Sections

आमराईत बहरला मराठी वाचन कट्टा..

पराग जगताप |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
Vachankatta

ओतूर ता.जुन्नर (पुणे) : आंब्याच्या झाडावर लटकलेली मराठी भाषेची महत्व सांगणारी पोस्टर्स आणि त्या गर्द छायेत बहरलेला मराठी वाचन कट्टा हे अनोखे चित्र बल्लाळवाडी ता.जुन्नर येथिल कैवल्यधाम आश्रमात पहायला मिळाले.औचित्य होते. जागतिक मराठी भाषा दिनाचे, इंग्रजी माध्यमातील शाळांतून मराठी दुरावली जातेय हा गैरसमज दूर करणारा हा आगळा उपक्रम होता.

ओतूर ता.जुन्नर (पुणे) : आंब्याच्या झाडावर लटकलेली मराठी भाषेची महत्व सांगणारी पोस्टर्स आणि त्या गर्द छायेत बहरलेला मराठी वाचन कट्टा हे अनोखे चित्र बल्लाळवाडी ता.जुन्नर येथिल कैवल्यधाम आश्रमात पहायला मिळाले.औचित्य होते. जागतिक मराठी भाषा दिनाचे, इंग्रजी माध्यमातील शाळांतून मराठी दुरावली जातेय हा गैरसमज दूर करणारा हा आगळा उपक्रम होता.

कैवल्यधाम आश्रमाचे संस्थापक स्वामी कैवल्यानंद गिरीजी महाराज यांनी या कट्ट्यावर उपस्थित विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या बालचमूंना मराठीचे महत्व सांगितले. मराठी ही महाराष्ट्राची समृद्ध भाषा आहे. ही प्रेमळ, हळुवार शब्दांनी रुजणारी तर, कठीण, वज्र शब्दांनी वार करणारी भाषा असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी विषयाचे पुस्तक देऊन त्याचे या वाचन कट्ट्यावर वाचन करुन घेण्यात आले.

वाचन कट्टा उपक्रमाचा प्रारंभ कैवल्यानंद महाराज यांच्या हस्ते सरस्वती पूजन करुन करण्यात आले. यावेळी झाड देते फुल, झाड देते फळे, झाड देते छाया, झाड देते माया..अशा मराठी भाषेतील विविध कवीतांचे समूह वाचन देखील करण्यात आले. वाचनाची आवड वाढावी या दृष्टीने वाचन कट्ट्याचे आयोजन करुन वाचन उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहीती यावेळी देण्यात आली. शाळेचा शिक्षकवृंद, विश्वस्त यांनी यासाठी परिश्रम घेतले.

Web Title: Marathi news pune news junnar vachankatta students

टॅग्स

संबंधित बातम्या

Sadanand-More
नवीन साहित्य प्रकाशित करण्यावर भर

पुणे - राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मराठी भाषा विभागाच्या साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांची...

संमेलनाने उजेड दाखवला - ढेरे

साहित्य संमेलन होणार की नाही, याचे सावट दूर होऊन हे संमेलन आनंदाने, यशस्वी झाले. रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाचेच हे फळ आहे. मळभ दाटून आलेले असताना...

उत्फुल्ल कारंजे (श्रद्धांजली)

जाड फ्रेमचा चष्मा, चेहऱ्यावर काहीसे बावळट भाव आणि डोळ्यात बेरकीपणा... अशा अवतारात किशोर प्रधान अवतरले की रंगभूमी किंवा चित्रपटांच्या पडद्याची चौकट...

जीत-मंत्र ! (ढिंग टांग!)

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) कालचा दिवस मोठ्या गडबडीत गेला. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने दोन दिवस दिल्लीत होतो. पण...

गुंडप्रवृत्तीमुळेच 'निमंत्रण वापसी'

यवतमाळ- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी (यवतमाळ), ता.13 : गुंडप्रवृत्तीमुळेच 'निमंत्रण वापसी'चा निर्णय साहित्य संमेलनाच्या आयोजकांना घ्यावा...

Sachin-Tendulkar
प्रेम करणारा नव्हे, खेळणारा देश व्हावा - सचिन तेंडुलकर

नागपूर - आपल्या देशात खेळावर प्रेम करणारे कोट्यवधी लोक आहेत. त्या तुलनेत मैदानावर खेळणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. भारत हा खऱ्या अर्थाने खेळाडूंचा...