Sections

इंदापूर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीच्या सदस्यांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 3 एप्रिल 2018
इंदापूर ः पंचायत समिती सभागृहात बैठे आंदोलन करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य.

पंचायत समिती सदस्यांनी खाली बसणे हा सभागृहाचा अवमान आहे. सर्व सदस्यांनी सुसंवाद ठेवून कामकाज केल्यास सभागृहाची शान वाढणार आहे.
- करणसिंह घोलप, सभापती

गटविकास अधिकारी बिचकुले यांच्यावर कारवाईची मागणी

इंदापूर (पुणे) इंदापूर पंचायत समितीच्या लोकनेते शंकररावजी पाटील सभागृहात सभापती करणसिंह घोलप यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मासिक सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पंचायत समिती सदस्यांनी गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले यांच्यावर मनमानी कारभार व सदस्यांना अरेरावीची भाषा यामुळे शिस्तभंगाची कारवाई करावी, या मागणीसाठी बैठे आंदोलन केले. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत बैठे आंदोलन करण्याचा निर्धार या वेळी सदस्यांनी केला.

पळसदेव येथील एक ग्रामपंचायत सदस्य सलग सहा महिने गैरहजर राहिल्याने त्याचे सदस्यत्व रद्द करावे, एका सदस्याने शासकीय जागेत अतिक्रमण केल्याने त्याचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी गटविकास अधिकारी बिचकुले यांच्याकडे करण्यात आली होती. यासंदर्भात बिचकुले यांच्याशी पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधला असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरली, मनमानी कारभार करीत त्यांचे सभासदत्व रद्द केले नाही, असा आक्षेप होता. त्यामुळे पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली सतीश पांढरे, शीतल वणवे, शैलजा फडतरे, सारिका लोंढे यांनी सभागृहात बैठे आंदोलन केले.

याबाबत गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता दोन्ही तक्रारी आल्यानंतर विस्तार अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला. तेथे दोन्ही तक्रारींसंदर्भात उपजिल्हाधिकारी स्तरावर निर्णय झाला. या निर्णयासंदर्भात संबंधित पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी दाद मागणे संयुक्तिक आहे. यासंदर्भात माझे काही चुकले असेल, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मला आदेश देतील. अरेरावीची भाषा ग्रामपंचायत सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी माझ्या कार्यालयात येऊन वापरल्याचा दावा त्यांनी केला.

Web Title: indapur panchayat samiti and ncp

टॅग्स

संबंधित बातम्या

राज्यातील प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन सुरू 

सातारा -  प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवून तातडीने भरती करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन तत्त्व लागू करावे, अशा...

‘रघुवंशी’मधील अतिक्रमणे हटवली 

मुंबई - दक्षिण मुंबईतील सेनापती बापट मार्गावर रघुवंशी मिलचा मोठा भूखंड आहे. तेथील २० हजार चौरस फूट जागेत झालेली अतिक्रमणे सोमवारी पालिकेच्या...

‘अनधिकृत’वर गुन्हे नको, कारवाई हवी

अनधिकृत बांधकामांचे ग्रहण केव्हा सुटायचे ते सुटो. गेली दहा वर्षे तोच तो प्रश्‍न पुन्हा पुन्हा समोर येतोय. वारंवार त्याचे राजकारण होते. लोकसभा,...

Sharad Pawars clarification on Udayanrajes Candidature
उदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...

''जळगाव-सोलापूर लोहमार्ग व्हावा''

बीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...