Sections

'महावितरण'च्या दुर्लक्षामुळे दगावताहेत कर्मचारी!

सकाळ वृत्तसेवा |   रविवार, 6 मे 2018

पुणे : लघुदाब (440 व्होल्ट) व उच्चदाब वाहिन्यांच्या (11 ते 33 केव्ही) दुरुस्तीसाठी कर्मचारी प्राधिकृत (ऑथोराईज) करण्यासाठी नियमावली असताना महावितरणकडून ती धाब्यावर बसविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे कर्मचारी प्राधिकृत करताना विद्युत निरीक्षकांकडूनदेखील कोणतीही काळजी घेतली जात नसल्यामुळे दरवर्षी अपघात घडून कर्मचारी दगावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून आले आहे. 

पुणे : लघुदाब (440 व्होल्ट) व उच्चदाब वाहिन्यांच्या (11 ते 33 केव्ही) दुरुस्तीसाठी कर्मचारी प्राधिकृत (ऑथोराईज) करण्यासाठी नियमावली असताना महावितरणकडून ती धाब्यावर बसविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे कर्मचारी प्राधिकृत करताना विद्युत निरीक्षकांकडूनदेखील कोणतीही काळजी घेतली जात नसल्यामुळे दरवर्षी अपघात घडून कर्मचारी दगावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून आले आहे. 

महावितरणकडून लघुदाब अथवा उच्चदाब वीज उपकरणे, तसेच भूमिगत अथवा उपरी वीजवाहिन्या यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. या कर्मचाऱ्यांना प्राधिकृत करण्यासाठी भारतीय विद्युत नियमावली तयार करण्यात आली आहे, तसेच केंद्रीय विद्युत नियमावलीदेखील आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. त्यानुसार तेच कर्मचारी त्या-त्या प्रकारच्या वाहिन्यांची देखभाल- दुरुस्ती करू शकतात. अन्य कोणत्याही कर्मचाऱ्यांना त्या वाहिन्यांवर काम करता येत नाही. या कर्मचाऱ्यांची यादी महावितरणकडून तयार केली जाते आणि ती मान्यतेसाठी दरवर्षी विद्युत निरीक्षकांकडे पाठविली जाते. त्यांनी मान्यता दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना प्राधिकृत केले जाते. 

परंतु महावितरण किंवा विद्युत निरीक्षकांकडून या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नसल्याचे समोर आले आहे. महावितरणकडून अशा प्राधिकृत कर्मचाऱ्यांची यादी तयार करताना शैक्षणिक अर्हता, कामाचा अनुभव, संबंधित काम करण्यास पात्र असल्यासाठीचे शासन अथवा शासनमान्य संस्थेचे प्रमाणपत्र, विद्युत निरीक्षक अनुज्ञापक मंडळ यांच्याकडून दिले जाणारे पर्यवेक्षक प्रमाणपत्र इत्यादी गोष्टींची खातरजमा केली जात नाही. ही यादी विद्युत निरीक्षकांच्या कार्यालयात जमा करून केवळ त्याची पोच घेतली जाते. पुढील वर्षभर यादीतील कर्मचाऱ्यांना फिल्डवर कामासाठी पाठवून कामे केली जातात. 

विद्युत निरीक्षक कार्यालयाकडूनदेखील याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. परिणामी सातवी, आठवी, नववी पास अथवा आयटीआय पास, परंतु कामाचा अत्यल्प अनुभव असलेले व कोणतेही तांत्रिक शिक्षण नसलेले कर्मचारी या कामासाठी प्राधिकृत केले जातात. त्यातून काम करताना अपघातात कर्मचारी दगावणे, चुकीच्या कामामुळे सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच, महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. 

महावितरण कंपनी होण्यापूर्वी अशा पद्धतीने वाहिन्यांवर काम करण्यासाठी कर्मचारी प्राधिकृत केले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून आयटीआयमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची या कामासाठी नियुक्ती केली जाते. त्यांना तीन ते सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतरच प्रत्यक्ष कामावर पाठविले जाते. अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून केली जाते.  - एम. जी. शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण, पुणे विभाग 

हे कितपत योग्य?  पंधरा दिवसांपूर्वी कोथरूड उपविभागात एका लघुदाब वाहिनीवर काम सुरू असताना दुर्घटना घडली होती. महावितरणचा 27 वर्षांचा कर्मचारी दुरुस्तीचे काम करीत असताना विजेचा धक्का बसून जागीच मरण पावला होता. हा युवक आयटीआयचा विद्यार्थी होता आणि तीन वर्षांपूर्वीच महावितरणमध्ये कामाला लागला होता.

मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी एकट्या पुणे विभागात अशाप्रकारे अपघात घडून जवळपास नव्वद ते शंभर कर्मचारी दगावतात. आयटीआयच्या विद्यार्थ्यांची या कामासाठी नेमणूक केल्यानंतर केवळ तीन ते सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना 11 हजार ते 33 हजार व्होल्टच्या वाहिन्यांवर कामासाठी पाठविले जाते, हे कितपत योग्य आहे, असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

Web Title: Without Proper guidelines for work allotment, MSEDCL employees life in danger

टॅग्स

संबंधित बातम्या

31dead_body_5B1_5D.jpg
धर्माबाद तालुक्‍यात वीज पडून शेतकरी ठार 

नांदेड  :  शेतातून घराकडे परत येणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर नैसर्गीक वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बाभूळगाव (ता. धर्माबाद)...

भाजपने देशावर संविधान बचावची वेळ आणली - राष्ट्रवादी महिला काँग्रेस 

कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी...

2ajit_pawar_26.jpg
मराठवाड्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा : अजित पवार 

औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची...

मालवण येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

मालवण - शहरातील बसस्थानक नजीकच्या समाजमंदिर परिसरात राहणाऱ्या हर्षदा रामचंद्र मालवणकर (वय - २०) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आज सकाळी साडे अकरा...

abab bagul
कुसंगतीने भरकटलेल्या तरुणाईला मिळणार दिशा 

पुणे : मजेखातर अथवा 'थ्रिल' म्हणून अजाणत्या वयात काही मुले-मुली पोलिस स्टेशनची पायरी चढतात. पोलिस दफ्तरी गुन्हे दाखल झालेल्या १५ ते २५ वयोगटातील तरुण...