Sections

सोनवडी सुपे येथे विविध जलसंधारण कामाचा शुभारंभ

विजय मोरे |   गुरुवार, 3 मे 2018
Launch of various water conservation works at Sonawadi Supe

सोनवडी सुपेकरानी यंदा गावची दुष्काळ आणि पाणीटंचाई कायमची मिटवून गाव पाणीदार करण्यासाठी 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत भाग घेतला आहे.

उंडवडी : सोनवडी सुपे ( ता. बारामती) येथे 'पानी फाउंडेशन' उपक्रमाअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने मोफत पोकलेन मशिन उपलब्ध करुन दिले आहे. येथे या उपक्रमाअंतर्गत बांधबंधिस्तीच्या कामाचा शुभारंभ सरपंच मंदा मोरे व उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. 

ग्रामपंचायत सदस्य फत्तेसिंग गोंडगे, सोपान साळुंखे, प्रकाश मोरे, अर्जुन मोरे, अनिल कांबळे, अब्दुल सय्यद, ताराचंद थोरात, अभिजित जगताप, दादासाहेब जगताप, माजी उपसरपंच हारुण सय्यद आदींसह पानी फाऊंडेशन टिमचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

सोनवडी सुपेकरानी यंदा गावची दुष्काळ आणि पाणीटंचाई कायमची मिटवून गाव पाणीदार करण्यासाठी 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत भाग घेतला आहे.

या उपक्रमात गावकऱ्यांनी श्रमदानातून 8 एप्रिलपासून मोठ्या प्रमाणावर गावच्या माथ्यावर सलग समतल चरची कामे केली आहेत. तसेच गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत साडे चार हजार रोपांची रोपवाटिका तयार केली आहे. 

या उपक्रमांतर्गत यांत्रिकीकरणात पोकलेन मशिनद्वारे विविध जलसंधारणाची कामे गावकऱ्यांना करावयाची आहेत. त्यानुसार पोकलेन मशिनद्वारे बांधबधिस्तीची कामे सुरु केली आहेत. यामध्ये शेततळे, बांधबधिस्ती व खोल सलग समतल चर या कामाचा समावेश आहे.

या कामांसाठी भारतीय जैन संघटनेने पोकलेन मशिन उपलब्ध करुन दिले आहे. या पोकलेन मशिनला दीड लाख रुपये इंधनासाठी शासनाकडून मिळणार आहेत, अशी माहिती ग्रामसेविका स्वाती ताकवले व उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी दिली. 

Web Title: Launch of various water conservation works at Sonawadi Supe

टॅग्स

संबंधित बातम्या

Petrol price regularly hike
देशभरात पेट्रोलची दरवाढ सुरूच 

नवी दिल्ली : देशभरात पेट्रोलच्या दरातील वाढ शनिवारी कायम राहिली. पेट्रोलचा दर दिल्लीत आज प्रतिलिटर 82.44 रुपये आणि मुंबईत 89.80 रुपयांवर पोचला....

shriram pawar
हिंदुत्वाचं काँग्रेसी जुगाड... (श्रीराम पवार)

भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी "आम्हीही हिंदूच' हे दाखवून देण्याचा आटापिटा काँग्रेसनं चालवला आहे. त्याचं ताजं उदाहरण...

devidas tuljapurkar
एकीचे बळ... मिळेल फळ? (देविदास तुळजापूरकर)

विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण...

dr sanjay dhole
'भौतिक' जीवन होणार सुकर (डॉ. संजय ढोले)

मानवाच्या जीवनात भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान महत्त्वाची भूमिका बजावतं आणि पुढंही बजावत राहणार आहे. ऊर्जा भरपूर आणि रास्त दरात तयार करणं,...

गणेशभक्त देणार श्रींना भावपूर्ण निरोप 

पुणे : मंगलमय चैतन्योत्सव अर्थात गणेशोत्सवाची उद्या (ता.23) सांगता होत आहे. भक्तांचा पाहुणचार घेऊन बाप्पा निघाले आहेत. श्रींना वाजत गाजत निरोप...