Sections

हापूस अजूनही आवाक्‍याबाहेरच

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 16 एप्रिल 2018
मार्केट यार्ड - रविवारी बाजारात कच्च्या हापूस आंब्याची आवक झाल्यानंतर प्रतवारी तपासताना अडतदार आणि खरेदीदार.

आंबा महोत्सवाचे आयोजन
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकार्याने श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनने आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव बुधवारपासून (ता. १८) बाजार आवारातच होणार आहे. हापूसच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळण्यासाठी असोसिएशनतर्फे सोशल मीडियाद्वारे जागृती केली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष विलास भुजबळ आणि सचिव रोहन उरसळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. आंबा उत्पादकांना महोत्सवासाठी सहकार्य केले जाईल, असे समितीचे सचिव बी. जे. देशमुख यांनी या वेळी नमूद केले.

पुणे - कोकणातील हापूस आंब्याचे भाव आवाक्‍यात येण्यासाठी सर्वसामान्यांना आणखी दहा ते पंधरा दिवस वाट पाहावी लागणार आहे. आवक कमी असल्याने सध्या हापूसचे दर जास्त आहेत. अक्षय तृतीया सण असल्यामुळेही आंब्यांकरिता जास्त पैसे मोजावे लागत आहेत. 

अक्षय तृतीया सण दोन दिवसांवर आला आहे. अद्याप बाजारातील आवक वाढलेली नाही. हवामानाने साथ न दिल्याने आंब्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचा दावा बागायतदार करीत आहेत. त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे. त्यामुळे हापूसच्या चार ते सहा डझनाच्या पेटीचा भाव हा दोन हजार ते साडेचार हजार रुपये आहे. तयार हापूस आंब्यांच्या डझनाचा भाव साडेसातशे ते दीड हजार रुपये आहे, असे व्यापारी करण जाधव यांनी सांगितले. 

हवामानाने साथ न दिल्याने फळांची वाढ व्यवस्थित झाली नाही, काही भागात कैरी छोटी असतानाच ती गळण्याचे प्रमाण वाढले होते. त्याचा फटका बसला आहे. केवळ पुणेच नाही, तर इतर बाजारपेठांतही हापूस आंब्यांची आवक कमीच आहे. दहा ते पंधरा दिवसांनंतर आवक वाढेल, असा अंदाज आहे. त्याकाळात कच्च्या आंब्यांची आवक वाढेल आणि भाव कमी होऊ लागतील असाही अंदाज आहे. त्यामुळे पुणेकरांना कोकण हापूसची गोडी चाखण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. फळबाजारात रविवारी (ता. १५) रत्नागिरी, देवगड, रायगड भागातून आंब्याची चार ते साडेचार हजार पेटी इतकी आवक झाली. गेल्या आठवड्यात प्रतिदिन दोन ते अडीच हजार पेटी इतकी आवक झाली.

Web Title: hapus mango rate

टॅग्स

संबंधित बातम्या

लॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज 

नागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक...

amazon-more
दिल माँगे ‘मोअर’ (अग्रलेख)

भारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’...

कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदा

बारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या वीजपंपांसाठी सरकारने आणलेल्या ‘एचव्हीडीसी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला अखेर ठेकेदार मिळाले आहेत....

"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले  

मुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...

तळेगावातील आरपीएफची चौकी बंद 

तळेगाव स्टेशन - लोहमार्गावरील सुरक्षेच्यादृष्टीने तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवरील आरपीएफची चौकी दोन महिन्यांपासून अधिक काळ बंद आहे. त्यामुळे...