Sections

विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी केली अन्न, पाणी, निवाऱ्याची व्यवस्था

दत्ता म्हसकर |   गुरुवार, 29 मार्च 2018
junnar

जुन्नर - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात वृक्ष लागवड केली आहे.  विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय हरित सेनेत सहभाग घेऊन स्वच्छता, वृक्ष संवर्धन, गडकोट संरक्षण असे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. त्यांना किर्लोस्कर फाऊंडेशनकडून पुरस्कारही देण्यात आला आहे. परिसरातील झाडे जोपासण्याची जबाबदारी या विद्यार्थ्यांनी हरितसेनेच्या माध्यमातून हाती घेतली आहे. शालेय परिसरात कोवळ्या पालवीने बहरलेली हिरवीगार झाडे आढळून येतात त्यामुळे येथे निरनिराळ्या पक्षांचा वावर वाढला आहे.

जुन्नर - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात वृक्ष लागवड केली आहे.  विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय हरित सेनेत सहभाग घेऊन स्वच्छता, वृक्ष संवर्धन, गडकोट संरक्षण असे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. त्यांना किर्लोस्कर फाऊंडेशनकडून पुरस्कारही देण्यात आला आहे. परिसरातील झाडे जोपासण्याची जबाबदारी या विद्यार्थ्यांनी हरितसेनेच्या माध्यमातून हाती घेतली आहे. शालेय परिसरात कोवळ्या पालवीने बहरलेली हिरवीगार झाडे आढळून येतात त्यामुळे येथे निरनिराळ्या पक्षांचा वावर वाढला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या पक्षांना अन्न,पाणी व निवारा उपलब्ध व्हावा या उद्देशाने हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी झाडांवर जागोजागी कागदी खोकी व प्लॅस्टीकच्या कॅनचा वापर करून राहण्यासाठी निवारा तसेच चा-यासाठी धान्याची व्यवस्था केली आहे. तसेच प्लॅस्टीकच्या रिकाम्या बाटल्या कापून त्यामध्ये पाणी भरून झाडांवर जागोजागी टांगून ठेवल्या आहेत. यामुळे शालेय परिसरात पक्षांचे प्रमाण वाढण्यास मदत झाली आहे.

तर निसर्गरम्य वातावरणात शिक्षण घेण्याचा आनंद विद्यार्थ्यांना मिळत आहे. या उपक्रमासाठी विद्यालयातील हरितसेनेचे मार्गदर्शक शिक्षक एस.व्ही.देवकुळे, व्ही.एस. भालींगे, साबळे, मनिषा खेडकर यांनी मार्गदर्शन केले असल्याचे मुख्याध्यापक दिलीप फापाळे यांनी सांगितले.

Web Title: junnar students helps to grow plants for birds

टॅग्स

संबंधित बातम्या

शिक्षकांच्या पदोन्नतीच्या शासन निर्णयाकडे संस्थांचा कानाडोळा

मायणी - प्रथम नियुक्ती दिनांकानुसारच माध्यमिक शिक्षकांची सामायिक सेवाजेष्ठता यादी तयार करुन मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक पदी पदोन्नती द्यावी....

आंतरजातीय विवाहाबद्दल तेलंगणात तोडले मुलीचे हात 

हैदराबाद : तेलंगणच्या नलगोंडा जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना ताजी असतानाच हैदराबादमध्ये आणखी एक घटना घडली आहे. मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून...

अकरावी प्रवेशासाठी उद्यापासून अंतिम फेरी

पुणे - अकरावी प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) तिसरी फेरी घेण्यात येणार आहे. प्रवेशासाठीची ही अंतिम फेरी असून, येत्या...

ऋतुजा शिंदेने पटकाविला चांदीचा मुकुट

पिंपरी - लाडक्‍या गणरायाची, त्याच्या अवतार कार्याची माहिती नवीन पिढीला व्हावी, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ अर्थात...

खेळांच्या प्रोत्साहनासाठी शाळा, कॉलेजना निधी 

कऱ्हाड - खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शासनाकडून निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याअंतर्गत...