Sections

पुणे : अतिदक्षता विभागातील रुग्णावर मांत्रिकाकडून उपचार!

अश्‍विनी जाधव केदारी |   मंगळवार, 13 मार्च 2018
Sandhya-Sonawane

पुणे - पुरोगामी समजल्या जाणाऱ्या पुण्यात रुग्णाला बरे करण्यासाठी चक्क अतिदक्षता विभागातच डॉक्‍टर व नर्सच्या उपस्थितीत मांत्रिकाकडून मंत्रोच्चाराद्वारे जादूटोणा करीत उपचार सुरू होते, अशी धक्कादायक माहिती मंगळवारी उघड झाली. यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने हात वर केले असून, उपचार करणाऱ्या खासगी डॉक्‍टरांनी मात्र कानावर हात ठेवले आहेत. दरम्यान, या प्रकरणामध्ये त्या महिलेला जीव गमवावा लागला. 

पुणे - पुरोगामी समजल्या जाणाऱ्या पुण्यात रुग्णाला बरे करण्यासाठी चक्क अतिदक्षता विभागातच डॉक्‍टर व नर्सच्या उपस्थितीत मांत्रिकाकडून मंत्रोच्चाराद्वारे जादूटोणा करीत उपचार सुरू होते, अशी धक्कादायक माहिती मंगळवारी उघड झाली. यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने हात वर केले असून, उपचार करणाऱ्या खासगी डॉक्‍टरांनी मात्र कानावर हात ठेवले आहेत. दरम्यान, या प्रकरणामध्ये त्या महिलेला जीव गमवावा लागला. 

संध्या गणेश सोनवणे (वय 24, रा. दत्तवाडी, सिंहगड रस्ता) यांना छातीत दुधाची गाठ असल्यामुळे 20 फेब्रुवारीला स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होम येथे गाठ काढण्याची शस्त्रक्रिया झाली. नर्सिंग होमचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सतीश शाहूराव चव्हाण आणि डॉ. अर्चना सतीश चव्हाण यांनी ही शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर अतिरक्तस्राव झाल्याने संध्या यांना 21 फेब्रुवारी रोजी दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रविवारी (ता.11) डॉ. सतीश चव्हाण यांनी दीनानाथ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दुपारी एका साध्या वेशातील मांत्रिकाला आणून हळद, कुंकू, बुक्का आणि फुलांद्वारे उपचार घेत असलेल्या महिलेवर मंत्रोच्चार केले. या प्रकाराचे चित्रीकरण महिलेचा भाऊ महेश जगताप यांनी मोबाईलमध्ये केले. सोमवारी संध्या सोनवणे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नातेवाइकांनी मृत्यूचे कारण स्पष्ट करावे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. 

मृत महिलेचा भाऊ महेश जगताप म्हणाला, 'चव्हाण नर्सिंग होम येथे गेल्या महिन्यात बहिणीच्या छातीतील दुधाची गाठ काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सलग दोन दिवस अतिरक्तस्राव झाल्यानंतर रक्तदाब कमी झाल्यामुळे बहिणीला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलविण्यास सांगितले. 11 मार्च रोजी दुपारी डॉ. चव्हाण आणि एक अनोळखी साध्या वेशातील व्यक्ती अतिदक्षता विभागात भेटण्यास आले. त्यांनी माझा देवावर विश्‍वास असून बहिणीच्या उपचारासाठी मांत्रिकाला आणले असल्याचे सांगितले. त्यानंतर फुले, हळदी-कुंकवाने मंत्रोच्चार करण्यास सुरवात केली. मला संशय आल्यामुळे मी त्याचे चित्रीकरण करून ठेवले. 12 मार्चला माझ्या बहिणीचा मृत्यू झाला. माझ्या बहिणीसोबत जो अघोरी उपचाराचा प्रकार घडला तो अन्य कोणावर होऊ नये, यासाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन तावरे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना हा प्रकार सांगितला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्‍टर व मांत्रिकावर गुन्हा दाखल करावा.'' 

या प्रकरणाला वाचा फोडणारे सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे पदाधिकारी सचिन तावरे म्हणाले, 'अतिदक्षता विभागात नातेवाइकांशिवाय कोणालाच सोडले जात नाही. परंतु, दीनानाथ रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडलाच कसा, याची चौकशी झाली पाहिजे. डॉ. सतीश चव्हाण यांना मांत्रिकाद्वारे उपचारासंदर्भात विचारणा केली असता, दोन ते तीन अन्य डॉक्‍टरांसोबत येऊन मृत महिलेच्या कुटुंबीयांना समजावून सांगा, हे प्रकरण मिटवा, असे सांगून मला विकत घेण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना हाकलून दिले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि व्यक्तिगत मी स्वतः या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देत आहे.'' 

या संदर्भात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. समीर जोग म्हणाले, 'संबंधित महिलेला "डायलिसिस' केले जात होते. त्यामुळे अवयव निकामी (मल्टिपल ऑर्गन फेल्युअर) झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. एका खासगी रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया केली गेली होती. त्यानंतर अतिरक्तस्रावामुळे तिला 21 फेब्रुवारी रोजी अतिदक्षता विभागात दाखल केले होते.'' 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर म्हणाले, 'अतिदक्षता विभागात जो प्रकार घडला, त्यामध्ये मंगेशकर रुग्णालयाचा काहीही संबंध नाही. आमच्या पूर्वपरवानगी शिवाय चोरून हा प्रकार केल्याचे दिसून येत आहे. असे प्रकार पुढे होऊ नये याची दक्षता घेतली जाईल. पोलिस प्रशासनाला चौकशी व तपासकार्यात रुग्णालय प्रशासनाकडून सर्व मदत व सहकार्य केले जाईल.'' 

या संदर्भात डॉ. सतीश चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्या पत्नीने यावर आम्हा दोघांना मानसिक धक्का बसला असून, या प्रकरणी काहीही बोलण्यास असमर्थता दर्शविली. 

दोन मुले व अपंग पतीसोबत करीत होती ती संसार...  सिंहगड रस्ता येथील दत्तवाडी येथे पती गणेश सोनवणे यांच्यासमवेत संध्या त्यांच्या दोन मुलांसह राहत होत्या. त्यांचे पती गणेश हे अपंग असून एका खासगी कंपनीत नोकरी करीत होते. पाच वर्षांचा एक व दुसरा अडीच वर्षांचा मुलगा आहे. सासरे सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जाण्याने माहेरचे जगताप व सासरचे सोनवणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

चव्हाण मुहूर्तावर करायचे शस्त्रक्रिया  मृत संध्या सोनवणे यांच्यावर छातीतील गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी 20 फेब्रुवारी रोजी रात्री आठची वेळ दिली होती; परंतु सध्या ग्रह चांगले नसून "यमाची घंटा' असल्याचे सांगत नऊ किंवा दहा वाजण्याचा मुहूर्त चांगला असल्याचे सांगितले व रुग्णाला त्रास होत असतानादेखील त्यांनी उशिराने शस्त्रक्रिया केली. त्यानंतर अतिरक्तस्राव झाल्यानंतर तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये हलविण्यास सांगितले. त्यानंतर डॉ. सतीश चव्हाण यांनी सोनवणे कुटुंबीय व जगताप कुटुंबीयांना "देवावर विश्‍वास ठेवा सर्व काही ठीक होईल' असे सांगत दीनानाथ रुग्णालयात मांत्रिकाद्वारे मंत्रोच्चार केले. डॉ. चव्हाण पंचांग पाहून मुहूर्तावर सर्व शस्त्रक्रिया करीत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणानंतर मंगळवारी स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होम दिवसभर बंद ठेवण्यात आले होते. रुग्णालयाच्या मुख्य दरवाजावर कोहळा, घोड्याचा नाल आणि देवतांच्या तसबिरी असल्याचे निदर्शनास आले. 

अलंकार पोलिस ठाण्यामध्ये महाराष्ट्र अंनिसकडून तक्रार दाखल - दरम्यान, या प्रकरणामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून मंगळवारी सायंकाळी संबंधित डॉक्‍टरांविरोधात जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात अलंकार पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली. ""त्याआधारे संबंधित डॉक्‍टरांविरोधात गुन्हा दाखल करू, तसेच संबंधित मांत्रिकाचा तपास देखील करू,'' असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रेखा साळुंखे यांनी सांगितले. 

तो डॉक्‍टर व मांत्रिक अतिदक्षता विभागात गेले कसे?  दीनानाथ रुग्णालयाच्या नवीन व जुन्या इमारतीमध्ये अतिदक्षता विभागामध्ये अतिदक्षता विभागामध्ये गंभीर रुग्ण ठेवले जातात. रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णांना पाहण्यासाठी पास दिले जातात. अतिदक्षता विभागामध्ये डॉक्‍टर, नर्स, सीसीटीव्ही फुटेज, सुरक्षारक्षकांचे कडे असूनही डॉक्‍टर आणि मांत्रिक रुग्णाकडे कसे काय पोचले, सर्वांच्या समक्ष मंत्रोच्चार करीत असताना त्यांना कोणी रोखले कसे नाही, असे प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहे. त्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सुरक्षाव्यवस्थेवर देखील प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: marathi news pune news deenanath mangeshkar hospital

टॅग्स

संबंधित बातम्या

17 कोटी खर्चून लावणार उड्डाण पुलांवर दिवे

पुणे : महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांतील साडेपाच ते सहा लाख रहिवाशांसाठी पाणी, आरोग्य आणि वाहतूक सेवा रखडल्या, दुर्बल घटकांच्या योजना बंद...

Girish-Bapat
हेल्मेटबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू पालकमंत्री

पुणे - वाहतूक नियमन करण्याऐवजी पोलिसांकडून केवळ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांकडून दंड आकारण्याचे काम सुरू आहे. याला नागरिक त्रासले असून, याबाबत वाहतूक...

Water-Supply
शिक्षणासह पाणीपुरवठ्यावर भर

पुणे - जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या योजनांसाठी २०१९-२० या वर्षासाठी ५०५ कोटी ७६ लाख रुपयांच्या प्रस्तावित विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली....

मुलांच्या हाती मोबाइल नको; तबला-तंबोरा द्या!

पुणे - ‘‘हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं भवितव्य उज्ज्वलच आहे. कारण आताची तरुण पिढी खूप हुशार आहे. रियाजासाठी असंख्य साधनं आणि माध्यमं...

पाणीकपातीचा निर्णय पुढील महिन्यामध्ये  

पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा आणि त्याचा वापर लक्षात घेता पाणीकपात करावी लागेल. मात्र, त्याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात घेऊ,...

3Devendra_Fadnavis_169.jpg
पुण्यात महिला, बालक आणि जेष्ठांना 'भरोसा कक्षा'चा आधार

पुणे  : केवळ गुन्हेगार पकडणे हेच पोलिसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्यक आहे. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी...