Sections

"यिन'तर्फे राज्यात "समर यूथ समिट' 

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 12 मे 2018

पुणे - समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'(यिन) या युवा व्यासपीठाने आयोजित केलेल्या "यिन समर यूथ समिट'ला येत्या बुधवारपासून (ता. 16) सुरवात होत आहे. मुंबईत होणाऱ्या तीन दिवसांच्या पहिल्या परिषदेनंतर राज्यातल्या अन्य अकरा शहरांमध्ये या परिषदा होणार आहेत. 

युवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग, स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी देताना भविष्यातील शैक्षणिक संधींचा वेध या परिषदांतून घेतला जाणार आहे. 

पुणे - समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'(यिन) या युवा व्यासपीठाने आयोजित केलेल्या "यिन समर यूथ समिट'ला येत्या बुधवारपासून (ता. 16) सुरवात होत आहे. मुंबईत होणाऱ्या तीन दिवसांच्या पहिल्या परिषदेनंतर राज्यातल्या अन्य अकरा शहरांमध्ये या परिषदा होणार आहेत. 

युवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग, स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी देताना भविष्यातील शैक्षणिक संधींचा वेध या परिषदांतून घेतला जाणार आहे. 

तरुण पिढीला शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करताना समाज व देशासाठी रचनात्मक काम उभे करण्यास प्रेरणा मिळावी, हा या परिषदांमागचा प्रमुख हेतू आहे. 

कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, नागपूर, नाशिक, अकोला, नगर, औरंगाबाद, नांदेड आणि जळगाव येथे 16 जूनला या परिषदा होणार असून, दहावीनंतरचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या परिषदांमध्ये सहभागी होऊ शकतील. 

स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी या परिषदांसाठी मुख्य प्रायोजक आहेत. पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग असणाऱ्या या परिषदांसाठी पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सुहाना मसाले, अभि ग्रुप ऑफ कंपनीज हे सहप्रायोजक आहेत. 

गेल्या तीन वर्षांपासून "यिन' या पद्धतीच्या शिबिराचे आयोजन करत असून, या आधीच्या शिबिरांमध्ये राज्यभरातील अनेक नामवंतांनी तरुणांना मार्गदर्शन केले आहे. 

या परिषदांच्या निमित्ताने अडथळ्यांवर मात करून सात विविध क्षेत्रांमध्ये रचनात्मक काम करणाऱ्या तरुणांचा "यिन'च्या वतीने "यूथ इन्स्पिरेटर्स अवॉर्ड-18' देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच भविष्यातल्या शिक्षणाच्या संधी, बदललेले अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि करिअरच्या विविध संधींबाबत विद्यार्थी आणि पालकांना योग्य मार्गदर्शन करणारा "एज्युस्पायर ऍडमिशन एक्‍स्पो'ही परिषदेच्या ठिकाणी होणार आहे. भविष्यातल्या तंत्रज्ञानाचा वेध घेणारा "एक्‍स्पिरियन्स झोन' हे या एक्‍स्पोचे वैशिष्ट्य असेल. 

नोंदणी केल्यानंतर मिळणार...  वार्षिक स्मरणिका स्वरूपात दैनंदिनी, ओळखपत्र, प्रमाणपत्र  गोयल गंगा ग्रुपतर्फे निनाद बेडेकर, शिव प्रसाद मंत्री व डॉ. सुनील डोके लिखित "छत्रपती शिवाजी महाराज' व "पहिले बाजीराव पेशवे यांची कालातीत व्यवस्थापन तत्त्वे' ही पुस्तके मिळणार आहेत. 

"यिन'च्या "समर यूथ समिट'मध्ये युवकांना भावी आयुष्यासाठी नवी दिशा मिळेल. या कार्यक्रमात मिळणाऱ्या ज्ञानाचा युवकांना पुरेपूर फायदा होईल. स्वतःच्या प्रगतीबरोबर समाज व राष्ट्राची प्रगती करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन सक्षम भारत घडवावा. "समिट'च्या यशासाठी "पीसीईटी' परिवारातर्फे शुभेच्छा. ज्ञानेश्‍वर लांडगे, चेअरमन, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट 

उद्योग, आरोग्य, करिअर, तंत्रज्ञान, विज्ञान, चित्रपट, खेळ, कला, मनोरंजन आदी क्षेत्रांतील यशस्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन "यिन'च्या माध्यमातून एकप्रकारे क्रांती होत आहे. तरुणाईत असलेली अफाट ताकद योग्य दिशेने नेली तर नक्कीच उद्याचा आदर्श समाज घडण्यास मदत होईल. समाज उत्थानाचे हे कार्य आपण सर्व मिळून पुढे नेऊया. डॉ. जितेंद्र जोशी, व्यवस्थापकीय संचालक, अभि ग्रुप ऑफ कंपनीज 

Web Title: Summer Youth Summit in the state by Yin

टॅग्स

संबंधित बातम्या

सांगलीत 'यिन'कडून तरुणाईला 'सेफ्टी ड्राईव्ह'चा संदेश

सांगली : वाऱ्याच्या वेगाने बाईक्‍सवरून थरार करत जाणाऱ्या तरुणाईला आज युवक दिनानिमित्त सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या अन्‌ स्वत:बरोबरच इतरांच्या...

"खानदेश यिन फेस्टिव्हल'ची उत्सुकता शिगेला 

जळगाव ः "सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व्यासपीठांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी "सकाळ-खानदेश यिन...

‘यिन’चे सदस्य उमेदवारी अर्ज भरताना.
पुणे, पिंपरी व जिल्ह्यात होणार ‘यिन’ची प्रतिनिधी निवड

पुणे - महाविद्यालयीन तरुणाईतील बुद्धिमत्ता व सर्जनशीलतेला वाव देऊन त्यांच्यात नेतृत्वगुण तयार करणाऱ्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या नेतृत्व विकास...

जीवनदायिनी नद्या जीव घेऊ लागल्या - डॉ. अवचट

कोल्हापूर - जीवनदायिनी ठरलेल्या आणि कितीही मोठे महापूर पचवणाऱ्या नद्याच आता लोकांचे जीव घेऊ लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आपल्या चुकांबाबत...

live photo
"सकाळ यिनर्स'ने केले निर्माल्य संकलन 

जळगाव : "सकाळ माध्यम समूहा'च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व्यासपीठांतर्गत जिल्हा पोलिस दलाच्या सहकार्याने "यिनर्स'ने गणेश विसर्जनादरम्यान...

दोन टन निर्माल्याचे झाले संकलन 

सातारा - "सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातर्फे अनंत चतुर्दशीला येथील संगम माहुली (ता....