Sections

हुंडा नको; मामा मला गाडी द्या

अनंत काकडे |   बुधवार, 25 एप्रिल 2018
Marriage

चिखली - पूर्वी लग्नात नवरदेव मनगटी घड्याळ, सायकल, रेडिओ, अंगठी आदी वस्तूंसाठी आडून बसत. मात्र, लोकांकडे जसा पैसा वाढला तशा मागण्याही वाढल्या. आता मोटारीच्या शौकिनांची संख्या वाढली आहे. गुंठा मंत्री आणि धनदांडग्या प्रतिष्ठा जपण्यासाठी ‘हुंडा नको, गाडी हवी’ असा नवा ट्रेंड निर्माण झाल्याने वधूपित्याचाही नाइलाज होत आहे.

चिखली - पूर्वी लग्नात नवरदेव मनगटी घड्याळ, सायकल, रेडिओ, अंगठी आदी वस्तूंसाठी आडून बसत. मात्र, लोकांकडे जसा पैसा वाढला तशा मागण्याही वाढल्या. आता मोटारीच्या शौकिनांची संख्या वाढली आहे. गुंठा मंत्री आणि धनदांडग्या प्रतिष्ठा जपण्यासाठी ‘हुंडा नको, गाडी हवी’ असा नवा ट्रेंड निर्माण झाल्याने वधूपित्याचाही नाइलाज होत आहे.

गुंठ्याला भाव आल्याने लग्नासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. हुंडाबंदी कायद्याचे आपण पालन करतो, असे सांगणारे मुलाची इच्छा आहे असे सांगून किमती मोटारीची मागणी करताना दिसतात. मोटार घेताना वधूपित्याचा मान राखायला हवा, मिळालेली भेट नाकारायची कशी, अशी पुस्ती ते जोडतात. उपनगरात अशा गुंठा मंत्र्यांची सध्या चांगलीच चलती आहे. जावयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी किमती दुचाकी आणि चारचाकी मोटारी भेट देण्याची पद्धत सुरू झाली. वधूपित्यालाही ऐपत नसली तरी जावयाच्या हट्टापुढे हात टेकावे लागत आहे. त्याचे हे काही किस्से. 

मोशीतील एका कुटुंबातील दोन मुलांपैकी मोठ्याला त्याच्या सासरकडून दहा लाखांची मोटार भेट मिळाली. दुसऱ्या मुलगाही आपल्या लग्नात मोटारीसाठी आडून बसला. मग त्या मुलाच्या वडिलांनीच ३५ लाखाची मोटार खरेदी केली. मुलाच्या होणाऱ्या सासऱ्याला बोलावून ही मोटार तुमच्या होणाऱ्या जावयाला लग्नात भेट द्या आणि हप्ते तुम्ही भरा, असे सांगितले. मुलीच्या प्रेमापोटी वधूपित्यानेही आपली दोन गुंठे जागा विकून जावयाची इच्छा पूर्ण  केली. 

चिखलीत एकाने मुलीच्या लग्नात जावयाला मोटार भेट दिली आणि मुलाच्या लग्नात मोटारीची मागणी केली. वधूपित्याने जावयाला मोटार भेट दिली. मात्र, त्या वधूपित्याचे इतर जावई आडून बसले. त्यातून मार्ग काढण्यासाठी वधूपित्याने दोन जावयांना बुलेट भेट दिली. 

एकाने म्हेत्रेवस्ती येथील एका मुलीशी प्रेमविवाह केला. तिच्या वडिलांचा बांधकाम व्यवसाय असल्याने दहा चौरस फुटाच्या खोलीत राहणारा हा जावई सासऱ्याकडे मोटार आणि दहा सदनिकांची मागणी करत आहे. मुलीचे वडील काही पुढाऱ्यांमार्फत हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करत आहेत.

अवैध मार्गाने मिळविला जातो हुंडा कुदळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते संभाजी बालघरे म्हणाले, ‘‘कायद्याने हुंडा बंदी असली तरी लालची नवरदेवाला कशाही स्वरूपात हुंडा हवा असतो. आपण किती पुढारलेले आहोत, हे सांगत आम्ही मुलीला बुलेट, मोटार दिली, तुम्ही पण द्या, अशी खुली मागणी केली जाते. त्यामुळे हुंडा न घेता अवैध मार्गाने संपत्ती मिळवली जात आहे.’’

Web Title: marriage hunda

टॅग्स

संबंधित बातम्या

लग्नानंतर दीपिकाचे नव्या घरी जोरदार स्वागत; दीपवीरचे भारतात आगमन

मुंबई- इटलीत विधी पूर्ण केल्यानंतर दीपिका पादुकोण व रणवीर सिंग रविवारी मुंबईत दाखल झाले. पण मुंबईत परतल्यानंतर दीपिकाने रणवीरसोबत एक खास विधी पूर्ण...

amol udgirkar
बायो'पीक' (अमोल उदगीरकर)

दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली....

dr shruti panse
मिळून सारेजण (डॉ. श्रुती पानसे)

मुलांसकट नवनवे अनुभव घेणं, त्यासाठी स्वतःला आणि पूर्ण कुटुंबाला सतत संपन्न करत राहणं, समृद्ध करत राहणं हा एक वेगळाच प्रवास असतो. मुलांसह समृद्ध...

samir abhyankar
गाण्यात इतरांची नक्कल नको (समीर अभ्यंकर)

शास्त्रीय असो वा उपशास्त्रीय सादरीकरण, श्रोत्यांना निराळं काहीतरी ऐकवण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. गाण्यात इतरांची नक्कल नसावी, स्वतःची अशी...

sharmila karkhanis
प्रतारणा (शर्मिला कारखानीस)

"ह्यां'च्या मुलाला मी माझाच मुलगा मानलं, अगदी मनापासून...सख्ख्या आईसारखं प्रेम दिलं त्याला; पण मलाही आतून मातृत्वाची ओढ होतीच ना गं? पण नंतर काय,...

eco-cycle.jpg
जुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप 

पुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...