Sections

लोहगाव विमानतळ देशात तिसरे 

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 7 मे 2018

पुणे - प्रवासी संख्येच्या वाढीमध्ये लोहगाव विमानतळाने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तब्बल 20.6 टक्‍क्‍यांनी प्रवासी संख्या वाढली आहे. कोलकता पहिल्या, तर अहमदाबाद विमानतळ दुसऱ्या स्थानावर आहे. 

पुणे - प्रवासी संख्येच्या वाढीमध्ये लोहगाव विमानतळाने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तब्बल 20.6 टक्‍क्‍यांनी प्रवासी संख्या वाढली आहे. कोलकता पहिल्या, तर अहमदाबाद विमानतळ दुसऱ्या स्थानावर आहे. 

देशातील दहा विमानतळांवरून दरवर्षी पन्नास लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची ये- जा होते. लोहगाव विमातळावरून 2017-18 या वर्षात 81 लाख 60 हजार प्रवाशांची वाहतूक झाली होती. त्यामुळे देशात ते विमानतळ नवव्या स्थानावर होते. परंतु, प्रवासी संख्यावाढीचा लोहगाव विमानतळाचा वेग 20.6 टक्के असल्यामुळ ते तिसऱ्या स्थानावर आले आहे. पुण्यातून मध्यम आणि हलक्‍या आकाराच्या विमानांचीच वाहतूक होत असूनही, पुण्यात प्रवासीवाढीचा वेग मोठा आहे, अशी माहिती लोहगाव विमानतळाचे संचालक अजय कुमार यांनी दिली. लोहगाव विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात 78 लाख 90 हजार प्रवाशांची देशांतर्गत वाहतूक झाली होती. त्यामुळे प्रवासी संख्येच्या वाढीचा वेग 21.2 टक्‍क्‍यांवर पोचला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

एअरपोर्ट सर्व्हिस क्‍वालिटी (एएसक्‍यू) या संस्थेने याबाबतचे व्यापक सर्वेक्षण केले आहे. 2016-17 मध्ये या विमानतळाचे स्थान देशात दहावे होते. देशातील पहिल्या 10 विमानतळांमध्ये बंगळुरू, हैदराबाद, कोचीन, गोवा, अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकता आणि पुण्याचा समावेश आहे. पुढील वर्षात या विमानतळावरील ही प्रवासी संख्या 1 कोटींपेक्षा अधिक होईल, असा अंदाज विमान वाहतूक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. 

लोहगाव विमानतळावर प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे विस्तारीकरण, नवा विमानतळ या पर्यायांची तातडीने अंमलबजावणी व्हायला हवी. व्हीआयपी लाउंजही लहान आहे. क्राय रूम किंवा फीडिंग रूम यांसारख्या सुविधांची गरज आहे. सिक्‍युरिटीसाठी सकाळी खूप मोठी रांग असते. पुण्यातील रस्त्यांप्रमाणे विमानतळाचीही ओव्हर क्राउडेड अशी अवस्था होऊ नये, असे वाटते. - सलील कुलकर्णी, गायक 

Web Title: lohegaon airport is the third in the country

टॅग्स

संबंधित बातम्या

मोपापेक्षा चिपी विमानतळाला चांगला प्रतिसाद लाभेल - राऊत

मालवण - चिपी विमानतळाचा परिसर हा आल्हाददायक असल्याने मोपापेक्षा याच विमानतळाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभेल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी...

अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे फवारणीचा प्रयोग

अकोला : ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला प्रयोग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर करण्यात आला. कृषी विद्यापीठ, पडगीलवार...

आंतरजातीय विवाहाबद्दल तेलंगणात तोडले मुलीचे हात 

हैदराबाद : तेलंगणच्या नलगोंडा जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना ताजी असतानाच हैदराबादमध्ये आणखी एक घटना घडली आहे. मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून...

औंरगाबाद-दिल्लीसाठी लवकरच दोन विमाने 

औरंगाबाद : मुंबई विमानसेवेसाठी स्लॉट मिळत नसला, तरीही दिल्लीसाठी मात्र लवकरच दोन विमाने सुरू होण्याच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. स्पाईस जेट आणि...

Inspection by BDDS at ganesh mandals crowded places for safety
सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी बीडीडीएसकडून गणेश मंडळांची पाहणी 

नांदेड : शहरात देश- विदेशातून सचखंड गुरुद्वाराचे व रेणूका माताचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांच्या व शहराच्या सुरक्षेला काही...