Sections

पुणे - अंथुर्णे येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन

राजकुमार थोरात |   शनिवार, 28 एप्रिल 2018
pawar-bharane

वालचंदनगर (पुणे) : राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सोमवारी (ता.३०) अंथुर्णे येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यामध्ये पवार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर काय बोलणार? याकडे तालुक्यासह जिल्हातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

वालचंदनगर (पुणे) : राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सोमवारी (ता.३०) अंथुर्णे येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यामध्ये पवार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर काय बोलणार? याकडे तालुक्यासह जिल्हातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी  सोमवारी भव्य शेतकरी मेळ्याव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,विजयसिंह मोहितेपाटील, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, विधानसभेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह दीडडझन  आमदार उपस्थित राहणार आहेत. भाजप-सेनेच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणी मध्ये आला आहे.

नोटाबंदीनंतर डाळिंब,द्राक्षांच्या दरामध्ये घसरण झाली अाहेत.  दुधाचे दर ही कमी होत असून चारा व पेेंडीचे दर ही वाढत असल्यामुळे शेतीसोबत दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी हतबल झाला अाहे. केंद्राच्या धोरणामुळे साखरेचे दर काेसळत असून साखरधंदा तोट्यात चालला आहे. एफआरफीचा दर देणे ही कारखान्यादाराला अवघड झाले आहे. उसाला दर कमी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले अाहे. शासनाने स्वस्त धान्य दुकानामध्ये गव्हाबरोबर मकेचे ही वितरण सुरु केल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व नागरिकांना भविष्यात चपाती ऐवजी मक्याची भाकरी खाण्याची वेळ येणार आहे.  

शासनाच्या धोरणामुळे भाजीपाल्याला ही कमी दर मिळत आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकरी वर्गाची कोंडी झाली असून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरती काय  बोलणार याकडे तालुक्यातील शेतकऱ्यासह जिल्हातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले अाहे.  राज्यामध्ये शासनाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलनास सुरवात  केली असुन  आगामी विधानसभेची निवडणूकीची तयारी केली असल्याने शरद पवार यांच्या उपस्थितीमधील मेळावा पक्षासाठी महत्वाचा ठरणार आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार दत्तात्रेय भरणे हे विरोधी पक्षाचे आमदार असताना देखील भरणे यांनी इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी सत्ताधारी आमदारापेक्षा जास्त निधी खेचून आणला.तालुक्यामध्ये साडेतीन-चार वर्षाच्या कालावधीमध्ये रस्ते व इतर विकासकामासाठी पाचशे कोटी पेक्षा निधी आणला असुन मेळाव्यामध्ये आमदार भरणेच्या कामाचे कौतुक होणार अाहे.  

Web Title: farmers meet at anthurne pune

टॅग्स

संबंधित बातम्या

रिकर्व्ही बेसविरोधात सुप्रिम कोर्टात जाणार : राजू शेट्टी 

कऱ्हाड : एफआरपी वाढवली असे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांच्या खिशातुन 144 रुपये 50 पैसे काढुन घेतले जाणार आहेत. एफआरपीचा बेस साडेनऊवरुन दहा टक्के...

सहकारामध्ये मनाला वाट्टेल तशी लुडबुड सरकारने करू नये : दिलीप माने

मोहोळ: सहकाराबद्धल कायद्यात पुर्ण तरतुद असताना सरकारने त्यामध्ये मनाला वाट्टेल तसा अर्थ काढुन सहकारमध्ये लुडबुड करू नये असे स्पष्ट मत...

विद्यार्थ्यांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

मुरबाड (ठाणे) : शिवळे महाविद्यालयात शनिवारी (ता 22) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये...

रयतच्या पहिल्या शाखेस मिळणार एक कोटीचा निधी 

कऱ्हाड : माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजु शेट्टी यांची आज येथील...

shatrughna Sinha Criticise On narendra Modi due to Rafeal deal
'प्रधानमंत्रीजी आतातरी खरे बोला'- शत्रुघ्न सिन्हा

नवी दिल्ली- राफेल करारावरून सर्वच जण आक्रमक झालेले असताना भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे...