Sections

'आमदार राहुल कुल हे दौंडमधील नीरव मोदी'

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 3 एप्रिल 2018
former mla ramesh thorat and rahul kul

माजी आमदार रमेश थोरात यांची टीका; चारशे ट्रॅक्‍टरवर चार बॅंकांकडून 100 कोटींचे नियमबाह्य कर्ज

माजी आमदार रमेश थोरात यांची टीका; चारशे ट्रॅक्‍टरवर चार बॅंकांकडून 100 कोटींचे नियमबाह्य कर्ज

दौंड (पुणे): दौंडचे आमदार तथा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी कारखान्याकडे उसाची वाहतूक करणाऱ्या चारशे ट्रॅक्‍टरवर एकाच वर्षात चार वेगवेगळ्या बॅंकांचे 100 कोटींचे कर्ज नियमबाह्य पद्धतीने काढले आहे. दौंडचे नीरव मोदी म्हणून ते आता ओळखले जात आहेत, अशी टीका पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांनी पत्रकार परिषदेत केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अप्पासाहेब पवार, सोहेल खान, गुरुमुख नारंग, सचिन गायकवाड, वैशाली नागवडे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, ""कारखान्याकडे उसाची वाहतूक करण्यासाठी करार पद्धतीने लावण्यात आलेल्या चारशे ट्रॅक्‍टर ट्रॉलींवर बॅंक ऑफ इंडिया (केडगाव शाखा), देना बॅंक (बारामती शाखा), आयसीआयसीआय बॅंक (अकलूज शाखा) व बॅंक ऑफ बडोदा (थेऊर शाखा) यांच्याकडून नियमबाह्य पद्धतीने कर्ज काढण्यात आले आहे. या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल. त्याचबरोबर ट्रॅक्‍टर मालकांनी आमच्याशी संपर्क साधल्यास आम्ही त्यांना उच्च न्यायालयात याविरुद्ध दाद मागण्यासाठी सहकार्य करू.''

जिल्हा बॅंकेचे 82 कोटी थकविले रमेश थोरात म्हणाले, ""उसाला 2650 बाजार देऊ म्हणणारे आता त्यावर बोलत नाहीत. कामगारांचे पगार रखडलेले असून, कारखान्याने सन 2014 - 2015 मध्ये गाळप केलेल्या एकूण उसाच्या एफआरपीपोटी साडेबारा कोटी रुपये ऊस उत्पादकांना दिलेले नाहीत. जिल्हा बॅंकेचे भीमा कारखान्याकडे 82 कोटी रुपये थकल्याने सदर कर्ज एनपीए (अनुत्पादक कर्ज) मध्ये गेल्याने बॅंकेचा एनपीए 15 टक्‍क्‍यांवर गेला आहे. सदर थकबाकीप्रकरणी साखर संघ, राज्य सहकारी बॅंक व सहकार खात्याकडे तक्रार केली आहे.''

कुल भाजपकडून लढणार.. भीमा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने कर्ज स्वरूपात दिलेले 35 कोटी 94 लाख रुपये हे आमदार राहुल कुल यांनी पुढील निवडणूक कमळावर लढविण्याच्या अटीवर दिले आहे. - रमेश थोरात, अध्यक्ष, जिल्हा सहकारी बॅंक.

Web Title: former mla ramesh thorat political attack rahul kul

टॅग्स

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

मुरबाड (ठाणे) : शिवळे महाविद्यालयात शनिवारी (ता 22) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये...

रयतच्या पहिल्या शाखेस मिळणार एक कोटीचा निधी 

कऱ्हाड : माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजु शेट्टी यांची आज येथील...

manpa
स्वच्छतागृह स्वच्छ ठेवावीत

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सूंदर इमारतीसमोर असलेले स्वच्छता गृह हे अंत्यत अस्वच्छ झाले आहे. तरी त्याची योग्य स्वच्छता करावी. स्वच्छतागृहे ही...

pune
पुणे वाहतूक शाखेद्वारे चुकीचे ई-चलन

पुणे :  पुणे ट्राफिक शाखाद्वारे 26 ऑगस्टला दंड भरण्यासाठी ई-चलन एसएमएस मिळाले. त्यादिवशी रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे माझे वाहन पार्किंगमध्ये...

swarget
स्वारगेट बसथांब्यावर रस्त्यांची दुरवस्था

पुणे : स्वारगेट उडडान पुलाखालील पीएमपी थांब्यावर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या भागातुन पुणे स्टेशन, हडपसर, टिळकरोड, शिवाजीनगर, गोखलेनगर, पुणे...