Sections

'आयर्नमॅन' या जागतिक स्पर्धेसाठी बारामतीच्या तरुणाची तयारी

सकाळ वृत्तसेवा |   रविवार, 22 एप्रिल 2018
guy from baramati prepares for iron man global competition

बारामती - जगातील नामांकीत स्पर्धा समजल्या जाणाऱ्या आयर्नमॅन या स्पर्धेसाठी बारामतीचा एक ध्येयवेडा गेल्या वर्षभरापासून तयारी करत आहे. या स्पर्धेत तो मराठी या नात्याने सहभागी होत या स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त करण्यासाठी झगडणार आहे.

सतीश रामचंद्र ननवरे असे या बारामतीकराचे नाव आहे. येत्या जुलै महिन्यात ऑस्ट्रिया या देशात ही स्पर्धा होणार आहे. जलतरण, धावणे व सायकलींग अशा तीन प्रकारात ही स्पर्धा होते. चार किमी. पोहणे, 180 कि.मी. सायकल चालविणे व 42 कि.मी. धावणे अशा तीन स्पर्धा लागोपाठ पूर्ण करुन त्यात यश मिळविण्याचे आव्हान सतीश ननवरे याने स्विकारले आहे. 

गेल्या वर्षापासून तो या तिन्ही प्रकारासाठी दररोज पाच तासांचा सराव तो करतो आहे. पुणे बारामती असे अंतर सायकलवरुन त्याने अनेकदा पूर्ण केलेले आहे. स्वताःचा पब्लिसिटीचा व्यवसाय सांभाळून त्याचा हा सराव सुरु आहे. पंचक्रोशीतून अशा स्पर्धेसाठी जाणारा तो पहिलाच ठरणार आहे. 

शारिरीक व मानसिक संतुलन राखत निराश न होता प्रचंड मेहनत यासाठी करावी लागते, अत्यंत खडतर अशी ही स्पर्धा समजली जाते, त्यासाठी शारिरीक क्षमतेचा कस यात लागतो,  कोणत्याही प्रकारची शारिरीक इजा होऊ न देता हा सराव पूर्ण करण्याचे काम त्याने केलेले आहे.

राज्याच्या ग्रामीण भागातून ऑस्ट्रियाला जाणारा सतीश हा पहिलाच ठरणार आहे. सोळा तासात ही स्पर्धा पूर्ण केल्यास प्रमाणपत्र व किताब बहाल केला जातो. हे लक्ष्य दहा तासाच पूर्ण करण्याचे उद्दीष्ट निश्चित करुन सतीशचा सराव सुरु आहे. दहा तासात या तिन्ही स्पर्धा पूर्ण करुन भारतातील पहिला आयर्नमॅन होण्याचे स्वप्न साकारण्याचा सतीशचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने त्याचा सराव सुरु आहे. कोल्हापूरचे अश्विन भोसले व बारामतीचे सुभाष बर्गे यांचे त्याला मार्गदर्शन मिळते आहे. 

Web Title: guy from baramati prepares for iron man global competition

टॅग्स

संबंधित बातम्या

मिरवणुकीत आपलेपणाचे दर्शन

पुणे - एकीकडे हजारो नागरिक आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप देत होते; पण दुसरीकडे कोणी मिरवणूक पाहायला येणाऱ्या भक्तांना अन्नवाटप करत होते, तर कोणी...

The bench issued notice to the Principal Secretaries of Cooperative society
सहकारच्या प्रधान सचिवांना निष्काळजीपणा भोवला; खंडपीठाने काढली नोटीस 

औरंगाबाद : कार्यालयीन कर्तव्ये पार पाडताना विलंब व निष्काळजीपणा केल्याबद्दल राज्याच्या सहकार विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस काढण्यात आली. सहकार...

satana
उद्योजक होण्यासाठी कौशल्य, तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक वृत्ती आवश्यक

सटाणा : उद्योग क्षेत्रात करिअर करतांना प्रत्येकाने आवडीनुसार उद्योग निवडावा, अन्यथा उद्योग व्यवसायात मन लागत नाही. आवडीप्रमाणे उद्योगात संधी किती...

indapur
युवकांनी नवनवीन शेतीपुरक व्यवसाय सुरु करावेत : आ. भरणे

वालचंदनगर (पुणे) : युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन नवनवीन शेती पुरक व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार दत्तात्रेय भरणे...

काव्यगायन स्पर्धेत अनुराग जगदाळे प्रथम!
काव्यगायन स्पर्धेत अनुराग जगदाळे प्रथम!

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील जवाहरलाल सार्वजनिक वाचनालयात वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह यांच्या मातोश्री व माजी सरपंच अजितचंद्र शाह यांच्या...