Sections

दापोडीत श्री. फिरंगाई देवीचा उत्सव सुरू

सकाळ वृत्तसेवा |   गुरुवार, 29 मार्च 2018
firangai-devi

जुनी सांगवी - दापोडी येथील ग्रामदैवत श्री.फिरंगाई देवीचा उत्सव सुरू आहे. या देवीचे मुळस्थान पुणे जिल्ह्यातील व दौंड तालुक्यातील कुरकुंभ या गावी आहे. दापोडी स्थित फिरंगाई उत्सवा दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फिरंगाई महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ, संत्सग महिला भजनी मंडळ, गणेश नगर महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ पवारवस्ती, श्री.फिरंगाई देवी जागरण गोंधळ पार्टी यांचा भजनांचा कार्यक्रम यानिमित्ताने होणार आहे.

जुनी सांगवी - दापोडी येथील ग्रामदैवत श्री.फिरंगाई देवीचा उत्सव सुरू आहे. या देवीचे मुळस्थान पुणे जिल्ह्यातील व दौंड तालुक्यातील कुरकुंभ या गावी आहे. दापोडी स्थित फिरंगाई उत्सवा दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फिरंगाई महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ, संत्सग महिला भजनी मंडळ, गणेश नगर महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ पवारवस्ती, श्री.फिरंगाई देवी जागरण गोंधळ पार्टी यांचा भजनांचा कार्यक्रम यानिमित्ताने होणार आहे.

श्री.देवीच्या पालखीचे प्रस्थान संध्याकाळी कुरकुंभ येथे पालखीच्या मानकऱ्यासह होणार आहे. आज श्री.नितीन काळजे (महापौर पिंपरी चिंचवड) यांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता दापोडी येथे श्री.फिरंगाई देवीची आरती व महापुजा करण्यात येणार आहे. महापुजेनंतर  श्रींच्या पालखी छबिना सोहळ्याची सुरूवात होणार आहे. यावेळी नगरसेवक रोहित आप्पा काटे, राजाभाऊ बनसोडे, स्वातीमाई काटे, आशाताई शेंडगे, नाना काटे, राजाभाऊ काटे, अविनाश काटे, संतोष काटे, वसंत काटे, विजय किंडरे, ज्ञानेश्वर भाडाळे, आदेश काटे आदि ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत .

तसेच श्री.फिरंगाई देवीच्या उत्सवानिमित्त भव्य कुस्त्यांचा आखाडा गुरुवार ता. ३० आखाडा, दापोडी रेल्वे स्टेशन मागे, शितळादेवी चौक, दापोडी येथे संपन्न होणार आहे. 

महिलांच्या कुस्त्यांनी आखाडा रंगणार  कुस्त्यांच्या या मैदानी खेळात महिलांनी सहभाग नोंदवल्याने कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीन व महिला मोठ्या प्रमाणावर येणार असल्याचे उत्सव समितीच्या वतीने सांगण्यात आले. या खेळादरम्यान भारत केसरी पै.योगेश बोंबाळे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै.बाला रफीक यांच्या कुस्तीचे मुख्य आकर्षण राहणार आहे. विजयी कुस्तीगिरांना अकरा लाख रूपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच नगरसेवक रोहित आप्पा काटे यांच्या कडुन चांदीची गदा देण्यात येणार आहे.

Web Title: firangai devi utsav is celebrated

टॅग्स

संबंधित बातम्या

बाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...

...अन् आजीबाई थोडक्यात बचावल्या

मनमाड : दैव बलवत्तर म्हणून समोरून धडधडत येणारा काळ अगदी जवळून निघून गेला आणि आजीबाईच्या जीवात जीव आला. मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे...

दुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू

करमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...

''जळगाव-सोलापूर लोहमार्ग व्हावा''

बीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...

Sharad Pawars Solve Wrestling between two Marathi channels
शरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'

पुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...