Sections

पुणे - जुन्नरला विद्यार्थ्यांनी केली तंबाखूजन्य पदार्थांची होळी

दत्ता म्हसकर |   गुरुवार, 1 मार्च 2018
Holi

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांतून आज (ता.1) तंबाखूजन्य पदार्थांची विद्यार्थ्यांनी होळी केली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी के.डी.भुजबळ यांनी दिली.

तालुक्यात 488 शाळा असून जुन्नर तालुका हा तंबाखू मुक्त शाळांचा तालुका होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. गेल्या वर्षांपासून यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात आदी समजावून सांगाण्यासाठी व्याख्याने, चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले.

लहान वयात मुलांना याची जाणीव व्हावी तसेच या शिक्षित पिढीने आपल्या घरातील, परिसरातील तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन करणाऱ्यांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करावेत असा उद्देश या मागे असल्याचे त्यांनी सांगितले. श्री विघ्नहर सहकारी साखर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कोपी व परिसरातील तंबाखूजन्य पदार्थ गोळा केले. शिक्षकांनी  मुलांना होळी सभोवती बसवून माहिती दिली यानंतर या पदार्थाची होळी करण्यात आली.

Web Title: Marathi news pune news junnar tobaco holi fire

टॅग्स