Sections

अवैध धंद्यांविरोधातील निगडी पोलिस ठाण्यावर बाटली मोर्चा 

रवींद्र जगधने  |   रविवार, 6 मे 2018
A protest was launched against Nigdi police station against illegal activities

मोर्चा दरम्यान अवैध दारू धंदे बंद करा, हफ्तेवसुली करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, गुन्हेगारी थांबवा अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. 

पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरामधील वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांविरोधात अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांच्या नेतृत्वाखाली अंकुश चौक ते निगडी पोलिस ठाण्यावर 'बाटली मोर्चा' काढण्यात आला. मोर्चा दरम्यान अवैध दारू धंदे बंद करा, हफ्तेवसुली करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, गुन्हेगारी थांबवा अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. 

यावेळी संघटनेचे संपर्कप्रमुख हरिश्‍चंद्र तोडकर, महिला शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, बेटींना दास, ऍड मेरी रणपिसे, काँग्रेस अल्पसंख्याक शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, भारिपचे आकील सय्यद, संगीता शहा, आरती कोळी, गणेश हिंगडे, हमीद शेख, कुसुम गायकवाड, जयश्री आचार्य, सद्दाम सय्यद, लतीफ सय्यद, अय्याज शेख, अब्दुल शेख, अनिल कारेकर, हाजीमलंग शेख, दिवेश पिंगळे, इर्शाद शेख, विशाल वाघमारे यांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होते. 

निगडी पोलिस ठाण्यावर मार्चा पोचल्यानंतर याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पळसुले यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यावेळेस त्यांनी निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध दारू धंदे बंद केल्याचे सांगितले. काही ठिकाणी जर अवैध धंदे निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवावे, आम्ही तत्काळ कारवाई करू, असे लेखी आश्वासन दिले. मोर्च्याला उद्देशून अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख म्हणाले, "निगडी पोलिस हद्दीसह संपूर्ण शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढलेली आहे. सर्वसामान्य जनता प्रचंड दहशतीखाली जगत आहे. तसेच शहरात काही भ्रष्ट पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध दारू धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. अवैध धंदेवाल्याकडून करोडो रुपयाचा हप्ता वसूल केला जात आहे. काही रुपड्यांसाठी काही राजकीय पुढारी व काही भ्रष्ट पोलिस अधिकारी भारत देशाशी गद्दारी करत आहेत.'' 

शेख म्हणाले, "या अवैध धंद्यांपासून महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत. अनेक तरुण वाममार्गाला जाऊन गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत. शहरामध्ये दरवर्षी दोन लाख तरुण दारूच्या आहारी जात आहेत आणि हेच तरुण पुढे जाऊन देशाचा कारभार चालवणार आहेत. परंतु, हे देशाचे भविष्य असलेले तरुण जर गुन्हेगार, भ्रष्ट, बेवडे असतील तर देशाचे भविष्य काय असेल?'' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

Web Title: A protest was launched against Nigdi police station against illegal activities

टॅग्स

संबंधित बातम्या

Metro
मेट्रो मार्गासाठी तीन पर्याय

पुणे - स्वारगेट ते कात्रजदरम्यान मेट्रो मार्गाबद्दल पुणेकरांची ताणली गेलेली उत्सुकता मार्च महिन्याच्या अखेरीस निकालात निघणार आहे. याबाबतचा प्रकल्प...

पिंपरी गाव - येथील जोग महाराज उद्यानामध्ये संभाजीसृष्टी साकारण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शिवकालीन प्रवेशद्वाराची प्रतिकृती उभारण्याचे काम सुरू आहे.
शिवसृष्टीचे काम प्रगतिपथावर

पिंपरी - महापालिकेतर्फे बिजलीनगर येथील उद्यानात शिवसृष्टी आणि पिंपरी गावातील उद्यानात संभाजी सृष्टी साकारण्यात येणार असून, दोन्ही उद्यानांतील कामे...

चिंचवडमधील ज्येष्ठाचा गोसेवेचा वसा

पिंपरी - पिंपरी मंडईत फेरफटका मारताना सत्तरीतील व्यक्ती टाकाऊ भाजीपाला गोळा करताना हमखास दिसते. डोक्‍यावर टोपी, डोळ्यांवर चष्मा, भरदार पांढऱ्या मिशा...

पिंपरीत डीपीला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड डीपीला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली. डीपीला...

7013760-3x2-940x627.jpg
पिंपरीत वृद्धाने दारुच्या नशेत सिगारेट पेटवली अन्...

पिंपरी चिंचवड : दारूच्या नशेत सिगरेट ओढणं एका वृद्धाच्या जीवावर बेतले आहे. सिगरेट पेटवून पेटती माचीस खाली फेकल्यामुळे गवताला आग लागली...

पोलिस आयुक्तालय अखेर नव्या इमारतीत

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (ता. ९) उद्‌घाटन झाले. चिंचवडमधील...