Sections

पुणे - जिल्हा परिषद शाळांत राबवणार अस्मिता योजना

मिलिंद संगई |   बुधवार, 4 एप्रिल 2018
asmita-yojana

बारामती (पुणे) : ग्रामीण भागातील महिला तसेच जिल्हा परिषद शाळातील अकरा ते एकोणीस वयोगटातील मुलींसाठी वैयक्तिक स्वच्छता व सॅनिटरी नॅपकिन्ससंदर्भात जाणीव जागृती करुन देण्यासाठी राज्यात शासनाकडून अस्मिता योजना राबविण्यात येणार आहे. 

या विषयाचे प्रबोधन व निर्माण होणा-या विविध समस्यांवर मात करण्यासाठी शासनस्तरावर हा निर्णय झाला आहे. मासिक पाळीच्या काळात शालेय वर्षात किमान पन्नास ते साठ दिवस विद्यार्थीनी अनुपस्थित राहतात ही बाब पुढे आली आहे. महिला व मुलींनी वैयक्तिक स्वच्छता व आरोग्याची काळजी या बाबत प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे. 

गावपातळीवरील उमेदपुरस्कृत स्थापन केलेल्या स्वयंसहायता समूह व आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन्सबाबत जाणीव व जागृती करणे व माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अस्मिता योजना शासनाने हाती घेतली आहे. 

अशी असेल योजना - -    बचत गटामार्फत जाणीव जागृती करणे -    सॅनिटरी नॅपकिन्सची मागणी नोंदविणे व पुरवठ्यासाठी अँपनिर्मितीस मान्यता -    बचत गटांनी गावाची एकत्रित मागणी अँपवर नोंदवावी -    तालुका स्तरावरील वितरकाकडे पुरवठादाराने नॅपकिन्स द्यावेत -    बचत गटांनी एमआरपीनुसार नॅपकिन्सची विक्री करावी -    शालेय विद्यार्थींनींना बचत गटांनी पाच रुपये प्रति नॅपकिन दराने विक्री करावी -    महिलांना माफक दरात नॅपकिन द्यावेत -    आरोग्य विभागाकडून हाती घेतलेल्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेशी संलग्न करुन अस्मिता योजना राबविली जाणार आहे.  -    योजनेच्या प्रसार प्रचारासाठी एक कोटींची तरतूद -    लाभार्थ्यांना अस्मिता कार्ड वितरीत केले जाणार -    उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान नोडल एजन्सी.

Web Title: execution of asmita yojana in pune zp schools

टॅग्स

संबंधित बातम्या

राज्यात प्रथमच पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र पोलिसिंग

पंढरपूर- राज्यात प्रथमच पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पोलिस हा नवा उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून आज सुरू करण्यात आला....

इंदापुरातील सुमारे चार किमी रस्त्याचेे भूमिपूजन

इंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28...

vajreshvari.
वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानामध्ये सव्वातीन कोटींचा अपहार

वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानात जवळपास सव्वा तीन कोटी रुपयांच्या अपहार झाला आहे. या प्रकरणी विश्वस्थ...

15 मुद्यांच्या आधारे सोलापुरातील झेडपी शाळांची तपासणी

सोलापूर- दिवाळीच्या सुटीनंतर यंदाच्या वर्षातील दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (ता. 19) सुरवात होत आहे. सुटीनंतरच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील...

लक्षद्वीपवर पुढील २४ तासांत वादळाची निर्मिती

मुंबई- तामिळनाडूत गज वादळाच्या तडाख्यानंतर नव्या वादळाचे संकेत मिळाले आहे. येत्या चोवीस तासांत लक्षद्वीपवर नवे वादळ तयार होत असल्याचा इशारा...

Chandrakant Patil
मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील

फुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...