Sections

सांगवीत श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्यास सुरूवात

रमेश मोरे |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
Sant Tukaram Maharaj

या सप्ताहा निमित्त मंगळवार (ता. ६) विष्णु महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेद आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात वनस्पती परिचय, आहार, विविध रोगाविषयी माहिती व गो शाळेतील औषधे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तर गुरूवार ता.८ विविध आयुर्वेदीक काढे, ज्युस तयार करून मोफत वाटप करण्यात येणार आहे.

पुणे : जुनी सांगवी येथील प.पु. अवधुत बालयोगी नंदकुमार महाराज यांच्या विसाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त दत्तआश्रमात अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत  तुकाराम महाराज गाथा  पारायण सोहळ्याची सुरूवात करण्यात आली.

श्री. ह. भ .प.शांतीब्रम्ह मारूतीबाबा कु-हेकर यांच्या शुभहस्ते गाथा पुजन व वीणा पुजन करण्यात आले. यावेळी ह.भ.प.माधव महाराज इंगोले यांच्या हस्ते कलश पुजन व टाळ पुजन करण्यात आले. या अखंड हरिनाम सप्ताहात बुधवार (ता.२८) सायं.श्री कान्होबा महाराज देहुकर, गुरूवार ता.१ श्री.बाबा महाराज बो-हाडे लातुरकर, शुक्रवार (ता.२) वेदांताचार्य श्री लक्ष्मण महाराज चव्हाण सोलापुरकर,शनिवार (ता.३) श्री लक्ष्मण महाराज कोकाटे काटेवाडीकर,रविवार (ता. ४) ह.भ.प.शांताब्रम्ह मारूतीबाबा कु-हेकर, सोम.ता.श्री.संत भारतीदास महाराज कोठाळकर यांचे सायं ७ ते ९ किर्तन होणार आहे.

मंगळवार (ता. ६) सकाळी भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांचे काल्याचे किर्तन होईल. दुपारी १ ते ३ महाप्रसाद  याचबरोबर सोमवार (ता.५) मार्च सालाबादप्रमाणे सायंकाळी दिंडी मिरवणुक काढण्यात येणार आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी प.पू.बालयोगी नंदकुमार महाराज यांच्या जयंती निमित्त तपपुर्ती सोहळा व प्रवचन सेवा होईल. या सप्ताहा निमित्त मंगळवार (ता. ६) विष्णु महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेद आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात वनस्पती परिचय, आहार, विविध रोगाविषयी माहिती व गो शाळेतील औषधे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तर गुरूवार ता.८ विविध आयुर्वेदीक काढे, ज्युस तयार करून मोफत वाटप करण्यात येणार आहे. या शिबिरादरम्यान संपुर्ण आरोग्याविषयीचे आहार सत्र नियमावली व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Web Title: marathi news Pune news Sant tukaram

टॅग्स

संबंधित बातम्या

Weather-Center
गरज स्वयंचलित हवामान केंद्रांची...

हवामानावर आधारित शेती आणि शेती व्यवस्थापनासाठी गावोगावी स्वयंचलित हवामान केंद्रांची स्थापना आवश्यक आहे. या केंद्रांमधून आकडेवारी सातत्याने उपलब्ध...

Fule-vada.jpg
फुलेवाडा परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात 

पुणे  : थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाडा परिसराचा अस्वच्छतेचे सांम्राज्य पसरले आहे. फुलेवाड्या समोरील मोकळ्या मैदानाजवळ...

Prostitution
नऊ महिन्यांत केवळ पाच छापे

नागपूर - उपराजधानीतील वाढत्या गुन्हेगारीसह सेक्‍स रॅकेट्‌सची राज्यभरात चर्चा आहे. एकेकाळी सेक्‍स रॅकेटवरील कारवाईत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर...

Homeguard
समान वेतन, समान कामासाठी सरकार सकारात्मक

नागपूर - होमगार्ड जवानांना मानधनाऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे समान काम समान वेतन देण्यासाठी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

nanaware
भाजप वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी डॉ. प्रदीप ननावरे

नवी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी पिंपळे गुरव येथील डॉ. प्रदीप ननावरे यांची निवड करण्यात आली...