Sections

शिवशाही बस विनाचालक रस्ता सोडून पळाली अन्...

डी. के. वळसे पाटील |   शनिवार, 7 एप्रिल 2018
भोरवाडी (ता. आंबेगाव) : पुणे नाशिक रस्ता सोडून 800 फूट अंतरावर झाडाच्या फांद्याना अडकून थांबलेली शिवशाही बस.

मंचर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ असलेल्या भोरवाडी (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता. 7) पहाटे अडीचच्या सुमारास शिवशाही बस रस्ता सोडून 800 फूट अंतरावर असलेल्या झाडाला धडक देऊन थांबली. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. चालकाच्या शेजारी असलेल्या खिडकीचा दरवाजा अचानकपणे उघडल्याचे पाहून दरवाजा बंद करण्याच्या प्रयत्नात चालक एसटीतून बाहेर फेकला गेला. विनाचालक एसटी रस्ता सोडून एका धाब्याला धडक देऊन शेतातून पुढे गेली. झाडाच्या फांदीला अडकली. चालकासह दोन जण जखमी आहेत. सुदैवाने शिवशाहीतील 25 प्रवासी सुखरूप आहेत.

मंचर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ असलेल्या भोरवाडी (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता. 7) पहाटे अडीचच्या सुमारास शिवशाही बस रस्ता सोडून 800 फूट अंतरावर असलेल्या झाडाला धडक देऊन थांबली. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. चालकाच्या शेजारी असलेल्या खिडकीचा दरवाजा अचानकपणे उघडल्याचे पाहून दरवाजा बंद करण्याच्या प्रयत्नात चालक एसटीतून बाहेर फेकला गेला. विनाचालक एसटी रस्ता सोडून एका धाब्याला धडक देऊन शेतातून पुढे गेली. झाडाच्या फांदीला अडकली. चालकासह दोन जण जखमी आहेत. सुदैवाने शिवशाहीतील 25 प्रवासी सुखरूप आहेत.

चालक मोहन सोनाजी भिसे (सध्या नाशिक अगार, रा. अकोला) व प्रवासी निलेश वाघ (रा. धुळे) अशी जखमींची नावे आहेत. नाशिक बसस्थानकातून रात्री 11 वाजता शिवशाही बस (एम.एच.06. बी. डब्ल्यू. 647) पुण्याला जाण्यासाठी निघाली. चालकासह 27 जण बस मधेय होते. भोरवाडी जवळ असलेल्या चौपाद्रीकरण मार्गावर बसने प्रवेश केला. चालक मोहन भिसे म्हणाले, “रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या कठड्याला शिवशाहीचा धक्का बसल्याने अचानकपणे माझ्या केबिनच्या खिडकीचा दरवाजा उघडला गेला. बस वातानुकुलीत असल्यामुळे दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करत असताना माझा तोल गेल्याने मी गाडीतून बाहेर फेकलो गेलो. त्या नंतर गाडी रस्ता सोडून प्रथम पिराच्या दर्ग्याजवळ असलेल्या धाब्याला धडक देऊन शेतात असलेला मुरमाचा ढिग ओलांडून पुढे गेली.”

धावत्या बस मधून जीव वाचवण्यासाठी वाघ यांनी चालकाच्या केबिनच्या उघड्या असलेल्या दरवाजातून बाहेर उडी मारली. बस झाडाच्या फांद्यांना जाऊन अडकली. अनेक प्रवासी झोपेतच होते. खाच खळग्यातून बसने हेलकावे खाल्ले. त्यामुळे प्रवाशांना जाग आली. प्रवाशांनी घाबरून आरडाओरड केला. अपघाताचा आवाज आल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ व ढाब्यावरील कामगार मदतीसाठी धावून आले. प्रवाशांनी मोबईलद्वारे पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती कळवली. मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार मारुती मांजरे, पोलिस हवालदार सुरेश जाधव यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन प्रवाशांना धीर दिला. अन्य एसटीतून प्रवाशांना पुण्याला पाठविण्याची व्यवस्था केली.

जखमी वाघ व भिसे यांना मंचर येथील सिद्धी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. शिवशाहीच्या काचा फुटल्या असून, पुढील भागाचे व धाब्याचे नुकसान झाले आहे. झोपेचा डूलका लागल्यामुळे शिवशाही चालकाचा ताबा सुटल्याने बसने रस्ता सोडला. अपघात होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने बस मधून उडी मारली. अशी चर्चा अपघात स्थळाच्या ठिकाणी नागरिकांमध्ये सुरु होती.

Web Title: shivshahi st bus accident near manchar pune

टॅग्स

संबंधित बातम्या

pali
रायगड : सुधागड तालुक्यात मतदान शांततेत

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील 7 सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रक्रीया बुधवारी शांततेत पार पडली. दुपारी दिड वाजेपर्यंत एकूण 31.50 टक्के...

भाजपने देशावर संविधान बचावची वेळ आणली - राष्ट्रवादी महिला काँग्रेस 

कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी...

मालवण येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

मालवण - शहरातील बसस्थानक नजीकच्या समाजमंदिर परिसरात राहणाऱ्या हर्षदा रामचंद्र मालवणकर (वय - २०) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आज सकाळी साडे अकरा...

abab bagul
कुसंगतीने भरकटलेल्या तरुणाईला मिळणार दिशा 

पुणे : मजेखातर अथवा 'थ्रिल' म्हणून अजाणत्या वयात काही मुले-मुली पोलिस स्टेशनची पायरी चढतात. पोलिस दफ्तरी गुन्हे दाखल झालेल्या १५ ते २५ वयोगटातील तरुण...

मोबाईल, बँकेत 'आधार' अनिवार्य नाही : सर्वोच्च न्यायालय 

नवी दिल्ली : शाळा प्रवेश, बँक खाते उघडणे आणि नव्या मोबाईल कनेक़्शनसाठी 'आधार कार्ड' असणे अनिवार्य नसल्याचा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने...