बारामती (पुणे) : चोरीचे सोने असो वा मोटारसायकल, या पुढील काळात अनोळखी व्यक्तींकडून चोरीच्या वस्तूंची खरेदी करणाऱ्यांविरुद्धही जिल्हा पोलिस गुन्हे दाखल करतील असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिला.
बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी नमूद केले की चोरी करणे हा जसा गुन्हा आहे तसाच चोरीचा माल घेणे हाही गुन्हा आहे. ओळखीच्या व्यक्तींकडून शहानिशा करुन नोंदी ठेवून माल घेतला असेल तर अशा वेळेस पोलिस कारवाई करणार नाही. मात्र कालांतराने चोरीचा माल कोणतीही शहानिशा न करता घेतला तर मात्र या पुढील काळात पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.