पुणे : पुण्यातील लोहगाव विमानतळाने 2017-18 या वर्षात पहिल्यांदाच 80 प्रवासी वाहतुकीचा टप्पा गुरुवारी ओलांडला. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) याची दखल घेऊन लोहगाव विमानतळाचे अभिनंदन केले आहे.
प्रवासी, विमान कंपन्या, विमानतळ कर्मचारी आणि प्रवासी पूरक सेवा पुरविणाऱ्या सर्व घटकांनी केलेल्या सहकार्यामुळे लोहगाव विमानतळ हा महत्त्वाचा टप्पा ओलांडू शकले, असे विमानतळाचे संचालक अजय कुमार यांनी म्हटले आहे.