Sections

पक्षी आणि प्राण्यांसाठी तयार केली पाणपोई 

रमेश मोरे |   बुधवार, 11 एप्रिल 2018
water

जुनी सांगवी - उन्हाळ्यात अन्न पाण्यावाचुन भटकी जनावरे, पक्षी यांचे हाल होतात. त्यामुळे असे पक्षी, प्राणी अन्नपाण्याच्या शोधात परिसर सोडुन स्थलांतर करतात. पक्ष्यांच्या स्थलांतरामुळे परिसरातील चिवचिवाट उन्हाळ्यात कमी होवुन परिसरात एक उजाड शांतता पसरते. परंतु, शहरात सिमेंटची जंगले, वृक्षांचा अभाव, दाट लोकवस्तीमुळे एरव्ही मुबलक दिसणारे पक्षी दुर्मिळ झाले आहेत. माणसांसाठी उभारलेल्या पाणपोई आपण जागोजागी पहातो. मात्र पक्षी प्राण्यांची तहान भागवुन त्यांचा उन्हाळा सुखदायक होण्यासाठी कै.चंद्रभागा भोसले प्रतिष्ठानच्या वतीने खआस प्राण्यांसाठी पाणपोई तयार करण्यात आली आहे.

जुनी सांगवी - उन्हाळ्यात अन्न पाण्यावाचुन भटकी जनावरे, पक्षी यांचे हाल होतात. त्यामुळे असे पक्षी, प्राणी अन्नपाण्याच्या शोधात परिसर सोडुन स्थलांतर करतात. पक्ष्यांच्या स्थलांतरामुळे परिसरातील चिवचिवाट उन्हाळ्यात कमी होवुन परिसरात एक उजाड शांतता पसरते. परंतु, शहरात सिमेंटची जंगले, वृक्षांचा अभाव, दाट लोकवस्तीमुळे एरव्ही मुबलक दिसणारे पक्षी दुर्मिळ झाले आहेत. माणसांसाठी उभारलेल्या पाणपोई आपण जागोजागी पहातो. मात्र पक्षी प्राण्यांची तहान भागवुन त्यांचा उन्हाळा सुखदायक होण्यासाठी कै.चंद्रभागा भोसले प्रतिष्ठानच्या वतीने खआस प्राण्यांसाठी पाणपोई तयार करण्यात आली आहे. या पाणपोईत दुस-याच दिवशी रस्त्यावरून जाणा-या प्राण्यांनी आपली तहान भागवली.

याबाबत प्रतिष्ठानचे दत्तात्रय भोसले म्हणाले, वाढत्या उन्हामध्ये मुक्या जनावरांची दिवसभराची तहान भागविण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या हेतूने ही पाणपोई केली आहे. तसेच पक्ष्यांसाठी धान्य ठेवण्यात आले आहे. 

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्राणिमित्र दत्तात्रय भोसले म्हणाले, शहरात उन्हाळ्यात दिवसभर फिरणाऱ्या गायी, बैल, शेळ्या, मेंढ्या, कुत्री, कावळे, चिमण्या आदिंची पाणी पिण्याची सोय या पाणपोईमुळे झाली. तसेच त्यांचा अधिवास टिकून रहावा यासाठी ही पाणपोई सुरु केली आहे. यासाठी विजयसिंह भोसले, कैलास सुर्यवंशी, हनुमंत पवार, व कार्यकर्ते या पाणपोईत रोज पाणी भरतात. त्यामुऴे प्राणी ठरलेल्या वेळेत सकाळी, दुपारी व संध्याकाळी पाणवठ्यावर येत असल्याचे भोसले यांनी सांगीतले.

Web Title: water tank for bird & animal

टॅग्स

संबंधित बातम्या

jail
ट्रक चालकास मारहाण करुन लुटणाऱ्या टोळीस अटक

लोणी काळभोर (पुणे) : हडपसर-सासवड मार्गावरील दिवेघाटात शनिवारी (ता. 22) मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक चालकास मारहाण करुन लुटणाऱ्या पाच जणांच्या...

crime
अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार

लोणी काळभोर (पुणे) : मोबाईलवर गेम खेळण्यासाठी मोबाईल फोन देण्याच्या बहाण्याने कदमवाक वस्ती (ता. हवेली) येथील एका चार वर्षीय अल्पवयीन मुलावर एका...

Digambar-Shelake
सिआरपीएफ जवानाचा मृतदेह आश्वासनानंतर कुटुंबियांकडून ताब्यात

येवला - मानोरी (ता.येवला) येथील सिआरपीएफ मधील जवान दिगंबर शेळके (वय ४२) रविवारी पहाटे शहीद झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना दिगंबर यांनी गोळी...

sharad pawar
उदयनराजेंना वगळून पवारांच्या घरी आमदारांची बैठक

बारामती (पुणे) : सातारा जिल्ह्याच्या आगामी राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार हे आज स्पष्ट झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या...

crime
दौंड : मेडीकलमध्ये चोरी, 4 लाख 34 हजार रूपयांची रोकड चोरीस

दौंड (पुणे) : दौंड शहराजवळील लिंगाळी (ता. दौंड) येथील पल्लवी मेडीकल मध्ये झालेल्या चोरीत 4 लाख 34 हजार रूपयांची रोकड चोरीस गेली आहे....