Sections

4 राज्यातील हिंसाचाराला सरकार आणि सुप्रीम कोर्ट जबाबदार -प्रकाश आंबेडकर

उमेश शेळके |   सोमवार, 2 एप्रिल 2018
government and supreme court are responsible for today's violence says prakash ambedkar

पुणे- अॅट्रॉसिटी कायद्याबाबत देशात आज सोशल मीडियाच्या माध्यमातून पुकारण्यात आलेल्या संपला प्रतिसाद मिळाला, या बंदमध्ये काहींचा बळी देखील गेला असून त्याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार आणि सुप्रीम कोर्ट आहे अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली.

पुणे- अॅट्रॉसिटी कायद्याबाबत देशात आज सोशल मीडियाच्या माध्यमातून पुकारण्यात आलेल्या संपला प्रतिसाद मिळाला, या बंदमध्ये काहींचा बळी देखील गेला असून त्याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार आणि सुप्रीम कोर्ट आहे अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली.

यावेळी प्रकाश आबेंडकर म्हणाले की,सोशल मीडियावर आज भारत बंद बाबतचा मेसेज व्हायरल झाला. त्या बंद ला देशभरात प्रतिसाद मिळाला. मात्र त्या दरम्यान काही ठिकाणी हिंसा देखील घडली असून यावेळी काही नागरिकांचा बळी देखील गेला आहे. या सर्व घटनेला सुप्रीम कोर्ट आणि सरकार जबाबदार आहे. या गंभीर परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे येऊन बोलण्याची गरज आहे. अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

ते पुढे म्हणाले की, देशातील सद्य स्थिती लक्षात घेता आपल्या देशाचा सिरिया होण्यास वेळ लागणार नाही. तर या सर्व घडामोडी देशातील अनेक भागात घडत असताना कोरेगाव भिमा दंगल प्रकरणातील मिलिंद एकबोटे यांना अटक केली मात्र अद्याप पर्यँत संभाजी भिडे यांना अटक केली नाही. त्यातून हे सरकार अशा व्यक्तींना पाठिशा घालण्याचे काम करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशा शब्दात त्यांनी भाजप सरकारवर टीका केली.

 

Web Title: government and supreme court are responsible for today's violence says prakash ambedkar

टॅग्स

संबंधित बातम्या

कितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले  

पंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...

असा झाला दीप-वीर लग्नसोहळा !

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी कालपासून त्यांचे चाहते आसूसले होते. आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवत रणवीर-दीपिकाने...

ऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक

लातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...

पोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन

मंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...

vikhepatil
भाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील 

चिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...

Milk
भारतीय दूध सुरक्षित

नवी दिल्ली - भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत प्रश्‍न उपस्थित होत असले तरीही फूड सेफ्टी अँड स्टॅन्डर्डस अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एफएसएसएआय)...