Sections

बच्चे कंपनीसाठी धम्माल वर्कशॉप 

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 8 मे 2018
kids-karnival

पुणे - शाळांना उन्हाळ्याची सुटी लागल्यानंतर पालकांना सुटीच्या नियोजनाचा ताण येतो. हा ताण भुर्रकन उडवून लावणाऱ्या आणि सुटीची धमाल घडविणाऱ्या किड्‌स कार्निवलमधील मुलांचा सहभाग नक्कीच कल्पक ठरणार आहे. शिक्षणातून खेळ व खेळातून आनंद घेता यावा, म्हणून मुलांसाठी खास वर्कशॉपचे आयोजन केले आहे. 

पुणे - शाळांना उन्हाळ्याची सुटी लागल्यानंतर पालकांना सुटीच्या नियोजनाचा ताण येतो. हा ताण भुर्रकन उडवून लावणाऱ्या आणि सुटीची धमाल घडविणाऱ्या किड्‌स कार्निवलमधील मुलांचा सहभाग नक्कीच कल्पक ठरणार आहे. शिक्षणातून खेळ व खेळातून आनंद घेता यावा, म्हणून मुलांसाठी खास वर्कशॉपचे आयोजन केले आहे. 

मुलांच्या क्रिएटीव्हीटीला वाव देणारा हा भन्नाट कार्निवल शनिवार (ता. 12), रविवार (ता. 13), शुक्रवार (ता. 18), शनिवार (ता. 19) आणि शुक्रवार (ता. 25) या दिवशी होणार आहे. कॅलिडोस्कोप तयार करणे, क्‍ले मॉडेलिंग, पेपर क्राफ्ट, पेपर क्विलिंग फ्रिज मॅग्नेट, हिप पॉप डान्स यांसारख्या वर्कशॉपची मेजवानी मुलांना मिळणार आहे. यासाठी सर्व साहित्य मिळणार असून, स्वत: तयार केलेल्या वस्तू मुलांना घरी घेऊन जाता येणार आहेत. हे वर्कशॉप मोफत असून, त्यासाठी नजीकच्या पुणे सेंट्रल मॉलमध्ये दुपारी 12 ते रात्री 8 या वेळेत जाऊन नोंदणी करणे बंधनकारक आहे. कार्निवलमध्ये सहभागी होण्यासाठी मर्यादित जागा आहेत. 

सर्व वर्कशॉप पुण्यातील सेंट्रल मॉलच्या सर्व शाखांमध्ये सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 व सायंकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत होणार आहेत. 

Web Title: kids carnival workshop for children summer vacation

टॅग्स

संबंधित बातम्या

urali-kanchan.jpg
उरुळी कांचनमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

उरुळी कांचन  : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वापारीमल सावलदास या कपडयाच्या दुकानावर स्थानिक गुंडांच्याकडुन खंडणीच्या उद्देशाने झालेला गोळीबार व...

divyang
दिव्यागांनी मिळवला विकास निधीत वाटा

लातूर : स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या विकास निधीपैकी पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे सरकारचे आदेश आहे. मात्र, या आदेशाची...

तुर्काबादला किराणा दुकान फोडून 10 हजारांची चोरी

लिंबेजलगाव : तुर्काबाद खराडी (ता.गंगापुर, जि. औरंगाबाद ) येथे चोरट्यांनी किराणा दुकान फोडुन साहित्यासह 10 हजार रुपये चोल्याची घटना शनिवारी (ता.17)...

झाडे जगवण्यासाठी रिकाम्या बॉटलची करा मदत; तरुणाईचे आवाहन

संग्रामपूर- सातपुडा पर्वतराईत सालईबन या आदिवासी परिसरात लागवड केलेल्या झाडांना जगविण्यासाठी रिकाम्या बिसलरी बॉटलची मदत करा, असे आवाहन तरुणाई...

पाण्यासाठी सांगोल्यात जनावरांसह शेतकर्यांचे धरणे आंदोलन

सांगोला : तालुक्यातील माण नदीकाठच्या 14 गावातील शेतकऱ्यानी नदीमध्ये टेंभू योजनेचे पाणी सोडावे, या मागणीसाठी येथील तहसिल कार्यालयावर जनावरासह मोर्चा...

15 मुद्यांच्या आधारे सोलापुरातील झेडपी शाळांची तपासणी

सोलापूर- दिवाळीच्या सुटीनंतर यंदाच्या वर्षातील दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (ता. 19) सुरवात होत आहे. सुटीनंतरच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील...