Sections

"स्थायी'चे नवे सदस्य आज ठरणार 

मिलिंद वैद्य |   बुधवार, 28 फेब्रुवारी 2018
PCMC

पिंपरी - स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ जागांसाठी नव्या सदस्यांची नावे बुधवारी सर्वसाधारण सभेत जाहीर होणार आहेत. रिक्त जागांवर भाजपचे सहा, तर राष्ट्रवादीचे दोन सदस्य नव्याने निवडले जाणार असून, सत्ताधारी भाजपमध्ये त्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. 

पिंपरी - स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ जागांसाठी नव्या सदस्यांची नावे बुधवारी सर्वसाधारण सभेत जाहीर होणार आहेत. रिक्त जागांवर भाजपचे सहा, तर राष्ट्रवादीचे दोन सदस्य नव्याने निवडले जाणार असून, सत्ताधारी भाजपमध्ये त्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. 

सर्वसाधारण सभेत नावे जाहीर होण्यापूर्वी भाजपची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून, तर राष्ट्रवादीची नावे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सकाळी कळविण्यात येणार आहेत. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये विद्यमान अध्यक्षा सीमा सावळे यांचेच नाव असल्यामुळे अध्यक्षपदासाठीदेखील भाजपमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. शीतल शिंदे, विलास मडिगेरी, संदीप वाघेरे, राहुल जाधव, संदीप कस्पटे आणि उत्तम केंदळे यांची नावे चर्चेत आघाडीवर आहेत. 

भाजपकडे वीस इच्छुक  भाजपकडे एकूण वीस इच्छुकांनी अर्ज केले आहेत. त्यातून सहा सदस्यांची निवड होणार असल्याने पिंपरी, चिंचवड आणि भोसरी, अशा तीन विधानसभा मतदारसंघानुसार सदस्यांची नावे निवडली जाणार असल्याचे सांगण्यात आले. विद्यमान अध्यक्षा या भोसरी विधानसभा मतदारसंघातील असल्या, तरी त्या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक आहेत. त्यामुळे आता आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकाला संधी देताना भोसरी विधानसभेलाच प्रतिनिधित्व मिळण्याची दाट शक्‍यता आहे. या विभागात विलास मडिगेरी आणि राहुल जाधव यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मडिगेरी यांच्याकडे सभागृह नेतापदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यामुळे राहुल जाधव यांचा "स्थायी'च्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. याच पदासाठी जुन्या गटाकडून शीतल शिंदे यांचे नाव श्रेष्ठींकडे लावून धरण्यात आले आहे. 

राष्ट्रवादीची चार नावे चर्चेत  स्थायी समितीमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन महिला सदस्य निवृत्त झाल्या असल्याने त्या जागी पुन्हा दोन महिला सदस्यांना संधी दिली जाणार आहे. चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून दोन नवीन महिला सदस्यांची नावे अजित पवार यांच्याकडून सुचविली जाणार असून, त्यामध्ये गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर, पौर्णिमा सोनवणे आणि संगीता ताम्हाणे या चार सदस्यांची नावे चर्चेत आघाडीवर आहेत. यातीलच दोन नावांना पवार यांच्याकडून संमती दिली जाण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

भाजपचा चार-दोन-चारचा फॉर्म्युला  भाजपचे सहा सदस्य स्थायी समितीतून निवृत्त होत असले, तरी उर्वरित चार सदस्यांचेदेखील राजीनामे घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता सहा सदस्यांची नियुक्ती आणि पुढील महिन्यात उर्वरित चार सदस्यांची निवड भाजपकडून केली जाण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी पक्षाने चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी अनुक्रमे "चार-दोन-चार' असा फॉर्म्युला निश्‍चित केला आहे. त्यानुसार चिंचवडचे चार, पिंपरीचे दोन आणि भोसरीचे चार सदस्य स्थायी समितीत असतील, असे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: marathi news PCMC standing committee

टॅग्स

संबंधित बातम्या

'महेश’ सुरु होणार ; आष्टीसह तीन तालुक्यांचा ऊसप्रश्न सुटणार

आष्टी (जि. बीड) : सहा वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या तालुक्यातील जळगाव येथील महेश सहकारी साखर कारखाना सुरु होणार असल्याने आष्टीसह पाटोदा व...

file photo
राजधानीत रुग्णालयामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नवी दिल्लीः राजधानीत एका सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या अकरा वर्षीय मुलीवर रुग्णालयातील कर्मचाऱयाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे....

लाखोंच्या उत्साहात कडेगावमध्ये गगनचुंबी ताबुतांच्या भेटी 

कडेगाव - डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा आनंदसोहळा आज राज्यासह कर्नाटकातून आलेल्या लाखांवर भाविकांनी अनुभवला. दुला दुला व...

yogi adityanath
योगींनी मोदींची तुलना केली शिवाजी महाराजांशी

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली आहे. काही आठवडयांपूर्वी...

चंद्रकांत पाटील यांची हत्तीवरून मिरवणूक काढू - मुश्रीफ

कोल्हापूर - चंद्रकांत पाटील सहकारमंत्री असताना जिल्हा दूध संघात (गोकुळ) उत्पादकांना आणि सभासदांना मतदानाचा अधिकार दिला जाईल, अशी घोषणा केली होती...