Sections

पुणे : जे.एस.पी.एम कॉलेजच्या मुलींच्या वसतीगृहाशेजारी आग

डॉ. समीर तांबोळी |   बुधवार, 25 एप्रिल 2018

पुणे : हांडेवाडीतील जे.एस.पी.एम मुलींच्या वस्तीगृहा शेजारी स. नं ५४ मध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता चारचाकी वाहनातील सीएनजी सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. या शेजारी कॉलेजचे मुलींचे वसतिगृह आहे.

आग वार्‍यमुळे पसरली आणि आगीचा धूर वसतीगृहात शिरला. खबरदारी म्हणून होस्टेल रिकामे करण्यात आले. याठिकाणी शेजारीच लेबर कँप आहे. तेथील नागरिकांना हलविण्यात आले. आगीमुळे दोन किमी परिसरात वाहनांचे टायर फुटून आवाज येत होते. या गोडाउनला केवळ पाच फुटांची सीमाभिंत आहे. या ठिकाणी सहज प्रवेश करू शकतो. त्यामुळे आग कुणी तरी लावली असाही नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.

आग विझविण्याकरिता अग्निशामक दलाचे पाच बंब, तसेच खासगी टँकर मागविण्यात आले. तरीही पाणी कमी पडल्याने जेएसपीएम कॉलेजच्या पाण्याच्या टाकीतून पाणी वापरण्यात आले. अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांना होस्टेलच्या विद्यार्थ्यांनी तसेच कर्मचार्‍यांनी मदत केली. साधारण ९ वाजता आग आटोक्यात आली. 

सध्या मुलींची अंतिम परिक्षा सुरु आहे. होस्टेलमध्ये धूर पसरल्यामुळे त्यांना मैदानात बसविण्यात आले. होस्टेलच्या शेजारील शाळेच्या इमारतीत त्यांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात आल्याचे संकुल संचालक श्रेयस बुगडे यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते योगेश सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी महापालिकेची आरक्षित जागा (amnety space) आहे. या ठिकाणी अतिक्रमण विभागाने जप्त केलेले सामान ( हातगाड्या, टपर्‍या वैगेरे)  ठेवण्याची जागा (गोडाऊन ) आहे. त्यात भर म्हणून वाहतूक विभागाने जप्त केलेली वाहने साठविली जातात. हे भंगार हटविण्यासाठी महापालिकेला, तसेच मुख्यमंत्री कार्यालयाला  लेखी निवेदन दिले आहे. तरी कार्यवाही झाली नाही.

Web Title: Fire near Girls Hostel in JSPM college

टॅग्स

संबंधित बातम्या

व्हायब्रंट गुजरात: अंबानी करणार 3 लाख कोटींची गुंतवणूक

गांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक  करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात...

"राष्ट्रवादी' पुन्हा होईल बलवान?

स्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात झालेले फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन हे ऐतिहासिक आहे. त्यानंतर कॉंग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात रुजली होती....

भाजपविरोधात आम्ही प्रचारात उघडपणे सहभागी होणार - भालचंद्र कांगो 

बारामती - केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकारविरोधातच आमची या पुढील काळात कायमच भूमिका राहणार असून भाजपविरोधात आम्ही प्रचारात उघडपणे सहभागी होणार...

dr keshav sathye
आकाशवाणीला नवा अवकाश

आकाशवाणीच्या बातम्यांचा खासगी रेडिओ वाहिन्यांवरील प्रवेश ही आपला वारसा लखलखीत करण्याची आकाशवाणीला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. मात्र त्यासाठी...

rahuri
राहुरी : अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो अज्ञातांनी पेटविला

राहुरी - अवैध वाळू वाहतूक करणारा नवीन विना नंबरचा टेम्पो अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिला. काल (बुधवारी) रात्री साडेनऊच्या दरम्यान तहाराबाद घाटात...

...अन्यथा तुमच्याशिवाय; दानवेंचा सेनेला अप्रत्यक्ष इशारा

बारामती शहर : आलात तर तुमच्यासह...अन्यथा तुमच्याशिवायही...असा थेट इशाराच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेनेचा नामोल्लेख टाळून...