Sections

सलमान 24 ला पुण्यात; पाससाठी हा फॉर्म भरा

सकाळ वृत्तसेवा |   रविवार, 4 मार्च 2018
Salman Khan Da-Bangg tour

तिकिटे येथे मिळतील... 
बुक माय शो, पेटियम, इनसायडर.इन आणि www.dabanggtourepune.com वर तिकिटे उपलब्ध असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले. 

'सलमान खान नंबर वन का आहे' हे ट्विट करा #SakalNumberOne हा हॅशटॅग वापरून..

पुणे : तरुणाईची धडकन असलेला प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा 'द- बॅंग' हा 'लाइव्ह कॉन्सर्ट' पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. सलमानसोबतच प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा , प्रभुदेवा यांचे बहारदार नृत्यही पाहता येणार आहे. येत्या 24 मार्च रोजी म्हाळुंगे- बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम रंगणार आहे. 

'फोर पिलर्स इव्हेंट्‌स'ने 18 डिग्रीज आणि निर्माण ग्रुपच्या सहकार्याने 'द- बॅंग' टूर पुण्यात येत आहे. 'सकाळ' माध्यम समूहाच्या सहयोगाने हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सलमान खानसोबतच आघाडीच्या अभिनेत्री कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभुदेवा, डेझी शाह, गुरू रंधवा आणि मनीष पॉल आदी कलावंतांचा या कार्यक्रमात सहभाग राहणार आहे. कार्यक्रमाचे दिग्दर्शक व प्रसिद्ध अभिनेता सोहेल खान यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी फोर पिलर्स इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे संचालक समीर पवानी, 18 डिग्रीजचे संतोष कस्पटे, विजय मतानी, निर्माण ग्रुपचे सुनील अग्रवाल उपस्थित होते. 

पाच हजार भाग्यवंत वाचकांना मिळणार भेट पासेस  अभिनेता सलमान खानच्या या कार्यक्रमाचे पासेस 'सकाळ'च्या पाच हजार भाग्यवंत वाचक-वर्गणीदारांना मिळणार आहेत. त्यासाठी केवळ खालील तीन प्रश्‍नांची उत्तरे वाचकांना द्यायची आहेत. खालील अर्ज भरून आपल्या नाव, पत्ता, मेल आणि मोबाईलसह 'सकाळ'च्या नजीकच्या कार्यालयात जमा करावा. भाग्यवंत पाच हजार वाचकांना कार्यक्रमाचे पासेस दिले जातील. 

'सलमान खान नंबर वन का आहे' हे ट्विट करा #SakalNumberOne हा हॅशटॅग वापरून..

Loading...

सोहेल खान म्हणाला, ''लाइव्ह कॉन्सर्ट करताना मोठे आव्हान आहे. यामध्ये खूप कष्ट आणि समयसूचकता हवी असते. यासोबतच कार्यक्रमाला वेग आणि मनोरंजनात्मकतासुद्धा हवी असते. प्रत्येक शो हा प्रयोग असून, त्यामध्ये सुधारणा होत असते. 24 मार्चला पुण्यात होणारा सलमान खानचा 'द- बॅंग' हा कार्यक्रम उत्तमोत्तम करण्यावर आमचा भर आहे.'' 

सोहेल म्हणाला, 'द- बॅंग' सलमान खानच्या नेतृत्वाखाली चालविण्यात येत आहे. याला हॉंगकॉंग, ऑकलंड, मेलबर्न, दिल्ली या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विदेशातील अनेक भारतीय कुटुंबांनी सांगितले, की ते आपल्या मुलांना भारतीय संस्कृती, परंपरा, नृत्य दाखविण्यासाठी बॉलिवूडचा आधार घेतात. भारतीय चित्रपटांसाठी ही चांगली गोष्ट आहे. 

'द- बॅंग' टूर हा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून, बॉलिवूड चाहत्यांसाठी हा सर्वोत्तम कार्यक्रम असल्याचे पवानी यांनी सांगितले. पुणे शहर हे नेहमीच मनोरंजनाचे दुसरे नाव म्हणून प्रसिद्ध असून, पुणेकरांनी नेहमीच सर्व प्रकारच्या कलांना प्रोत्साहन दिल्याचे कस्पटे यांनी सांगितले. तिकिटे येथे मिळतील... बुक माय शो, पेटियम, इनसायडर.इन आणि www.dabanggtourepune.com वर तिकिटे उपलब्ध असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले.   

Web Title: marathi news Salman Khan Concert in Pune Dabangg tour Pune

टॅग्स

संबंधित बातम्या

पर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच

पुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...

मार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले

पुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...

pune-herritage-walk.jpg
"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद

पुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...

junnar
जुन्नरला मुस्लिम आरक्षण हक्क परिषदे संपन्न

जुन्नर - महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलन संघटनेचे वतीने जुन्नर येथे मुस्लिम आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन बुधवार ता.14 रोजी करण्यात आले होते. या...

Kerosene
जिल्हा रॉकेलमुक्त झाल्याचा दावा

जळगाव - जिल्ह्यात रेशन दुकानावरील धान्यवाटपात आता मोठी सुधारणा झाली आहे. ‘सप्लाय चेंज मॅनेजमेंट सिस्टिम’च्या सुविधेमुळे शिधापत्रिकाधारकांना राज्यातून...

accident_spot
सोलापूर शहरात  21 'ब्लॅक स्पॉट' 

सोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....