Sections

पालकमंत्री म्हणतात, पुण्याची वाहतूक असुरक्षित!

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 31 मार्च 2018
डायस प्लॉट - उड्डाण पुलाच्या कामाचे शुक्रवारी भूमिपूजन करताना गिरीश बापट. या वेळी मुक्‍ता टिळक, श्रीनाथ भिमाले, योगेश मुळीक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी.

पुणे - शहरात दररोज अपघातांमध्ये नागरिकांचे बळी जात आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्याने चालताना असुरक्षित वाटत आहे, असे सांगत पालकमंत्री गिरीश बापट यांनी सध्याच्या वाहतूक व्यवस्थेवर ताशेरे ओढले. 

सेव्हन लव्ह चौक ते वखार महामंडळ चौकादरम्यान बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी बापट बोलत होते. महापौर मुक्‍ता टिळक, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, प्रवीण चोरबेले, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर आदी या वेळी उपस्थित होते. 

बापट म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य व्यक्‍तीला केंद्रबिंदू ठेवून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. या उड्डाण पुलामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात टळतील.’’ गोगावले म्हणाले, ‘‘भाजपकडून विकासकामे केली जात आहेत. परंतु प्रसारमाध्यम आणि विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत.’’ 

टिळक, कांबळे, मिसाळ व भिमाले यांनीही मनोगत व्यक्‍त केले. सूत्रसंचालन गोपाळ चिंतल यांनी केले. भरत वैरागे यांनी आभार मानले.

आधी सुविधा मग पार्किंग धोरण  महापालिकेने पार्किंग धोरण आखले पाहिजे; परंतु नागरिकांना पार्किंगचे वेडेवाकडे दर लावणे योग्य होणार नाही. पार्किंगसाठी प्लॉट विकसित केल्याशिवाय हे धोरण राबविण्यात येऊ नये. तसेच नागरिकांकडून दर आकारणी करू नये, असे मत गोगावले यांनी व्यक्‍त केले.  

बिगरलग्नाचा आहेस, तर भाजपमध्ये ये... पालकमंत्री बापट हे भाषणासाठी उठले. त्या वेळी एक तरुण मोबाईलवर बोलत जात होता. त्याला उद्देशून बापट म्हणाले, ‘काय बायकोशी बोलतोस का?’ त्यावर त्या तरुणाने लग्न झाले नसल्याचे सांगितले. त्यावर बापट यांनी ‘तू बिगर लग्नाचा आहेस, तर भाजपमध्ये ये. तुला नोकरी देतो, रोजगार देतो. मात्र एकच लग्न कर.’ पालकमंत्र्यांच्या या मिश्‍किलपणावर विरोधकांना चर्चेचा विषय मिळाला.

Web Title: pune news girish bapat pune transport unsecure

टॅग्स

संबंधित बातम्या

पोलिसांना ‘घरचा डबा’

वाल्हेकरवाडी - सण, उत्सव हे सुरळीत पार पडून शांतता कायम राहावी, या उद्देशाने रात्रंदिवस खडा पहारा देणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस बांधवांना व पोलिस...

नंदा जिचकार
मुलासह विदेशवारीवरून महापौरांविरोधात फलक

मुलासह विदेशवारीवरून महापौरांविरोधात फलक नागपूर : पदाचा गैरवापर करीत महापौरांनी मुलालाही विदेशात सैरसपाटा केला. यासाठी खोटी कागदपत्रे सादर केली असून...

girl
चिमुकलीवर अत्याचार करून घेतला नाकाचा चावा

औंध (पुणे) : तीन वर्षीय चिरमुडीवर लैंगिक अत्याचार करून व तिच्या नाकाचा चावा घेऊन जखमी केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पाषाण येथे घडली. याप्रकरणी...

ulhasnagar
उल्हासनगरात महापौरच्या निवडणुकीला धक्कादायक कलाटणी

उल्हासनगर : ऐन महापौर पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर फुटलेल्या साईपक्षाची विभागणी झाली असून एका गटाने शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. त्या अनुषंगाने...

bagave.jpg
पुणे : मूर्ती विटंबना प्रकरणी नगरसेवक अविनाश बागवे यांना अटक

पुणे : महाराष्ट्रचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा व नगरसेवक अविनाश बागवे यास खडक पोलिसांनी अटक केली.  ट्रॅक्टर चालक व साउंड सिस्टिम...