Sections

पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी बारामती तालुक्याची प्रतिष्ठा पणाला

विजय मोरे |   सोमवार, 9 एप्रिल 2018
Water Foundation Satyamev Jayate Water Cup competition

राज्यातील 75 तालुक्यातील 4 हजार 30 गावे 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत बक्षीस मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे.

उंडवडी - राज्यात यंदा 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' ही तिसरी 45 दिवसांची स्पर्धा 8 एप्रिलपासून सुरु झाली असून 22 मेला संपणार आहे. या स्पर्धेत बारामती तालुक्यातील 33 गावांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय बक्षीस बारामती तालुक्यातील गावानांच मिळावे, यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, प्रशासन तसेच सर्वच विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांसह सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या स्पर्धेत राज्याच्या नकाशावर बारामतीचं बाजी मारणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. या स्पर्धेत राज्यस्तरीय पहिले बक्षीस 75 लाख, दुसरे 50 लाख, तिसरे बक्षीस 40 लाख तर चौथे तालुकास्तरीय 10 लाख रुपये ठेवण्यात आले आहे. 

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेले नेते व केंद्रीय माजी कृषीमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळे बारामतीला राजकीय पंढरी मानले जाते. त्यामुळे राज्यातील पहिले, दुसरे किंवा तिसरे बक्षीस बारामती तालुक्यात आणण्यासाठी सर्वानीच ताकत लावली आहे. 

राज्यातील 75 तालुक्यातील 4 हजार 30 गावे या स्पर्धेत बक्षीस मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. या स्पर्धेत पाणी बचतीचे विविध उपक्रम, घरातून वाया जाणाऱ्या पाण्यासाठी शोष खड्डे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गावाने रोपवाटिका तयार करुन लोकसंख्येंच्या दुप्पट वृक्षारोपण, जलसंधारणाच्या विविध कामासाठी श्रमदान व लोकसहभागातून यंत्राने विविध कामे, गावाचे माती परिक्षण, काडी पेटी मुक्त शिवार, गावाचे पाण्याचे बजेट, नापेड प्रकल्प, माथा ते पायथा या तंत्राने जलसंधारणाची विविध कामे आदी कामे गुणवत्तापूर्ण करायची आहेत.

Water Foundation

पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत भाग घेतलेली बारामती तालुक्यातील 33 गावे पुढीलप्रमाणे वढाणे, सुपा, काळखैरवाडी, बऱ्हाणपूर, नेपतवळण, भिलारवाडी, पळशी, मासळवाडी, दंडवाडी, आंबी बुद्रुक, काऱ्हाटी, खराडेवाडी, निंबोडी, उंडवडी सुपे, कारखेल, सोनवडी सुपे, कटफळ, मूर्टी, कऱ्हावागज, वाकी, सोरटेवाडी, कन्हेरी, सावंतवाडी गोजुबावी, पानसरेवाडी, लोणी भापकर, जळगाव सुपे, पारवडी, अंजनगाव, गाडीखेल, कांबळेश्वर, शिरवली, सदोबाचीवाडी या गावांचा समावेश आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Water Foundation Satyamev Jayate Water Cup competition

टॅग्स

संबंधित बातम्या

कामठे मित्र मंडळावर येवलेवाडीत कारवाई 

गोकुळनगर, ता. 23 : येवलेवाडीतील कामठे पाटील मित्र मंडळांच्या कार्यकर्त्यांवर ध्वनिप्रदूषणअंतर्गत कोंढवा पोलिस ठाण्याच्या वतीने कारवाई करण्यात आली....

पाच हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त 

पुणे : गुजरातहून आलेल्या खासगी बसमधील तब्बल चार हजार 852 किलो इतका भेसळयुक्त खवा पुणे पोलिसांच्या वाहनचोरी विरोधी पथकाने शुक्रवारी जप्त केला....

India's success in preventing child labor
बालमजुरीला रोखण्यात भारताला यश; अमेरिकेचा दावा

वॉशिंग्टन : जगभरातील चौदा बड्या देशांनी बालमजुरीच्या समस्येचे बऱ्याच अंशी निराकरण केले असून, यामध्ये भारताचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली...

रिकर्व्ही बेसविरोधात सुप्रिम कोर्टात जाणार : राजू शेट्टी 

कऱ्हाड : एफआरपी वाढवली असे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांच्या खिशातुन 144 रुपये 50 पैसे काढुन घेतले जाणार आहेत. एफआरपीचा बेस साडेनऊवरुन दहा टक्के...

सहकारामध्ये मनाला वाट्टेल तशी लुडबुड सरकारने करू नये : दिलीप माने

मोहोळ: सहकाराबद्धल कायद्यात पुर्ण तरतुद असताना सरकारने त्यामध्ये मनाला वाट्टेल तसा अर्थ काढुन सहकारमध्ये लुडबुड करू नये असे स्पष्ट मत...