Sections

उरुळी कांचन व लोणी काळभोर येथे दहावीची परीक्षा सुरळीत चालू

जनार्दन दांडगे |   गुरुवार, 1 मार्च 2018
10th-exam

उरुळी कांचन (पुणे) : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्र संचालिका तथा विद्यालयाच्या प्राचार्या अलका परदेशी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देवून परीक्षेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. विद्यालयाच्या वतीने परीक्षार्थींच्या स्वागतासाठी परीक्षाकेंद्राच्या प्रवेशद्वारावर रांगोळी रेखाटण्यात आली होती.

उरुळी कांचन (पुणे) : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्र संचालिका तथा विद्यालयाच्या प्राचार्या अलका परदेशी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देवून परीक्षेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. विद्यालयाच्या वतीने परीक्षार्थींच्या स्वागतासाठी परीक्षाकेंद्राच्या प्रवेशद्वारावर रांगोळी रेखाटण्यात आली होती.

विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर उरुळी कांचन व परिसरातील एकूण बारा शाळांचे मिळून १ हजार २६३ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित असल्याची माहिती अलका परदेशी यांनी दिली. यामध्ये उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, एंजल हायस्कूल, कोरेगाव मुळ येथील अमर एज्युकेशन इंस्टीट्युट, सोरतापवाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालय, शिंदवणे येथील संत यादवबाबा माध्यमिक विद्यालय, अष्टापूर येथील न्यू. इंग्लिश स्कूल, हिंगणगाव येथील लोकनेते दादा जाधवराव माध्यमिक विद्यालय व दौंड तालुक्याच्या यवत येथील विद्या विकास मंदिर, बोरी भडक येथील सुभाष अण्णा कुल माध्यमिक विद्यालय, बोरी ऐंदी येथील शिवराम बापू कुदळे माध्यमिक विद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

यावेळी परीक्षा केंद्रावर सर्व सहभागी शाळांचे मुख्याध्य्पक व अध्यापक उपस्थित होते. तसेच पर्यवेक्षक डी. के. टिळेकर, लता चव्हाण, के. बी. दिवेकर, ए. एस. पाटील व व्ही. बी. थिटे यांनी परीक्षा केंद्राचे नियोजन केले. 

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरीअल हायस्कूल व कन्या प्रशाला या परीक्षाकेंद्र व परीक्षा उपकेंद्रावर अनुक्रमे ५०० व ४६४ विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती केंद्र संचालक तथा हायस्कूलचे प्राचार्य एस. एम. गवळी यांनी दिली. यामध्ये लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरीअल हायस्कूल, कन्या प्रशाला, लोणी स्टेशन येथील सेंट तेरेसा, थेऊर येथील चिंतामणी माध्यमिक विद्यालय, न्यू. इंग्लिश मीडियम, आळंदी म्हातोबाची येथील म्हातोबा माध्यमिक विद्यालय, कुंजीरवाडी येथील ग्रामीण सर्वांगीण विकास माध्यमिक विद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यावेळी एस. एम. गवळी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कन्या प्रशालेच्या प्राचार्या सरोज पाटील, पर्यवेक्षक एस. बी. कामत, निजाम जमादार, एस. एस. खळदकर, एस. जे. धिमधिमे उपस्थित होते. दरम्यान लोणी काळभोर पोलिसांच्या वतीने उरुळी कांचन व लोणी काळभोर या दोन्ही परीक्षा केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Marathi news pune news uruli kanchan loni kalbhor 10th exam starts

टॅग्स

संबंधित बातम्या

15 मुद्यांच्या आधारे सोलापुरातील झेडपी शाळांची तपासणी

सोलापूर- दिवाळीच्या सुटीनंतर यंदाच्या वर्षातील दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (ता. 19) सुरवात होत आहे. सुटीनंतरच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील...

नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार

खामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...

समायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार 

मुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...

सीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे 

नवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...

File photo
अकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ

अकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...

शेतकऱ्यांना भरावे लागणार मुद्रांक शुल्क

पुणे - विशेष नगर वसाहतींमध्ये समाविष्ट होणाऱ्या शेतकऱ्यांना विकसकाबरोबर करार केल्यानंतर आर्थिक अथवा भागीदारी स्वरूपात मिळणाऱ्या मोबदल्यावरदेखील आता...