Sections

लेझरचे प्रयोग पहाताना हरखून गेला शिक्षकवर्ग

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
लेझरचे प्रयोग पहाताना हरखून गेला शिक्षकवर्ग


सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी विज्ञान व गणित विषयांमध्ये चांगले गुण मिळवितात परंतु त्यांना या विषयांमध्ये रूची नसून परिक्षेसाठी अभ्यास केला जातो. शिक्षकांनी वर्गामध्ये कृतियुक्त शिक्षणावर भर दिला पाहिजे. वर्गात विविध प्रात्यक्षिक करून दाखविली पाहिजेत त्यामुळे त्या विषयांची आवड निर्माण होण्यास मदत मिळेल.
- प्रा. एल. एस. शशिधर; जेष्ठ वैज्ञानिक व विज्ञान प्रसारक आयसर, पुणे

पुणे: "लेझर च्या किरणांनी फुटणारे रंगी बेरंगी फुगे, प्रकाशकिरणे, रंगीत सावल्यांची निर्मिती, इंद्रधनुष्य, ग्रहणांची निर्मिती, चंद्राच्या कला इत्यादी प्रयोग पहाताना विद्यार्थ्यांसारख्या टाळ्या, आश्‍चर्य व आनंद या भावविश्‍वात शिक्षकवर्ग हरखून गेला होता. निमित्त होते खास विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान व गणित शिक्षक कार्यशाळेचे.

सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) व सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन सायन्स ऍन्ड मॅथेमॅटिक्‍स एज्युकेशन, आयसर पुणे यांचे वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित एकदिवशीय विज्ञान व गणित शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पुणे, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यासह, श्रीगोंदा, इचलकरंजी या विभागातील गणित व विज्ञान शिक्षकांचा सहभाग राहिला. या कार्यशाळेत पाचवी ते दहावीमधील प्रकाशशास्त्राचे प्रयोग, मानवी डोळ्यांमधील दोष कसे काढतात. प्रतिमांची निर्मिती या प्रयोगांची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली. या कार्यशाळेत प्रा. श्रीनिवास होथा यांनी अनुसंरचना व आवर्तसारणी, प्रयोगांच्या माध्यमातून रसायनशास्त्राची ओळख यावर दृकश्राव्यासह माहिती दिली.

शांती पिसे यांनी गणितातील विविध संकल्पना कोडी व प्रत्यक्ष कृतीतून विशद केल्या यामध्ये त्रिकोणाची रचना, क्षेत्रफळ यांचा समावेश होता. चौकटीच्या बाहेर जावून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी कशी निर्माण करता येईल यावर त्यांनी मार्गदर्शन केले. अशोक रूपनेर यांनी भौतिकशास्त्राच्या संकल्पना प्रात्यक्षिकासह विशद करताना भिंग व आरशांचा वापर करीत प्रतिमेची निर्मिती, चंद्राच्या विविध कला, सावली कशी तयार होते. पूर्ण आंतरिक परावर्तन, गुणित प्रतिमा, ग्रहण, दृष्टीसातत्य यांची माहिती दिली. चैतन्य मुंगी यांनी जीवशास्त्रामधील विविध प्रयोग, मानवी सांध्याची रचना, मानवी शरिरामध्ये उत्क्रांतीचे पुरावे, पचन संस्थेचे कार्य, निसर्गाचे अनुकूलन यांची माहिती दिली. डॉ. अपर्णा देशपांडे यांनी स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप चे कार्य, अणू रचना प्रत्यक्ष कशी पहाता येईल याची माहिती दिली. डॉ. अपूर्वा बर्वे, विठ्ठल शेजवळ, शितल बोरीवार, सुनिता पाटोळे, अक्षया केळसकर यांचे विशेष सहकार्य मिळाले. प्रास्ताविकात विशाल सराफ यांनी सहभागी शिक्षकांना "सकाळ एनआयई' उपक्रमाची माहिती दिली.

उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी... सकाळ एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) या शालेय उपक्रमाची शैक्षणिक वर्ष 2018-19 ची सभासद नोंदणी सुरू होत असून शैक्षणिक वर्षात 18 विशेषांकासह विविध मान्यवर वक्‍त्यांच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्यांच्या वाचन व लेखन कौशल्याला वाव मिळावा या हेतूने हा उपक्रम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये राबविला जात आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी विशाल सराफ- 9922913473 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: pune news nie teacher laser show

टॅग्स

संबंधित बातम्या

पर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच

पुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...

muktapeeth
घरचे कार्य! (ढिंग टांग)

गेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...

मार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले

पुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...

pune-herritage-walk.jpg
"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद

पुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...

flex.jpg
धोकादायक फ्लेक्‍स हटवा

पुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...

mesb.jpg
केबलसाठी केलेले खड्डे बुजवा 

पुणे : दोन महिन्यांपूर्वी गणेश पेठेत महावितरणने भूमिगत केबल वायर टाकण्यासाठी केलेले खड्डे तसेच सोडून दिले आहेत. या कामाचा राडारोडादेखील तसाच पडून आहे...