Sections

संगीत स्नेहसंमेलन उत्साहात

रमेश मोरे |   मंगळवार, 27 मार्च 2018
udan

जुनी सांगवी - रिदम अॅकॅडमी व कलाश्री संगीत मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन नटसम्राट निळूभाऊ फुले रंगमंदिरामध्ये उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरवातीला शाश्वती चव्हाण यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग मधुवंती व भजन सादर करून रसिक श्रोत्यांची त्यांनी मने जिंकली. त्यांना तबला साथ नंदकिशोर ढोरे व हार्मोनियम साथ गंगाधर शिंदे यांनी केली. त्यानंतर कथक नृत्यांगना प्रिया बिरारी यांनी  गणेशवंदना सादर केली. त्यानंतर अकादमीच्या सर्व बालचमूंनी आपल्या गायन व नृत्य कौशल्याने  रसिकांना मंत्रमुग्ध केले. 

कार्यक्रमात ५० कलाकारांनी सहभाग घेतला. यावेळी कै. रुख्मिणी बाई पांडुरंग शिराळकर(राजोपाध्ये) यांच्या स्मरणार्थ "साधक"हा पुरस्कार कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक पंडित सुधाकर चव्हाण यांना शिराळकर (राजोपाध्ये) परिवारा तर्फे प्रदान करण्यात आला. तसेच ग्लोविंग ब्रेन वेलनेस अकॅडेमीचे संस्थापक राजेश खेले यांच्या तर्फे दिला जाणारा "समर्थ समृद्ध राष्ट्र पुरस्कार" प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांना प्रदान करण्यात आला. तसेच "मोस्ट प्रॉमिसिंग म्युझिकडायरेक्टर" हा पुरस्कार प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर प्रशांत ओहोळ यांना प्रदान करण्यात आला. 

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन अवधूत वाडकर  उपस्थित होते. रिदम अकॅडेमिचे विद्यार्थी चित्रकार पूर्वेश चव्हाण व श्रावणी कदम यांनी रेखाटलेली चित्रे सुबोध भावे व अवधूत वाडकर याना भेट म्हणून देण्यात आली. या स्नेहसंमेलनास वाहतूक पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, जवाहर ढोरे, हिरेन सोनावणे, सुहास राजोपाध्ये आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कांचन पांचाळ व श्वेता सावंत यांनी केले.

Web Title: sangvi pune performimg art subodh bhave award

टॅग्स

संबंधित बातम्या

WhatsApp-Image-2018-09-20-a.jpg
इंदापूरमध्ये मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र साजरा

इंदापूर : येथील शास्त्री चौकातील नवजवान मित्र मंडळ तसेच शेख मोहल्ला मोहरम कमिटीच्या वतीने एकत्रित गणेशोत्सव तसेच ताबूत साजरा करण्यात आला....

संगमेश्‍वरचा चित्रकार कोल्हापुरात झळकणार 

साडवली - पुणे सेंट्रल रेल्वे विभागाच्या पुढाकाराने कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे रुपडे पालटण्याचे काम सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवाजी...

dengue
उल्हासनगरात डेंग्यूचे 26 संशयित रुग्ण

उल्हासनगर : साथीच्या आजारावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवणारे उल्हासनगर सध्या डेंग्यूच्या तापाने फणफणले आहे. शहरात डेंग्यूच्या 26 रुग्णांची संख्या असून...

crime
कारखान्यातून आठ लाखांची रसायन चोरी, तिघे अटक

महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील सिक्वेंट सायंटिफिक या कारखान्यातून आठ लाख रुपये किंमतीच्या सिल्व्हर नायट्रेट या उत्प्रेरकची चोरी करणाऱ्या तिघांना...

Nawazuddin Siddiqui Interview For Manto Movie
सत्याच्या बाजूने लढणार 'मंटो'; अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीशी खास बातचीत

'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजमुळे सध्या चर्चेत असणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच 'मंटो' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या...