Sections

जलतरण तलावाच्या नियमावलीकडे पालिकेचे दुर्लक्ष 

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 10 एप्रिल 2018
rastapeth swimming pool

पुणे - जलतरण तलावाविषयी केलेल्या नियमावलीचे ठेकेदारांकडून पालन होते की नाही हे पहाण्याकडेच महापालिकेकडून दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत क्षमतेपेक्षा जास्त जणांना पाण्यात उतरविले जाते, पुरेशा संख्येने जीवरक्षक नसणे अशा गोष्टी घडत असतानाही त्याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. 

पुणे - जलतरण तलावाविषयी केलेल्या नियमावलीचे ठेकेदारांकडून पालन होते की नाही हे पहाण्याकडेच महापालिकेकडून दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत क्षमतेपेक्षा जास्त जणांना पाण्यात उतरविले जाते, पुरेशा संख्येने जीवरक्षक नसणे अशा गोष्टी घडत असतानाही त्याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. 

तळजाई येथील जलतरण तलावात रविवारी एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. दरवर्षी उन्हाळ्याच्या कालावधीत अशा घटना घडतात. मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने जलतरण तलाव चालविणाऱ्यांच्या दृष्टीने हंगामाचा कालावधी असतो. या कालावधीपूर्वी महापालिकेचे अधिकारी जलतरण तलावाच्या ठिकाणी येऊन पाहणी करून जातात. पण इतर कालावधीत ते येत नाही असा अनुभव काही ठेकेदारांचा आहे. जलतरण तलावाची क्षमता किती आणि प्रत्यक्षात किती जणांना तलावात उतरविले जाते याची पडताळणी करणारी यंत्रणा महापालिकेकडे उपलब्ध नाही. 

जलतरण तलावाच्या नियमावलीबाबत संबंधित ठेकेदारांना सूचना दिल्या जातात, अधिकारी पाहणी करून येतात असा दावा महापालिका प्रशासन करीत आहे. तळजाई येथील जलतरण तलावातील युवकाच्या मृत्यूप्रकरणी सहकार नगर पोलिस तपास करीत आहे. या घटनेत हलगर्जीपणा झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आल्याने महापालिका यंत्रणेविषयी शंका निर्माण होत आहे. 

हे करायला हवे   * जलतरण तलावातील 20 व्यक्तींच्या मागे एक यानुसार जीवरक्षकांची नियुक्ती करणे  * टॅंकजवळ दहा फूट लांबीचा बांबू ठेवणे  * बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविण्यासाठी ट्यूब, पॅड अशा जीवरक्षक वस्तू ठेवणे  * तलावाची खोली ही जास्तीत जास्त साडेसहा फूटच ठेवावी  * क्षमतेपेक्षा जास्त व्यक्तींना जलतरण तलावात प्रवेश देऊ नये 

ठेकेदाराची जबाबदारी  * महापालिकेचे 32 जलतरण तलाव असून, त्यापैकी 28 तलाव हे ठेकेदारांना चालविण्यास दिले आहेत. उर्वरीत चार तलावांची निविदा प्रक्रिया सुरू आहे.  * जलतरण तलावातील व्यवस्थेविषयी मालमत्ता विभागातील एक अभियंता आणि देखभाल अधिकारी यांच्याकडे जबाबदारी  * जलतरण तलाव नियमावलीचे पालन करण्याचे बंधन महापालिका संबंधित ठेकेदाराबरोबर करार करतानाच घालते 

पोहता येत असेल तरच जलतरण तलावात उतरणे गरजेचे आहे. प्रशिक्षित प्रशिक्षकाकडूनच पोहण्याचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. पाण्याबरोबर कधीही मस्ती करणे धोकादायक ठरू शकते. पाण्यात मित्रांबरोबर मस्ती करू नये, उड्या मारण्याचे प्रकार करू नये. विनय मराठे, प्रशिक्षक 

जीवरक्षक कडेला असेल तेव्हा तो फ्लोटर, आठ ते दहा फूट लांबीची काठीच्या मदतीने बुडणाऱ्याला आधार देतो. जर जीवरक्षक पाण्यात असेल तर तो बुडणाऱ्याला कडेला आणतो. दोरी, ट्यूब, अशा गोष्टींचा वापर सुरक्षिततेसाठी केला जातो. निशिकांत मंडलीक, प्रशिक्षक, स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव 

जलतरण तलावासंदर्भातील नियमावलीचे पालन सर्वच ठेकेदारांनी करणे आवश्‍यक आहे. प्रमाणित आणि प्रशिक्षित जीवरक्षक पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत ही अडचण मोठी आहे. या जीवरक्षकांना केवळ तीन महिनेच रोजगार मिळतो, अशा अनेक अडचणी असतात. जीवरक्षक प्रशिक्षण देऊन तयार करणे आवश्‍यक आहे. विजय परोळ, व्यवस्थापक, शाहू जलतरण तलाव 

Web Title: Ignorance of the swimming pool rules

टॅग्स

संबंधित बातम्या

पीएमपीची वाहतूक सुरळीत 

पुणे - गणेशोत्सवानंतर सोमवारी सायंकाळी चार वाजल्यानंतर पीएमपीची सेवा टप्प्याटप्प्याने सुरळीत झाली. गेले दहा दिवस पीएमपीची शहरांतर्गत सेवा काही...

विसर्जनासाठी ‘यिन’चे हात सरसावले

पिंपरी - गणपती विसर्जनासाठी पोलिस फ्रेंड्‌स वेल्फेअर व यिनच्या वतीने मूर्ती दान व वाहतूक नियोजन करण्यात आले. चिंचवड येथील चाफेकर चौक व पवना घाट या...

विसर्जन मिरवणुकीदरम्यान राज्यभरात 24 जण बुडाले 

मुंबई  - गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरू असतानाच काही दुर्घटनांमुळे उत्साहावर विरजण पडले. मिरवणुकीदरम्यान रविवारी राज्यभरात किमान 24 जणांचा...

वाशीत ७१ हजारांचे दागिने पळवले

नवी मुंबई - एका ६२ वर्षांच्या महिलेचे ७१ हजार रुपये किमतीचे दागिने एका भामट्याने लुबाडून नेल्याची घटना गुरुवारी (ता. २०) भरदुपारी वाशीतील सेक्‍...

पोलिसांना ‘घरचा डबा’

वाल्हेकरवाडी - सण, उत्सव हे सुरळीत पार पडून शांतता कायम राहावी, या उद्देशाने रात्रंदिवस खडा पहारा देणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस बांधवांना व पोलिस...