Sections

लग्नातील अनावश्‍यक खर्च टाळून शाळेस एक लाखाची देणगी

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 27 एप्रिल 2018
विरवाडी (ता. भोर) - तानाजी मालुसरे शाळेचे मुख्याध्यापक बी. एस. पवार यांना देणगीचा धनादेश देताना बाळासाहेब शेंडकर व त्यांची पत्नी शीतल.

नसरापूर - दापोडे (ता. वेल्हे) येथील राजगड ज्ञानपीठाच्या तानाजी मालुसरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी बाळासाहेब मारुती शेंडकर यांनी विवाह समारंभातील अनावश्‍यक खर्च टाळून शाळेस १ लाख ११ हजार १११ देणगी दिली. 

नसरापूर - दापोडे (ता. वेल्हे) येथील राजगड ज्ञानपीठाच्या तानाजी मालुसरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी बाळासाहेब मारुती शेंडकर यांनी विवाह समारंभातील अनावश्‍यक खर्च टाळून शाळेस १ लाख ११ हजार १११ देणगी दिली. 

बाळासाहेब शेंडकर यांचे शालेय शिक्षण तानाजी मालुसरे विद्यालयात झाले असून, ते नामांकित कंपनीत नोकरीस आहेत. शाळेला पुस्तके, क्रीडा व विज्ञान साहित्यासाठी त्यांनी गतवर्षी २० हजार रुपयांची देणगी दिली होती. आदर्श विद्यार्थी पुरस्काराची रक्कमही तेच देतात. २४ एप्रिल रोजी त्यांनी स्वतःच्या विवाह प्रसंगी अनावश्‍यक खर्चाला फाटा देत शाळेला १ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी दिली. देणगीचा धनादेश पत्नी शीतल यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक बी. एस. पवार यांच्याकडे सुपूर्त केला.

या प्रसंगी आमदार संग्राम थोपटे, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर उपस्थित होते.  आमदार थोपटे यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. 

Web Title: marriage expenditure one lakh donation to school motivation

टॅग्स

संबंधित बातम्या

पोलिसांना ‘घरचा डबा’

वाल्हेकरवाडी - सण, उत्सव हे सुरळीत पार पडून शांतता कायम राहावी, या उद्देशाने रात्रंदिवस खडा पहारा देणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस बांधवांना व पोलिस...

दोन टन निर्माल्याचे झाले संकलन 

सातारा - "सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातर्फे अनंत चतुर्दशीला येथील संगम माहुली (ता....

mangalwedha
पाण्यापासून वंचित गावे कर्नाटकाला जोडण्याची सहमती द्यावी : येताळा भगत

मंगळवेढा : बहुचर्चित मंगळवेढा तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवणार नसाल तर तालुक्यातील वंचीत गावे कर्नाटकाशी जोडण्यची सहमती द्यावी...

satana
उद्योजक होण्यासाठी कौशल्य, तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक वृत्ती आवश्यक

सटाणा : उद्योग क्षेत्रात करिअर करतांना प्रत्येकाने आवडीनुसार उद्योग निवडावा, अन्यथा उद्योग व्यवसायात मन लागत नाही. आवडीप्रमाणे उद्योगात संधी किती...

Cabinet reshuffle in Goa in absence of Chief Minister parrikar
मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना

पणजी- गोवा मंत्रिमंडळातून आज नगरविकासमंत्री फ्रांसिस डिसोझा आणि वीजमंत्री पांडूुरंग मडकईकर यांना डच्चू देण्यात आला. डिसोझा सध्या न्यूयॉर्क येथे उपचार...