Sections

दहावीच्या विद्यार्थ्यांना बसणार सुखद धक्का? 

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 2 एप्रिल 2018
balbharti

पुणे - दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या हातात पडणार आहेत. त्यामुळे दरवर्षी पाठ्यपुस्तके मिळण्यास होणाऱ्या विलंबाच्या पार्श्‍वभूमीवर "बालभारती'कडून पुस्तके वेळेत देण्याचा सुखद धक्का विद्यार्थी-पालकांना मिळणार आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेची तयारी एप्रिलपासूनच करता येणार आहे. 

पुणे - दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या हातात पडणार आहेत. त्यामुळे दरवर्षी पाठ्यपुस्तके मिळण्यास होणाऱ्या विलंबाच्या पार्श्‍वभूमीवर "बालभारती'कडून पुस्तके वेळेत देण्याचा सुखद धक्का विद्यार्थी-पालकांना मिळणार आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेची तयारी एप्रिलपासूनच करता येणार आहे. 

काही शाळांचे दहावीचे नव्या वर्षाचे वर्ग या महिन्याच्या पहिल्या तर काही शाळांचे वर्ग दुसऱ्या आठवड्यात सुरू होत आहेत. मात्र, पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध झालेली नाहीत. पाठ्यपुस्तके वेळेत उपलब्ध करून देण्यात येतील, असे "बालभारती'च्या वतीने दरवर्षी सांगण्यात येते, मात्र ही पुस्तके वेळेत उपलब्ध होत नाहीत. नववीची वार्षिक परीक्षा संपताच विद्यार्थ्यांचा दहावीचा अभ्यास सुरू होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकही बाजारात पुस्तके येण्याची वाट पाहत असतात. 

यावर्षी दहावीसह पहिली आणि आठवीचा अभ्यासक्रम बदला आहे. ज्ञानरचनावाद या रचनेनुसार अध्यापन सुलभ व्हावे, अशा दृष्टीने नव्या अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. यापूर्वीचा अभ्यासक्रम घोकंपट्टी, पाठांतरावर भर असणारा होता. आता कृतिशील आणि उपाययोजना यावर आधारित अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आता दहावीसह आठवीच्या विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाचा धडा वाचल्यानंतर; "तुम्हाला काय संदेश मिळाला', "तुमचे मत सांगा', "...याचे महत्त्व तुमच्या शब्दांत मांडा', "तुम्ही केलेली निरीक्षणे नोंदवा', अशा स्वरूपाचे प्रश्‍न धड्याखाली विचारल्याचे दिसणार आहे. इयत्ता आठवी आणि पहिलीची बदललेल्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकेही टप्प्याटप्याने बाजारात येतील, असे सांगण्यात आले आहे. 

""दहावीच्या पाठ्यपुस्तकाचे वितरण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. दहावीच्या सर्व माध्यमांची सर्व पाठ्यपुस्तके "बालभारती'च्या राज्यातील दहा डेपोमध्ये येत्या मंगळवार (ता.3)पासून वितरकांसाठी उपलब्ध होतील. वितरकांमार्फत पाठ्यपुस्तकांची खरेदी झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत ही पुस्तके बाजारपेठेत येतील.'', - सुनील मगर, संचालक, बालभारती 

Web Title: ssc student books timings from Bal Bharti pune

टॅग्स

संबंधित बातम्या

ध्यास प्रदूषण मुक्तीचा !

पुणे : पुण्यातील प्रदुषण दिवसेंदिवस वाढत आहे.  पुण्यात काही तरुण सायकल चालवत प्रदूषण मुक्तीचा संदेश पुणेकरांना देत आहे. प्रदुषणमुक्त पुणे...

Tamhini-Ghat
ताम्हिणी घाटाच्या कामाला मुहूर्त

पुणे - चांदणी चौक ते माणगाव (जि. रायगड) हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) हस्तांतरित...

Mohan Bhagawat speak about ram mandir
'राममंदिर व्हावे, ही संघाची इच्छा; आरक्षणाला विरोध नाही'

नवी दिल्ली - अयोध्येत भव्य राममंदिराची निर्मिती लवकरात लवकर व्हायला पाहिजे, असे स्पष्ट करतानाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी, जम्मू-काश्‍मीरबाबतचे...

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, बुधवार पेठ - ‘तंदुरुस्त बंदोबस्त’ उपक्रमाअंतर्गत पोलिस कर्मचाऱ्यांना चिक्कीवाटप करताना शिवाजी बोडखे, गिरीश देशपांडे, हेमंत रासने, निधी सरदेसाई व अन्य पदाधिकारी.
पोलिस कर्मचाऱ्यांना चिक्कीवाटप

पुणे - गणेशोत्सवात पोलिस कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी ‘सकाळ’ व ‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे रॉयल’ यांच्यातर्फे ‘तंदुरुस्त बंदोबस्त’ उपक्रम...

मुले मातृभाषेपासून दुरावत आहेत : राज्यपाल सी. विद्यासागर राव 

मंबुई : इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे लहान मुले हळूहळू मातृभाषेपासून दुरावत चालली आहेत. बालसाहित्य अधिकांश इंग्रजी भाषेतून निर्माण होत आहे....