकांनाही सकारात्मक कामाची प्रेरणा मिळावी या हेतूने हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

पुणे - डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) युवा व्यासपीठाच्या वतीने सात विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणाऱ्या युवकांना देण्यात येणाऱ्या ‘यूथ इन्स्पिरेटर्स अवॉर्ड- २०१८’साठी नामांकन पाठवण्याची अंतिम मुदत येत्या गुरुवारी (ता. १०) संपते आहे. 

अडथळ्यांवर मात करून समाज व देशासाठी रचनात्मक काम करणाऱ्या तरुणांचे कौतुक व्हावे आणि अन्य युवकांनाही सकारात्मक कामाची प्रेरणा मिळावी या हेतूने हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

‘यूथ इन्स्पिरेटर्स अवॉर्ड- १८’ला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. जवळपास सर्व जिल्ह्यांमधून या पुरस्कारांसाठी नामांकने येत आहेत. तरुण पिढीला शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करताना समाज व देशासाठी रचनात्मक काम उभे करण्यास प्रेरणा मिळावी यासाठी ‘यिन’ने महाविद्यालयीन तरुणांसाठी आयोजित केलेल्या ‘यिन समर यूथ समिट’च्या निमित्ताने हे गौरव होणार आहेत. मुंबई, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, नागपूर, नाशिक, अकोला, नगर, औरंगाबाद, नांदेड आणि जळगाव या बारा शहरांमध्ये १६ मे ते १६ जून दरम्यान ही परिषद होणार आहे. पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग असणाऱ्या या ॲवॉर्डसाठी निलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे मुख्य प्रायोजक आहेत.

‘यिन’तर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठी दिला जाणारा यूथ इन्स्पिरेटर्स ॲवॉर्ड महाराष्ट्रातील तरुणांमध्ये आत्मविश्वास तसेच आत्मसन्मान वाढवणारा आहे. या पुरस्कारांच्या निमित्ताने राज्यभरातील तरुणांमधील बुद्धिमत्ता, कष्ट व जिद्द पाहायला मिळणार आहे.- निवेदिता नहार, संचालिका, हॅशटॅग क्‍लोदिंग

महाराष्ट्रातील युवकांच्या कर्तृत्वाचा झेंडा अटकेपार लहरावा, म्हणून तर ‘यिन’ व ‘निलया ग्रुप’ युवक निर्माणाचे आदर्श कार्य करत आहेत. या युवकांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी ‘यिन’सोबत आम्ही युवकांना पुरस्कार देतो आहोत. या सन्मानातून युवकांना आदर्श कार्याची प्रेरणा मिळावी व असंख्य युवांच्या सहभागाने महाराष्ट्राचे कर्तृत्व दाही दिशांमध्ये गर्जावे, हीच सदिच्छा!- पायल मेहता,  संचालिका, निलया एज्युकेशन ग्रुप, पुणे

पुरस्कारासाठी निकष  १८ ते ३० वयोगटातील युवक, युवती

नामांकनासोबत ही माहिती पाठवा  शैक्षणिक कामगिरी, वैयक्तिक यश आणि इतर विशेष कामगिरी   कोणती आव्हाने पार केली?  तुमच्या कामाचा, नवकल्पनांचा समाजाला काय फायदा झाला?  बातम्यांची कात्रणे, आधी मिळालेल्या पुरस्कारांची माहिती व छायाचित्रे 

 अधिक माहितीसाठी संपर्क ः ९०७५००७९५८

या क्षेत्रांतील कामासाठी आहेत पुरस्कार कम्युनिटी सर्व्हिस, सामाजिक सेवा, कला आणि सांस्कृतिक, क्रीडा, शिक्षण, विज्ञान- तंत्रज्ञान- अभियांत्रिकी, एक्‍सलन्स इन यूथ लीडरशिप,  उद्योग- स्टार्ट अप

Web Title: Yin - Youth Inspirators Award - 2018

टॅग्स

संबंधित बातम्या

इंदापुरातील सुमारे चार किमी रस्त्याचेे भूमिपूजन

इंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28...

MES
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन

पुणे : पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही नामांकित संस्था 19 नोव्हेंबरला 159व्या वर्षात पदार्पण करीत आहे. याचनिमित्ताने 24 नोव्हेंबर (शनिवार)...

divyang
दिव्यागांनी मिळवला विकास निधीत वाटा

लातूर : स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या विकास निधीपैकी पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे सरकारचे आदेश आहे. मात्र, या आदेशाची...

झाडे जगवण्यासाठी रिकाम्या बॉटलची करा मदत; तरुणाईचे आवाहन

संग्रामपूर- सातपुडा पर्वतराईत सालईबन या आदिवासी परिसरात लागवड केलेल्या झाडांना जगविण्यासाठी रिकाम्या बिसलरी बॉटलची मदत करा, असे आवाहन तरुणाई...

15 मुद्यांच्या आधारे सोलापुरातील झेडपी शाळांची तपासणी

सोलापूर- दिवाळीच्या सुटीनंतर यंदाच्या वर्षातील दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (ता. 19) सुरवात होत आहे. सुटीनंतरच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील...

लक्षद्वीपवर पुढील २४ तासांत वादळाची निर्मिती

मुंबई- तामिळनाडूत गज वादळाच्या तडाख्यानंतर नव्या वादळाचे संकेत मिळाले आहे. येत्या चोवीस तासांत लक्षद्वीपवर नवे वादळ तयार होत असल्याचा इशारा...