Sections

पालखी सोहळ्यासाठी यंदा नवीन रथ

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 18 एप्रिल 2018
आळंदी - पालखी सोहळ्यासाठी बनविण्यात आलेला रथ.

आळंदी - आषाढी वारीत माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी यंदाच्या वर्षी देवस्थानने देणगीद्वारे सुमारे २२ लाख रुपये किंमतीचा १२० किलो वजनाचा जर्मन सिल्व्हर पद्धतीचा नक्षीदार चांदीचा आकर्षक रथ बनविला आहे. हा रथ एका भाविकाने देणगीदाखल दिला असून पुण्यातील रमेश मिस्त्री यांनी रथासाठी संपूर्ण कारागिरी केली आहे. दरम्यान उद्या सकाळी दहा वाजता चांदीचा रथ आळंदी देवस्थानला सुपूर्द केला जाणार आहे.

आळंदी - आषाढी वारीत माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी यंदाच्या वर्षी देवस्थानने देणगीद्वारे सुमारे २२ लाख रुपये किंमतीचा १२० किलो वजनाचा जर्मन सिल्व्हर पद्धतीचा नक्षीदार चांदीचा आकर्षक रथ बनविला आहे. हा रथ एका भाविकाने देणगीदाखल दिला असून पुण्यातील रमेश मिस्त्री यांनी रथासाठी संपूर्ण कारागिरी केली आहे. दरम्यान उद्या सकाळी दहा वाजता चांदीचा रथ आळंदी देवस्थानला सुपूर्द केला जाणार आहे.

माउलींचा पालखी सोहळा यंदाच्या वर्षी ६ जुलैला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. मात्र गेल्या वर्षी रथाबाबत थोडासा वाद निर्माण झाला होता. पुण्यातील लष्कराच्या आरएडी विभागाने बनविलेला चांदीचा रथ परत नेला असल्याने देवस्थानने मागील वर्षी जुनाच रथ वापरला होता. दहा वर्षांपूर्वी देवस्थानने बनविलेला आणखी एक चांदीचा रथ वादात सापडल्याने काही विश्वस्तांना पदमुक्त करण्यात आले होते. अद्याप त्याबाबत वाद न्यायिक स्तरावर आहे. यामुळे देवस्थानने यंदाच्या वर्षी नव्याने रथ बनविण्याची भूमिका घेतली आणि त्यासाठी त्यांना पुण्यातील मावळ भागातील देणगीदार मिळाला. पालखी सोहळ्यासाठी सध्या रथ सज्ज असून पुण्यातील भिलारवाडीतील रमेश मिस्त्री, राजेंद्रभाई मिस्त्री, प्रकाश मिस्त्री यांच्यासह नऊ जणांनी यासाठी नक्षीदार कोरीव काम केले आहे. 

उद्या सकाळी (ता.१८) दहा वाजता आळंदी देवस्थानमध्ये रथाचा अर्पण सोहळा होणार आहे. यासाठी सोहळाप्रमुख ॲड विकास ढगे, प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, योगेश देसाई, अजित कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.

असा आहे रथ रथाची लांबी बारा फूट असून रुंदी सहा फूट आणि उंची तेरा फूट आहे. रथाच्या वरच्या बाजूने सोन्याचा मुलामा दिलेले तीन घुमट बसविण्यात आले आहेत. अकरा कळस, दहा महिरपी, आठ खांब आणि त्यावर गरूड आणि मारुतीची मूर्ती कोरण्यात आली आहे. रथाच्या वरच्या बाजूने पावसाचे पाणी जाण्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. सुमारे चार महिने रथासाठी कोरिव काम करण्यात आल्याची माहिती रमेश मिस्त्री यांनी दिली.

Web Title: palkhi sohala new rath

टॅग्स

संबंधित बातम्या

Parbhani Womens agitation on Friday for the government college
परभणी : शासकीय महाविद्यालयासाठी शुक्रवारी महिलांचे घेराव आंदोलन

परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी समस्त परभणीकरांच्या वतीने आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. आंदोलनाचा तीसरा टप्पा शुक्रवारी (ता. 21)...

pune
शेतकरी उत्पादक संस्थेचा फायदा खऱ्या शेतकऱ्यांनाच व्हावा : केंद्रीय कृषी राज्यमंत्री

पुणे (औंध) : "बाजारात विक्री करतांना शेतकऱ्यांनी गटांच्या स्वरुपात एकत्र येऊन विक्री व पुरवठ्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांचे दिवस बदलतील....

WhatsApp-Image-2018-09-20-a.jpg
इंदापूरमध्ये मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र साजरा

इंदापूर : येथील शास्त्री चौकातील नवजवान मित्र मंडळ तसेच शेख मोहल्ला मोहरम कमिटीच्या वतीने एकत्रित गणेशोत्सव तसेच ताबूत साजरा करण्यात आला....

kasturba chwok.jpg
कस्तुरबा चौकातील शिल्पाचा चबुतरा सुशोभित करावा

औंध : येथील विद्यापीठ रस्त्यावर कस्तुरबा वसाहतीजवळील चौकातील शिल्पाचा सिमेंटचा चबुतरा तोडण्यात आला. वाहतूकीस अडथळा होत असल्यामुळे हा चबूतरा तोडण्यात...

wani
सराड-वणी राष्ट्रीय महामार्गचे काम बाधीत शेतकऱ्यांनी पाडले बंद

वणी (नाशिक) : गुजरात राज्यातील सोनगड ते पिंपळगाव बसवंत या दरम्यानचा नव्याने जाहिर झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 953 वरील सराड ते...