Sections

वालचंदनगरच्या महाराज प्रतिष्ठानतर्फे तोरणा किल्यावर स्वच्छता मोहिम

राजकुमार थोरात |   बुधवार, 25 एप्रिल 2018

वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील महाराज प्रतिष्ठानच्या युवकांनी  तोरणा किल्यावर एकदिवसीय स्वच्छता मोहिम राबवून किल्लावरती कचरा न करण्याचे आवाहन केले. 

वालचंदनगर येथील महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबलू पवार यांनी वालचंदनगर, रणगाव, कळंब परीसरातील युवकांना एकत्र घेऊन महाराज प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातुन राज्यातील किल्यावर साफसफाई माेहिम राबविण्याचे नियोजन केले अाहे. इंदापूर तालुक्यातील सुमारे २०० युवकांनी एकत्र जावून तोरणा किल्यावर  पडलेल्या पाण्याच्या मोकळ्या  प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, रिकामे ग्लास, पालापाचोळा गोळा केला.

किल्याच्या परीसरामध्ये  अनेक  युवकांनी ठिकाणी दगडी शिळांवर लिहिलेले अवाचनीय संदेश  खोडून  टाकण्याचा उपक्रम राबिवला. किल्यावरील सुका कचरा जाळून टाकला. तर ओला कचरा जमिनीत गाडला. या उपक्रमामध्ये जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, राहुल रणमोडे,अनिकेत रणमोडे,किशोर हगवणे यांच्यासह शेकडाे युवक सहभागी झाले होते. 

किल्ले ,गड महाराष्ट्राची शान... जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांनी सांगितले की, राज्यातील किल्ले,गड हे महाराष्ट्राची शान आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठवणी  प्रत्येक किल्यामध्ये अाहेत. महाराज प्रतिष्ठान ने सुरु केलेली किल्यांची स्वच्छा  मोहिम कौतुकास्पद असून जास्तीजास्त युवकांनी यामध्ये सहभागी होवून किल्यांच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न कण्याचे आवाहन करावा. मी ही प्रत्येक मोहिमेमध्ये सहभाग घेणार असल्याचे सांगितले.

Web Title: swachhata abhiyan on Fort torna

टॅग्स

संबंधित बातम्या

सतीश काकडे साताऱ्यातील कारखान्यांना घाम फोडणार? 

सोमेश्वरनगर : फलटण (जि. सातारा) तालुक्यातील शरयू, स्वराज अशा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिलेली नाही. 15 ऑक्टोबरपर्य़ंत कारखान्यांनी...

भाजपने देशावर संविधान बचावची वेळ आणली - राष्ट्रवादी महिला काँग्रेस 

कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी...

junnar
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटूंबास आर्थिक मदत

जुन्नर : तांबे (ता. जुन्नर) येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून तान्हाजी सीताराम मिंढे या शेतकऱ्याने 31 ऑगस्टला आत्महत्या केल्याची घटना घडली...

Raj Thackeray greets Manmohan Singh on his birthday
माझ्या सकट, भारतीयांना तुमच्या ज्ञानाची उणीव भासते- राज ठाकरे

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनमोहन सिंग यांना आपल्या खास शैलीत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. राज...

abab bagul
कुसंगतीने भरकटलेल्या तरुणाईला मिळणार दिशा 

पुणे : मजेखातर अथवा 'थ्रिल' म्हणून अजाणत्या वयात काही मुले-मुली पोलिस स्टेशनची पायरी चढतात. पोलिस दफ्तरी गुन्हे दाखल झालेल्या १५ ते २५ वयोगटातील तरुण...