Sections

विसरभोळ्या महावितरणचा ग्राहकांना 'शॉक' 

सकाळ वृत्तसेवा |   रविवार, 29 एप्रिल 2018

पुणे : महावितरणच्या अजब कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. सहा वर्षांपूर्वी वीजबिल आकारणीच्या दरात बदल झाला; परंतु महावितरणला त्याचा विसर पडला. जुन्याच दराने आकारणी सुरू ठेवल्याने महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. लेखापरीक्षणात हे उघडकीस आल्यानंतर महावितरणने आता ग्राहकांना 'पंधरा दिवसांत थकबाकी भरा, नाहीतर वीजपुरवठा तोडू,' अशा नोटिसा पाठविण्यास सुरवात केली आहे. 

पुणे : महावितरणच्या अजब कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. सहा वर्षांपूर्वी वीजबिल आकारणीच्या दरात बदल झाला; परंतु महावितरणला त्याचा विसर पडला. जुन्याच दराने आकारणी सुरू ठेवल्याने महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. लेखापरीक्षणात हे उघडकीस आल्यानंतर महावितरणने आता ग्राहकांना 'पंधरा दिवसांत थकबाकी भरा, नाहीतर वीजपुरवठा तोडू,' अशा नोटिसा पाठविण्यास सुरवात केली आहे. 

महावितरणकडून नियमितपणे वीजदर संकेतामध्ये बदल करण्यात येतो. बदल झाल्यानंतर त्याची दखल घेऊन त्यानुसार वीजबिलांची आकारणी करणे आवश्‍यक असते. 2012 मध्ये महावितरणकडून वीजदराच्या संकेतामध्ये बदल करण्यात आला. त्यामध्ये काही ग्राहक वर्गासाठी सार्वजनिक सेवा (पब्लिक सर्व्हिस) म्हणजे एचटी-9 (दरसंकेत) बदलून त्याऐवजी घरगुती दराने म्हणजे एलटी-1 (दरसंकेत) या दराने आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार बदललेल्या या दराने महावितरणकडून वीजबिलांची आकारणी करणे अपेक्षित होते; परंतु बदल न करता पूर्वीच्या दराने आकारणी सुरू ठेवण्यात आली. लेखापरीक्षणात हा प्रकार उघडकीस आल्यावर ग्राहकांकडे थकबाकी दाखवून त्यांच्याकडून वसुलीची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. 

भांबुर्डा येथील महावीर जैन विद्यालयास सहा वर्षांची जवळपास 44 लाख 30 हजार 300 रुपयांची थकबाकी असल्याची नोटीस महावितरणच्या गणेशखिंड सर्कलकडून पाठविण्यात आली आहे. पंधरा दिवसांत थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशाराही या नोटिशीत दिला आहे. अशाप्रकारे अन्य ग्राहकांनाही या नोटिसा पाठविण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. वास्तविक महावितरणकडून झालेल्या चुकीचा फटका निष्कारण ग्राहकांना सोसावा लागत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. 

महावितरणकडून कायद्याचे उल्लंघन  वीज कायदा 2003 मधील कलम 56 (2) मध्ये थकबाकी कशी आणि कधी वसूल करावी, याची स्पष्ट तरतूद केली आहे. त्यानुसार दोन वर्षांपेक्षा अधिक काळ मागे जाऊन थकबाकी वसूल करता येत नाही; तसेच सलग दोन वर्षे थकबाकीची रक्कम दरमहा देण्यात येणाऱ्या बिलांमध्ये दर्शविण्यात आलेली असावी, असे म्हटले आहे. तसे नसेल, तर थकबाकी वसूल करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे; परंतु महावितरणकडूनच या कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याचे या नोटिसांवरून स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला.

Web Title: MSEDCL forgot to charge consumers as per new rates

टॅग्स

संबंधित बातम्या

All the people of the society gathered through Ganeshotsav says Rohini Bhajibhakare
समाजातील सर्व लोक गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकत्रित - रोहिणी भाजीभाकरे

उपळाई बुद्रूक (जि. सोलापूर) - समाजातील सर्व घटकातील लोकांना गणेशोत्सवाच्या माध्यामातून एकत्रित आणण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले. त्यांचे खुप...

yeola
शेतकऱ्यांना उपचारासाठी सरकार पाच लाखाची मदत देणार - दानवे

येवला : सामान्य शेतकरी डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कामकाज सुरु आहे. ब्रिटिशांच्या काळातील आणेवारी बंद करून मोदी सरकारने तीस...

bajirao-panmand
टाकळी ढोकेश्वर - गोरेश्वर 100 कोटींचा टप्पा पार करणार

टाकळी ढोकेश्वर - संस्थेच्या कोअर बँकेच्या माध्यमातून 11 शाखा संगणकीकृत असुन आरटीजीएस,एसएमएस,वीज भरणा यासंह अन्य आधुनिक सेवा ग्राहकांना उपलब्ध करून...

pali
वावळोली आश्रम शाळेतील सात आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

पाली - सुधागड तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा वावळोली येथील सात आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. हे यश वावळोली आश्रम शाळेला प्रथमच हे...

Special Things About Prime Minister Narendra Modi
#HappyBdayPMModi नरेंद्र मोदी यांच्या जीवनाशी निगडीत 'या' काही खास गोष्टी...

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या जीवनाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी... 1) आज नरेंद्र मोदी आर्थिक...