Sections

दिलीप मोहिते यांचे कौतुक; सुरेश गोरे यांना कॉर्नर

सकाळ वृत्तसेवा |   गुरुवार, 12 एप्रिल 2018
Ajit-Suresh-Dilip

कडूस - राजगुरुनगर (ता. खेड) येथे मंगळवारी (ता. १०) झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्लाबोल’ आंदोलनाच्या सभेत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचे कौतुक केले; तर ऐन निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला मदत करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांना ‘मॅच फिक्‍सर’ची उपमा दिली. पण ‘राष्ट्रवादी’मधून शिवसेनेत जाऊन आमदार झालेल्या सुरेश गोरे यांच्यावर आपल्या एका तासाच्या भाषणात चकार शब्दानेही टीका केली नाही. त्यामुळे भविष्यातील निवडणुकीसाठी हातचा राखून ठेवला की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.  

कडूस - राजगुरुनगर (ता. खेड) येथे मंगळवारी (ता. १०) झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्लाबोल’ आंदोलनाच्या सभेत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचे कौतुक केले; तर ऐन निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला मदत करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांना ‘मॅच फिक्‍सर’ची उपमा दिली. पण ‘राष्ट्रवादी’मधून शिवसेनेत जाऊन आमदार झालेल्या सुरेश गोरे यांच्यावर आपल्या एका तासाच्या भाषणात चकार शब्दानेही टीका केली नाही. त्यामुळे भविष्यातील निवडणुकीसाठी हातचा राखून ठेवला की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.  

राजगुरुनगर येथील मार्केट यार्डच्या पटांगणावर राष्ट्रवादीची हल्लाबोल सभा झाली. या सभेसाठी अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते. राजगुरुनगरच्या सभेनंतर भोसरीला ‘हल्लाबोल’ची सभा होती. परंतु राजगुरुनगरच्या सभेला यायला उशीर झाल्याने सुप्रिया सुळे, वळसे पाटील व जयंत पाटील हे व्यासपीठावर हजेरी लावून भाषण न करताच पुढच्या सभेला निघून गेले. त्यामुळे राजगुरुनगर येथील ‘हल्लाबोल’च्या जबाबदारीची धुरा अंगावर घेतलेल्या अजित पवार यांनी तब्बल साडेअठ्ठावन्न मिनिटे भाषण करत एकट्याने किल्ला लढवला. यात त्यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली. 

सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेताना, ‘‘मंत्रीच आपल्या ‘पीए’ला आणि सचिवाला ‘सर सर’ करीत आहेत.’’ अशी टीका केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वयोमर्यादेचे भान ठेवण्याचा सल्ला दिला. निवडणुका जवळ आल्या, की बैलगाडा शर्यतीचे गाजर दाखविणारा भुलभुलैया खासदार, अशी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर टीका केली. 

सगळ्या विरोधकांवर टीका करीत असताना अजित पवार यांनी शिवसेनेचे आमदार गोरे यांच्याबाबत मात्र टीकेचा एक शब्द काढला नाही. राष्ट्रवादी सोडून शिवसेनेशी घरोबा केल्याने पवार हे गोरे यांना लक्ष करतात का, याबाबत उत्सुकता होती. परंतु पवारांनी गोरे यांना पूर्णपणे सोडून दिले. पवार आणि गोरे यांच्या जवळिकीची चर्चा असते. गोरे आमदार झाल्यानंतरही त्यांच्यातील वैयक्तिक जवळीक आणखीन वाढल्याचे बोलले जाते. ‘गोरे स्वप्नातसुद्धा दादांना आडवे जाणार नाही,’ असे गोरेंचे निकटवर्तीय सांगतात. हेच संबंध लक्षात घेता विरोधी पक्षाचा आमदार असूनही पवारांनी गोरेंबद्दल साधी नाराजीसुद्धा व्यक्त केली नाही. त्यामुळे भविष्यातील निवडणुकांसाठी पवारांनी हातचा राखून ठेवला की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

पक्षविरोधी काम करणाऱ्यांना कानपिचक्‍या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध काम करणाऱ्यांचे कान टोचले. ते म्हणाले, ‘‘एकीकडे ‘राष्ट्रवादी’त असल्याचे सांगायचे अन्‌ दुसरीकडे दुसऱ्या पक्षाबरोबर मिलीभगत करायची, मॅच फिक्‍सिंग करायची अन्‌ आपला एक आमदार गमवायचा, हे चांगलं नाही. अशा लोकांवर विश्‍वास ठेवू नका. येत्या काळात ‘राष्ट्रवादी’चे इमाने इतबारे काम करणारा अन्‌ घड्याळाचे चिन्ह घेऊन जो उभा राहील, त्यालाच मदत करायची आहे.’’   

दिलीप मोहिते यांनी अनेक विकासकामे केली. तालुक्‍यात ४२ पूल बांधले. भांडून कामे आणली. ही कामे करताना ते कुठे कमी पडले का? मागेल त्या कामाला निधी दिला. निधी द्यायला मी कुठे कमी पडलो का? एवढं काम करूनही त्यांना तुम्ही पाडले. आता चूक सुधारा.  - अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

Web Title: dilip mohite suresh gore ajit pawar politics

टॅग्स

संबंधित बातम्या

संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव : सुप्रिया सुळे

इंदापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली. मात्र, आता संविधान बदलण्याचा डाव भाजप सरकारकडून केला जात ...

baramati
मोरगाव जेजुरी रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ

बारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे...

Cotton
कापूसटंचाईने कारखानदारांसमोर अडचणी

जळगाव - तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या प्रोत्साहनाने खानदेश, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात जिनिंगची संख्या वाढली, परंतु जिनिंगकडे हवा...

पैठण, जि. औरंगाबाद - पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते गुरुवारी (ता.१५) झाले. या वेळी सुभाष देसाई, नंदकिशोर कागलीवाल, रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे, अतुल सावे, प्रकाश सारवाल,
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी महाराष्ट्राkला २५०० कोटी

औरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी...

ullasnagar.
उल्हासनगरमध्ये वाढीव वीज बिलाच्या विरोधात साईपक्ष रस्त्यावर

उल्हासनगर - पूर्वी कमी येणारे वीज बिल अधिक प्रमाणात किंबहूना अनेक पटीने येत असल्याने ते भरताना सर्वसामान्यांसोबत व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे....

pathak
राज्यातील शेतकऱ्यांच्या रोहित्रासाठी 5 हजार कोटीची तरतुद : विश्वास पाठक

परभणी : गेल्या 4 वर्षात ऊर्जा विभागातर्फे राज्यात 11 हजार कोटींची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी...