Sections

पुण्यात 'राँग साईड'ने आलात, तर टायरच होणार पंक्चर!

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 31 मार्च 2018

पुणे : अॅमनोरा टाउनशिपमध्ये 'नो एन्ट्री'तून येणा-या वाहनांसाठी टायर किलर यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे जर वाहन एंट्री असलेल्या दिशेने गेले तर या यंत्रणेला बसवलेले चार इंची धारदार लोखंडी काटयांची स्प्रिंग खाली दबते. यावेळी टायर किलर स्पीडब्रेकरचे काम करतो. मात्र 'नो एन्ट्री'तून जर वाहन आले तर वाहनाचा संपूर्ण टायर मध्ये हे चार इंची लोंखडी काटे घुसतात व टायर 'बर्स्ट' होतो. तसेच वाहनदेखील पुढे घेवून जाता येत नाही. त्यामुळे येथील बेशिस्त वाहनचालकांवर चांगलाच अंकूश बसला आहे.

Web Title: Tyre killers installed at Amanora Park Town in Pune to stop wrong side driving

टॅग्स