Sections

रेडिओ सागरमित्र 90.4 एफएम

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 17 एप्रिल 2018
Redio

पिंपरी - राज्य सरकारच्या निर्णयामुळे सध्या प्लॅस्टिकबंदीचा विषय सर्वत्र चर्चेत असला, तरी शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थी प्लॅस्टिक जमा करून ते पुनर्वापरासाठी सागरमित्र अभियानाकडे देत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे अव्याहतपणे सुरू आहे. हे काम करत असताना मुलांना आलेले अनुभव आता तुम्हाला ‘रेडिओ सागरमित्र ९०.४ एफएम’ या माध्यमातून ऐकता येणार आहेत. येत्या जूनपासून या अनोख्या उपक्रमाला सुरवात होणार असल्याचे सागरमित्र अभियानाचे समन्वयक विनोद बोधनकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

पिंपरी - राज्य सरकारच्या निर्णयामुळे सध्या प्लॅस्टिकबंदीचा विषय सर्वत्र चर्चेत असला, तरी शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थी प्लॅस्टिक जमा करून ते पुनर्वापरासाठी सागरमित्र अभियानाकडे देत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे अव्याहतपणे सुरू आहे. हे काम करत असताना मुलांना आलेले अनुभव आता तुम्हाला ‘रेडिओ सागरमित्र ९०.४ एफएम’ या माध्यमातून ऐकता येणार आहेत. येत्या जूनपासून या अनोख्या उपक्रमाला सुरवात होणार असल्याचे सागरमित्र अभियानाचे समन्वयक विनोद बोधनकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

कचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असल्याने प्लॅस्टिक कचऱ्यावर मार्ग काढण्यासाठी सागरमित्र अभियानाने विद्यार्थ्यांद्वारे प्लॅस्टिक कचरा गोळा करून त्याचा पुनर्वापर करायचा, हा उपक्रम सुरू करण्यात आला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील १४६ शाळांमधील एक लाख ३४ हजार मुलांच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येत आहे. आता ‘रेडिओ सागरमित्र’ या अनोख्या उपक्रमात शाळांमधील ही मुले सहभागी होऊन, त्यांना हे काम करीत असताना आलेले अनुभव श्रोत्यांशी शेअर करणार आहेत. मुलांबरोबरच शाळेचे मुख्याध्यापक, पालकही यामध्ये सहभागी होणार आहेत. दर शनिवारी दिवसभरातील एक तास यासाठी ठेवण्यात आला आहे. रेडिओवर मुले बोलत असताना त्याचा व्हिडिओ आणि ऑडिओ तयार करण्यात येणार आहे. ज्या मुलांना हा कार्यक्रम ऐकता येणार नाही, त्यांना sagarwani.org या संकेतस्थळावर तो ऐकता आणि पाहता येणार आहे, असे बोधनकर यांनी सांगितले.

रेडिओ सागरमित्र या उपक्रमामुळे ‘पर्यावरण आणि कचरा व्यवस्थापन’ या विषयावर समाजात जागृती होण्यास मदत होणार असून, व्यवस्थापनात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना या रेडिओच्या माध्यमातून त्यांचे स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. - विनोद बोधनकर, समन्वयक, सागरमित्र अभियान

Web Title: redio sagarmitra 90.4 fm

टॅग्स

संबंधित बातम्या

Mantralaya-Mumbai
सबला योजनेच्या लाभात वाढ

मुंबई - शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्रपुरस्कृत किशोरवयीन मुलींसाठी सुधारित सबला योजना राबविण्यात येणार असून, या...

Teacher
शिक्षकांचाही ‘दुष्काळ’

पुणे - जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या १ हजार ११७ जागा रिक्त आहेत. गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात हीच स्थिती कायम आहे. यामुळे सुमारे ७८ शाळा...

Women-Toilet
शाळांमधील मुलींची शौचालये बंद

मुंबई - राज्यातील शिक्षणाची पातळी खालावत असताना "असर'च्या अहवालातून शाळांतील सुविधांचा उडालेला...

School
सैनिकी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी समिती

सोलापूर - राज्यातील खासगी अनुदानित सैनिकी शाळांसाठी स्वतंत्र नियमावली तयार केली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा...

Moinuddin-Khan
कलाकाराने स्वतःला विद्यार्थीच समजावे - उस्ताद मोईनुद्दीन खान

पुणे - ‘‘कलाकार स्वत:च्या मैफली सोडून अन्य कार्यक्रमांना जाण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. कलाकार कितीही मोठा झाला, तरी त्याने स्वत:ला आयुष्यभर...

Mantralaya-Mumbai
शाळाबाह्य मुलींसाठीच्या योजनेच्या लाभात वाढ

मुंबई - शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्रपुरस्कृत किशोरवयीन...