Sections

अनधिकृत बांधकामे जोमात

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 21 एप्रिल 2018
चिखली - मोरेवस्ती, म्हैत्रेवस्ती भागात सुरू असलेले अनधिकृत बांधकाम.

चिखली - सध्या शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. इमल्यावर इमले चढविले जात असताना महापालिका अधिकारी या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. नोटिसा देऊन कारवाई होत असल्याचे पालिका अधिकारी सांगतात; परंतु दाखवण्यापुरतीच कारवाई केली जात असल्याने, नागरिक अशा कारवाईला भीक घालत नाहीत. शहराच्या बकालपणात मोठी वाढ झाली असून, ‘अनधिकृत बांधकामे जोमात, अधिकारी कोमात’ अशी परिस्थिती सध्या पाहावयास मिळत आहे.  

चिखली - सध्या शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. इमल्यावर इमले चढविले जात असताना महापालिका अधिकारी या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. नोटिसा देऊन कारवाई होत असल्याचे पालिका अधिकारी सांगतात; परंतु दाखवण्यापुरतीच कारवाई केली जात असल्याने, नागरिक अशा कारवाईला भीक घालत नाहीत. शहराच्या बकालपणात मोठी वाढ झाली असून, ‘अनधिकृत बांधकामे जोमात, अधिकारी कोमात’ अशी परिस्थिती सध्या पाहावयास मिळत आहे.  

महापालिका निवडणुकीनंतर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारल्याने काही दिवस अनधिकृत बांधकामे थांबली होती; परंतु आता वर्षभरावर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत. ही संधी हेरून काही नागरिकांनी पुन्हा शहरभर अनधिकृत बांधकामाचा धडाकाच लावला आहे. पालिका अधिकारी याबाबत आपले काहीच कर्तव्य नाहीच, असे समजून गप्प आहेत.

कारवाई दाखविण्यापुरतीच उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिल्या जात आहेत. कारवाईसुद्धा केली जात असल्याचे महापालिका अधिकारी सांगत आहेत; परंतु कारवाई करताना राजकीय नेत्यांच्या सल्ल्याने ती केली जाते. राजकीय पाठबळ नसलेल्या व्यक्तीवरच कारवाई होते. इतर ठिकाणी फक्त दाखविण्यापुरतीच कारवाई केली जाते. कारवाईनंतर लगेचच बांधकाम पूर्ण केले जाते. त्यामुळे महापालिका अधिकारी आणि राजकीय पुढारी यांच्या संगनमतामुळेच अशी बांधकामे होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

राजकीय नेत्यांकडून आश्वासने रेडझोन, पालिका आणि प्राधिकरणाच्या आरक्षित जागेवरील बांधकामे नियमित होत नाहीत; तरीही नागरिक अशा आरक्षित जागा खरेदी करतात. नेते, प्रश्न सोडविण्याची खोटी आश्वासने देऊन नागरिकांना आरक्षित जागेवरील बांधकामे करण्यास प्रोत्साहन देतात. 

हजारो बांधकामे सुरू  विशेषतः उपनगर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होताना दिसत आहेत. भोसरी, चिंचवड, परिसरातील उपनगरीय भागात गुंठा, दोन गुंडे जागा खरेदी करणारे नागरिक ही बांधकामे करत आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी भोसरी, चिखली परिसरात कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामे सुरू असतील तर त्याची माहिती घेण्यात येईल. तसेच नोटीस देण्याचे काम सुरू असून, यापुढे कारवाई सुरू राहील.  - प्रशांत पाटील, पालिका अधिकारी

अनधिकृत बांधकामांमुळे शहराच्या बकालपणात वाढ होते. मात्र, नागरिकांनी गुंठा, दोन गुंठे जागा घेतल्यावर ते बांधकामे करणारच, ही ठरलेली बाब आहे; परंतु त्यासाठी अशा नागरिकांना मध्यम मार्ग काढून काही नियम ठरवून देणे गरजेचे आहे. त्या नियमानुसार घरे बांधल्यास विकास थांबणार नाही आणि बकालपणात वाढ होणार नाही.   - विजय तापकीर, सामाजिक कार्यकर्ते 

Web Title: illegal construction

टॅग्स

संबंधित बातम्या

Ganesh festival : विसर्जन डीजेमुक्त! 

मुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...

हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी

पुणे -  पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...

शरीफ यांच्या मुक्ततेसाठी सौदीबरोबर करार नाही ; पाकचे मंत्री फवाद चौधरींचा दावा

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तान आणि सौदी...

लोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...

तीस आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी 

मुंबई - नाशिकमधील 30 आठवड्यांच्या गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. गर्भात विचित्र पद्धतीने व्यंग्य (...