Sections

पुणे - खराडीत महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट 

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 11 मे 2018
kharadi

वडगाव शेरी (पुणे) : खऱाडीतील झेन्साक कंपनीसमोरील पदपथालगच्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरचा दुपारी स्फोट झाला. त्यावेळी जवळच चहा पीत उभे असलेले  संगणक अभियंता तरूण आणि तरूणी गंभीररित्या भाजले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरूणाचे नाव पंकज खुने (वय 26, मुळ गाव वर्धा) आणि प्रियंका झगडे (वय 24, मुळ गाव सातारा) असे तरूणीचे नाव आहे. तरूण अधिक गंभीररित्या भाजला असून दोघांनाही पुण्यातील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. प्राथमिकरित्या मिळालेल्या माहितीनुसार दोघेही ट्रायमॅक्स या माहिती तंत्रज्ञान कंपनीत काम करतात. दोघेही चहा पिण्यासाठी कंपनीबाहेर आले होते.

कंपनीच्या बाहेर रस्त्यालगत काही खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत. तेथील एका स्टॉलवर ते चहा पीत उभे होते. इतक्यात ट्रान्सफॉर्मरचा मोठा स्फोट झाला. त्यातील उकळते तेल तरूण आणि तरूणीच्या अंगावर उडाले आणि पाठोपाठ मोठा आगीचा लोळ पसरला. 

समोरील काही तरूणांनी धाडस दाखवत तरूण आणि तरूणीला गाडीत टाकून जवळील खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना पुण्यातील रूग्णालयात उपाचारासाठी नेण्यात आले. अग्नीशामक दलाच्या गाड्यांनी अर्ध्या तासाने येऊन आग विझवली. 

ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला त्यापासून काही अंतरावर महावितरणचे कर्मचाऱी वीजवाहिन्यांतील बिघाड दुरूस्त करीत होते. मात्र त्या दुरूस्तीचा आणि स्फोटाचा काही संबंध आहे का, हे समजु शकले नाही. 

Web Title: spot of light transformer in kharadi pune

टॅग्स

संबंधित बातम्या

Beaten By A Woman Nakedness In Nagar Shrigonda incident
महिलेस विवस्त्र करून मारहाण: कोणी न्याय देता का न्याय?

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील दलित, आदिवासी, भटके विमुक्तांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीत. मागील काही वर्षापासून अशा...

मिठाने पाडतो पाऊस, संशोधक डॉ. राजा मराठे यांचा दावा 

औरंगाबाद - खोळंबलेले ढग पाऊस रुपाने खाली आणण्यासाठी संशोधक डॉ. राजा मराठे यांनी यशस्वी प्रयोग केले आहेत. अवघे दोन टायर जाळून त्यावर पन्नास किलो मिठ...

Petrol
इंधन दरवाढीचा आगडोंब 

नवी दिल्ली - देशभरात इंधन दरवाढीने सामान्य नागरिकांची होरपळ सुरूच असून, मंगळवारी पुन्हा इंधनदरात वाढ करण्यात आली. मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९०...

सोलापूर - शहराला आता नियमित पाणी

सोलापूर - शहरातील नागरिकांना दररोज पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारकडे 1. 87 टिएमसी (62.98 दलघमी) अतिरिक्‍त पाण्याची मागणी केली आहे. जून 2018...

File photo
गोंडपिपरीच्या भूमिपुत्राला अमेरिकेकडून दहा कोटींचे अनुदान

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सुदर्शन कुरवडकर यांच्या एका प्रकल्पाला अमेरिकन सरकारने तब्बल...