Sections

नदी पात्रालगत मच्छरदाणी अंगावर घेऊन आंदोलन

कृष्णकांत कोबल |   गुरुवार, 26 एप्रिल 2018
मांजरी : मुळा-मुठा नदीतील जलपर्णी काढण्याच्या मागणीसाठी अखिल मांजराईनगर नागरिक कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी थेट नदी पात्रालगत मच्छरदाणी अंगावर घेऊन अनोख्या पध्दतीने आंदोलन केले.

मांजरी (पुणे) : येथील मुळा-मुठा नदीमध्ये पसरलेल्या जलपर्णीमुळे नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा त्रास होऊ लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसह प्रशासनाचेही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या बाबीकडे लक्ष वेधन्यासाठी येथील अखिल मांजराईनगर नागरिक कृती समितीच्या वतीने थेट नदी पात्रालगत मच्छरदाणी अंगावर घेऊन अनोख्या पध्दतीने आंदोलन केले.

मांजरी (पुणे) : येथील मुळा-मुठा नदीमध्ये पसरलेल्या जलपर्णीमुळे नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा त्रास होऊ लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसह प्रशासनाचेही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या बाबीकडे लक्ष वेधन्यासाठी येथील अखिल मांजराईनगर नागरिक कृती समितीच्या वतीने थेट नदी पात्रालगत मच्छरदाणी अंगावर घेऊन अनोख्या पध्दतीने आंदोलन केले.

मुळा-मुठा नदीवरील पुलापासून मुंढवा, खराडी पर्यंत मोठ्या प्रमाणात पात्रात जलपर्णी पसरली आहे. त्यामुळे येथील राजीव गांधी नगर, सटवाई नगर, माळवाडी, कुंजीरवस्ती, गावठाण, ११६ घरकुल, ७२ घरकुल आदी परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामसेवकांकडे लेखी निवेदन देवून वस्तीमध्ये औषध फवारणी करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही.

ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासन व महानगरपालिका या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे संस्थेच्या माध्यमातून येथील नागरिकांनी मच्छरदाणी अंगावर घेऊन दोन दिवस आंदोलन केले आहे. यावेळी महिलांनी प्रशासनाविरोधात घोषणा देत जलपर्णी काढणे व औषध फवारणीची मागणी केली.

संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र साळवे म्हणाले, "अनेक दिवस मागणी करूनही जलपर्णी काढली जात नाही. औषध फवारणी केली जात नाही. त्यामुळे डासांचा त्रास दररोजच वाढत चालला आहे. प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने येथे आंदोलन कले आहे. उद्या महानगरपालिके समोर आंदोलन करणार आहोत.''

Web Title: Movement taking over the river waters nets mosquitoes

टॅग्स

संबंधित बातम्या

सतीश काकडे साताऱ्यातील कारखान्यांना घाम फोडणार? 

सोमेश्वरनगर : फलटण (जि. सातारा) तालुक्यातील शरयू, स्वराज अशा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिलेली नाही. 15 ऑक्टोबरपर्य़ंत कारखान्यांनी...

pali
रायगड : सुधागड तालुक्यात मतदान शांततेत

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील 7 सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रक्रीया बुधवारी शांततेत पार पडली. दुपारी दिड वाजेपर्यंत एकूण 31.50 टक्के...

भाजपने देशावर संविधान बचावची वेळ आणली - राष्ट्रवादी महिला काँग्रेस 

कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी...

Beaten By A Woman Nakedness In Nagar Shrigonda incident
महिलेस विवस्त्र करून मारहाण: कोणी न्याय देता का न्याय?

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील दलित, आदिवासी, भटके विमुक्तांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीत. मागील काही वर्षापासून अशा...

नांदेड - आजोबाच्या बँक खात्यातील साडेदहा कोटी रुपयाचा अपहार

नांदेड - आजोबाच्या नावे असलेल्या बँक खात्यातील साडेदहा कोटी रुपयाचा अपहार करून नातेवाईकाची फसवणूक करणाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे....