Sections

प्लास्टिकबरोबरच थर्माकॉलच्या वस्तूही बाजारातून हद्दपार

मिलिंद संगई |   गुरुवार, 26 एप्रिल 2018
thermocol

बारामती (पुणे) : प्लॅस्टिकबंदीच्या शासनाच्या निर्णयानंतर आता हळुहळू बाजारातील प्लॅस्टिक कॅरिबॅग हद्दपार होऊ लागल्या आहेत. इतकेच नाही तर थर्माकोलच्या वस्तूही आता विक्रेत्यांना मिळत नसल्याने आपोआपच या वस्तूंची जागा पुर्नवापर करता येईल अशा वस्तूंनी घेतली आहे. 

बारामती (पुणे) : प्लॅस्टिकबंदीच्या शासनाच्या निर्णयानंतर आता हळुहळू बाजारातील प्लॅस्टिक कॅरिबॅग हद्दपार होऊ लागल्या आहेत. इतकेच नाही तर थर्माकोलच्या वस्तूही आता विक्रेत्यांना मिळत नसल्याने आपोआपच या वस्तूंची जागा पुर्नवापर करता येईल अशा वस्तूंनी घेतली आहे. 

शासनाने प्लॅस्टिक कॅरिबॅगवर बंदी आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता दुकानदारांनीही ग्राहकांना स्वताःच्या कापडी किंवा कागदी पिशव्या आणण्याच्या सूचना केलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कॅरिबॅगचा वापर होऊ नये या साठी दुकानदारांच्या पातळीवरच काळजी घेतली जात आहे.  दरम्यान लग्नासह इतर कार्यात लागणा-या थर्माकोलच्या प्लेट, वाट्या गायब झाल्या असून आता पुन्हा पत्रावळी व कागदी डिशला मागणी वाढली आहे. बारामतीतील जवळपास सर्वच दुकानदारांनी या वस्तूंची विक्रीच थांबवल्याने ग्राहकांनाही आता पत्रावळी किंवा कागदी डिशकडे वळण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. 

ग्राहकांनी खरेदीला येताना स्वताःची पिशवी आणली तर त्यांची गैरसोय होणार नाही, त्या मुळे प्लॅस्टिक बंदीबाबत ग्राहकांचे सहकार्य गरजेचे असल्याचे दुकानदारांनी नमूद केले. 

Web Title: thermacol is also also boycott with plastic from market

टॅग्स

संबंधित बातम्या

Anpatwadi
अनपटवाडी...मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी

वाई - लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवून अनेक पुरस्कार मिळवलेल्या अनपटवाडी (ता. वाई) हे गाव आता मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी ठरले...

नांदेड - साईप्रसाद प्रतिष्ठानतर्फे शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना दररोज मोफत जेवण दिले जाते.
गरजू, अनाथांचा आधार ‘साईप्रसाद’!

नांदेड - दानशूरांचे दातृत्व व स्वयंसेवकांचे श्रम या बळावर ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’चे सामाजिक कार्य उत्तरोत्तर सुरूच आहे. रंजल्या-गांजलेल्यांसाठी आधारवड...

latur
आईच्या चितेच्या बाजूलाच मुलाने घेतले जाळून

लातूर- आईच्या चिता जळत असताना तिच्या बाजूला स्वतःला जाळून घेत मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील चोबळी रस्त्यावरील शिरूर...

सप्तपदीने दिले तिला बळ

खडकवासला - लग्न ठरल्यानंतर तृप्ती पेंडा यांना मज्जारज्जूशी संबंधित गंभीर आजार आहे, ही बाब चाचण्यांमधून निष्पन्न झाली. सर्व आयुष्य त्यांना व्हीलचेअरवर...

Marriage
विवाह संस्था ४५०० वर्षांपासून

पुणे - हरियानामधील राखीगडी येथील दफनभूमीत केलेल्या उत्खननात इसवीसनपूर्व चार हजार ते साडेपाच हजार वर्षांपूर्वीच्या स्त्री व पुरुषाचे एकत्रित सांगाडे...

mrunalini kelkar
ड्रेस कोड (मृणालिनी केळकर)

"मग अशा परिस्थितीत मॅनेजिंग कमिटीच्या विरुद्ध जाणं म्हणजे संकटाला आमंत्रण. कदाचित नोकरीही जाऊ शकते आणि आपल्याला ते परवडणार आहे का? देशात बेकारी काय...