Sections

बापाकडून मुलीवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 7 एप्रिल 2018
rapecase

पुणे - मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनीशी मनमोकळेपणाने संवाद साधल्यानंतर तिने वडिलांनी आपल्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यानंतर मुख्याध्यापिकेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पीडित मुलीच्या बापास अटक केली. आंबेगाव परिसरात ही घटना घडली. 

पुणे - मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनीशी मनमोकळेपणाने संवाद साधल्यानंतर तिने वडिलांनी आपल्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यानंतर मुख्याध्यापिकेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पीडित मुलीच्या बापास अटक केली. आंबेगाव परिसरात ही घटना घडली. 

याप्रकरणी अकरा वर्षीय पीडित मुलगी कात्रज-आंबेगाव परिसरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. तिने दिलेल्या अत्याचाराच्या माहितीवरून शाळेच्या मुख्याध्यापिकेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईचे आठ वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर ती वडिलांबरोबर राहात होती. मागील रविवारी दुपारी बारा वाजता ती घरात एकटी असताना वडिलाने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी वडिलांनी दिल्याने पीडित मुलगी घाबरली होती. अस्वस्थ असण्याचे व घाबरण्याचे कारण मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनीस विचारले. त्यानंतर पीडित मुलीने वडिलांनी केलेल्या अत्याचाराबाबत माहिती दिली. त्यानंतर मुख्याध्यापिकेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात वडिलांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार फिर्याद दिली. (मुलीचे नाव उघड होऊ नये, म्हणून वडिलाचा नामोल्लेख टाळलेला आहे.) 

मुला-मुलींवर अत्याचार कमी व्हावेत व त्यांनी मनमोकळेपणाने बोलावे, यासाठी अनेक शाळांमध्ये "गुड टच, बॅड टच' हा उपक्रम राबविण्यात येतो. त्याद्वारे कोणाचा स्पर्श कसा आहे, याची ओळख मुलांना व्हावी, यादृष्टीने प्रयत्न केले जातात. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक जवळ असतात. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संवाद वाढल्यास मुले मोकळेपणे बोलू लागतील. - स्मिता जोशी, समुपदेशक. 

मुले निरागस असतात त्यांना स्पर्श किंवा नजरेची जाणीव नसते. ही जाणीव निर्माण व्हावी, यासाठी प्रत्येक शाळांमध्ये जनजागृतीपर उपक्रम झाले पाहिजेत. आपल्यावर अत्याचार होत असल्यास तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्‍न त्यांना भेडसावतो. पालक व शिक्षकांनी मुलांशी संवाद वाढविल्यास हा प्रश्‍न कमी होईल.'' - डॉ. सागर पाठक, समुपदेशक 

बाल लैंगिक शोषणावर 2012च्या गणेशोत्सवामध्ये आम्ही "सावधान, बागलबुवा आलाय' या विषयावरील जिवंत देखावा सादर केला. बाल लैंगिक शोषणाविषयी जागृती व्हावी, यासाठी 15 हजार पुस्तिका छापून त्या भाविकांबरोबरच शाळांमध्ये मोफत वाटल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी "गुड टच, बॅड टच'वर आधारित पपेट शो घेतला होता.'' - पीयूष शहा, अध्यक्ष, साईनाथ मंडळ ट्रस्ट 

Web Title: father raped daughter in pune

टॅग्स

संबंधित बातम्या

Fifteen million Palladium Carbon theft at Amboyo Mahad
प्लॅटीनम पाठोपाठ एम्बायोत आता 15 लाखाची पॅलॅडियम कार्बनची चोरी 

महाड - महाड औद्योगिक क्षेत्रामधील एम्बायो लिमिटेड या कारखान्यातील प्लॅटीनम चोरीचे प्रकरण गाजत असतानाच पुन्हा याच कारखान्यातून 15 लाख रूपये किमतीचे 15...

चंद्रपूर जिल्ह्यात पोलिस मित्रांच्या हाती शिटी

गोंडपिपरी : समाजातील शांतता व सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलिसदादा रात्रदिवस कार्यरत असतात. पण सणसमारंभाच्या काळात परिस्थिती सांभाळताना...

Two groups clash inside police station in Daund five arrested
दौंड : पोलिस ठाण्याच्या आत दोन गटात हाणामारी, पाच अटकेत

दौंड (पुणे) : दौंड पोलिस ठाण्याच्या आवारात दोन गटात झालेल्या मारामारी प्रकरणी पाच जणांना अटक करून त्यांच्याविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला...

While celebrating Ganeshotsav, it is important to keep an eye on socialism API Badve
गणेशोत्सव साजरे करताना सामाजिकतेचे भान ठेवणे गरजेचे : सहाय्यक पोलिस निरीक्षक बडवे

उंडवडी : "तरुण मंडळानी गणेशोत्सव साजरे करताना सामाजिकतेचे भान राखले पाहिजे. युवा पिढी सोशल मिडियाच्या चक्रव्यूहात अडकत असून त्यांना थोर...

सेलूत एकाची गळफास घेऊन आत्महत्या

सेलू : शहरातील हेमंतनगर येथील रहिवाशी असलेल्या एका इसमाने गुरूवारी (ता.२०) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली....