Sections

एसटीचीही ‘स्लीपर कोच’

सकाळ वृत्तसेवा |   गुरुवार, 26 एप्रिल 2018
ST

पुणे - एसटी महामंडळाची स्लीपर कोच सेवा राज्यातील प्रमुख शहरांदरम्यान आणि राज्याबाहेरील काही शहरांतही येत्या १५ दिवसांत सुरू होणार आहे. पुण्यातून गोवा, नागपूर, नांदेडसाठी ही बससेवा सुरू होईल. पहिल्या टप्प्यात पुण्यातून गोव्यासाठीची बससेवा चार दिवसांत सुरू होणार आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी एसटी महामंडळाने खासगी- सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) १५० बस घेतल्या आहेत. 

पुणे - एसटी महामंडळाची स्लीपर कोच सेवा राज्यातील प्रमुख शहरांदरम्यान आणि राज्याबाहेरील काही शहरांतही येत्या १५ दिवसांत सुरू होणार आहे. पुण्यातून गोवा, नागपूर, नांदेडसाठी ही बससेवा सुरू होईल. पहिल्या टप्प्यात पुण्यातून गोव्यासाठीची बससेवा चार दिवसांत सुरू होणार आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी एसटी महामंडळाने खासगी- सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) १५० बस घेतल्या आहेत. 

राज्याचे परिवहनमंत्री दिवाकरराव रावते यांनी ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार एसटीने या सेवेचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात गर्दीच्या मार्गावर आणि प्रामुख्याने ७०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी बससेवा सुरू होईल. या बस वातानुकूल (एसी) असतील. त्यात मोबाईल चार्जर, वाय-फाय आदी सुविधा असतील, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक राजकुमार पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

सुमारे आठ ते नऊ तासांपेक्षा जास्त प्रवासासाठी स्लीपर कोच बससेवा सध्या उपलब्ध आहे. त्यात राज्यातील प्रमुख मार्गांवर सध्या खासगी प्रवासी बस वाहतूकदारांची मक्तेदारी आहे. यामुळे एसटी महामंडळाचे प्रवासी खासगी बससेवेकडे जात असल्याचे चित्र आहे. त्यातून निर्माण झालेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी एसटीने स्लीपर कोच सेवा सुरू करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी १५० बस सार्वजनिक खासगी भाडेतत्त्वावर घेतल्या आहत. प्रवाशांना आरामशीर आणि किफायतशीर दरात सेवा पुरविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. 

ऑनलाइन पद्धतीने तसेच एसटी महामंडळाच्या अधिकृत एजंटांकडे या बससेवेसाठी आरक्षण करता येईल. प्रामुख्याने या बस प्रवाशांसाठी रात्री उपलब्ध असतील. एसटी महामंडळाने या पूर्वीही नागपूर, हैदराबाद, बंगळूर आदी मार्गांवर स्लीपर कोच बससेवेचा प्रयोग तीन वर्षांपूर्वी केला होता; परंतु खासगी बसच्या स्पर्धेपुढे त्यांचा टिकाव लागला नव्हता. या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाने पुन्हा एकदा ही बससेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.  

या मार्गांवर सुरू होणार बससेवा  मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर, मुंबई-हैदराबाद, मुंबई-बंगळूर, पुणे-नांदेड, पुणे-पणजी, नागपूर-हैदराबाद, पुणे-शहादा (पुणे-पणजी बससेवा पुण्यातून चार दिवसांत सुरू होणार)

Web Title: st sleeper coach service

टॅग्स

संबंधित बातम्या

#FamilyDoctor अपस्मार

आयुर्वेदात रोगांचे स्वरूप समजावताना ‘वेग’ अशी एक संकल्पना सांगितलेली जाते. या ठिकाणी वेग शब्दाने ‘जलद गती’ या अर्थाबरोबर ‘रोगाचा पुन्हा पुन्हा...

PNE18O75038.jpg
बाइकवरून जाताना रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई आवश्‍यक 

पुणे : कर्वे रस्त्यावरील मयूर कॉलनीजवळ एक बाइकचालक सतत रस्त्यावर थुंकत चालला होता. सध्या शहरात रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. गाडी...

PNE18O75031.jpg
नदीपात्र बुजवण्याचा प्रयत्न 

पुणे : बाणेर येथे मुळा नदीपात्र बुजवण्याचा प्रयत्न होत आहे. याची दखल महापालिका घेताना दिसत नाही. हा प्रकार असाच चालू राहिला तर एक दिवस या नद्या...

PNE18O75037.jpg
पादचारी मार्ग मोकळा

पुणे : आरटीओ चौकातील पादचारी मार्गात राडारोडा, चिखल, माती, दगडी असल्याने नागरिकांना पादचारी मार्गावर अडथळा असल्याची बातमी "सकाळ संवाद'च्या माध्यमातून...

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; भोकर तालुक्यातील घटना

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोळगाव (ता. भोकर) शिवारात शनिवारी (ता....

नापिकीला कंटाळुन शेतकऱ्याची आत्‍महत्या

हिंगोली- कळमनुरी तालुक्‍यातील येहळेगाव गवळी येथील एका शेतकऱ्याने सततच्या नापीकीमुळे बँकेचे कर्ज कसे  फेडावे म्‍हणून शेतात लिंबाच्या झाडाला...