Sections

"सिंहगड'च्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही 

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 28 फेब्रुवारी 2018
Sinhagad Institute

पुणे - ""सिंहगड इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विधिमंडळात आवाज उठविण्यात येईल'', अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी येथे दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी संबंधितांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. 

पुणे - ""सिंहगड इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विधिमंडळात आवाज उठविण्यात येईल'', अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी येथे दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी संबंधितांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. 

सिंहगड इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. खासदार सुळे यांनी तेथे जाऊन त्यांची भेट घेतली. राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष मनाली भिलारे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण यांच्याशी सुळे यांनी तेथूनच संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांबाबत विधिमंडळात आवाज उठविण्यास सांगितले. महाविद्यालयातील प्राध्यापकांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन होत नसल्यामुळे वर्गात अभ्यासक्रम पूर्ण होत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. परीक्षा जवळ आलेल्या असताना अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितले, तर प्राध्यापकांनी त्यांच्या वेतनाबाबत अडचणी खासदार सुळे यांच्यासमोर मांडल्या. त्यावर खासदार सुळे यांनी शिक्षण विभागातील अधिकारी तसेच संबंधितांशी चर्चा करून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याबाबत तातडीने लक्ष देणार असल्याचे सांगितले. तसेच याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असेही आश्‍वासन त्यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना दिले. 

Web Title: marathi news supriya sule Sinhagad Institute student

टॅग्स

संबंधित बातम्या

2Soyabean_5.jpg
पावसाअभावी सोयाबीन पिक शेतकऱ्यांच्या हातातुन गेले

वाशी : पावसाअभावी सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातुन गेले आहे. सोयाबीन काढायला परवडत नसल्याने शेतकरी सोयाबिनच्या उभ्या पिकात...

सतीश काकडे साताऱ्यातील कारखान्यांना घाम फोडणार? 

सोमेश्वरनगर : फलटण (जि. सातारा) तालुक्यातील शरयू, स्वराज अशा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिलेली नाही. 15 ऑक्टोबरपर्य़ंत कारखान्यांनी...

भाजपने देशावर संविधान बचावची वेळ आणली - राष्ट्रवादी महिला काँग्रेस 

कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी...

2ajit_pawar_26.jpg
मराठवाड्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा : अजित पवार 

औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची...

सांगली महापालिकेच्या स्थायी सभापतीपदी अजिंक्‍य पाटील निश्‍चित

सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अपेक्षेनुसार माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्‍य पाटील यांची निवड निश्‍चित...